Join us  

How to get black hair : फक्त ५ रूपयांच्या कढीपत्त्यानं मिळवा काळेभोर, दाट केस; पांढऱ्या केसांचं टेंशन कायमचं विसराल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 3:19 PM

Premature Grey Hair Treatment : कढीपत्ता औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. केस आणि त्वचेसोबत हे आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे.

पांढरे किंवा गळणारे केस पाहून लोक अनेकदा टेंशनमध्ये येतात. पुरुषांपेक्षा स्त्रिया आपल्या सौंदर्याविषयी अधिक जागरूक असतात, म्हणून ते  अनेक घरगुती उपाय करून बघतात. आयुर्वेदानुसार आपल्या रोजच्या वापरात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे केसांच्या समस्या दूर होतात. (Kadhi leaves for black hairs)

आयुर्वेदिक तज्ज्ञ दिक्षा भावसार यांच्या मते कढीपत्ता केसांसाठी सर्वोत्तम मानला जातो.  (Ayurvedic expert tips to use curry leaves oil) हेच कारण आहे की आजी बहुतेकदा ते घरगुती तेल बनवण्यासाठी वापरतात. याशिवाय इतरही अनेक प्रकारे त्याचा वापर केला जातो. तज्ज्ञांनी ते वापरण्याचा योग्य मार्ग काय सांगितला आहे. (How get black hairs naturally) 

हेअर फॉल आणि पांढऱ्या केसांसाठी तेल

हे गुणकारी तेल बनवण्यासाठी तुम्ही खोबरेल तेल किंवा इतर कोणतंही तेल घेऊ शकता. यासाठी एक किंवा दोन कप तेल घ्या आणि त्यात कढीपत्ता मिसळा. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही आवळा देखील त्यात मिसळू शकता. आता ते गॅसवर ठेवून गरम करा. लक्षात ठेवा की पाने आणि तेल काळे होईपर्यंत ते गरम करावे लागेल. आता ते थंड होऊ द्या आणि नंतर बाटलीमध्ये भरा.

केसांना तेल लावण्याची पद्धत

केसांना कढीपत्ता तेल लावण्यासाठी, प्रथम केसांना विभागांमध्ये विभाजित करा. आता तेल लावून मुळापासून खालपर्यंत लावा. हे लक्षात ठेवा की तेल टाळूला चांगले लावावं लागेल. आता हे रात्रभर राहू द्या आणि दुसऱ्या दिवशी सौम्य शॅम्पूने केस धुवा.

कोंड्याची समस्या

दीक्षा भावसार यांच्या मते, कढीपत्त्याचा वापर कोंडा आणि उवांपासून मुक्ती मिळवण्यासाठीही होतो. यासाठी कढीपत्त्याची बारीक पेस्ट तयार करून आंबट ताकात मिसळा. आता ते तुमच्या टाळूवर लावा आणि कोरडे राहू द्या. नंतर ते चांगले धुवा. चांगल्या परिणामांसाठी तुम्ही आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा ते करून पाहू शकता. एक किंवा दोन दिवसांनी ते लावण्याचा प्रयत्न करा. 

कढीपत्त्याचे फायदे

कढीपत्ता औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. केस आणि त्वचेसोबत हे आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. सकाळी 8 ते 10 पाने खाल्ल्याने अनेक आरोग्य फायदे मिळतात. तुम्हाला हवे असल्यास डाळ, कोशिंबीर, करी इत्यादी पदार्थांमध्ये मिसळून खाऊ शकता. त्यामुळे केस निरोगी राहण्यास मदत होते. याशिवाय, हे नैसर्गिक रक्तातील साखरेचे नियामक देखील मानले जाते. आयुर्वेदानुसार ते मधुमेहाच्या रुग्णांसाठी चांगले असते. याशिवाय पचनक्रिया व्यवस्थित ठेवण्यासही मदत होते. 

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स