Lokmat Sakhi >Beauty > कॉलेजात असतानाच, अगदी ऐन तारुण्यात केस पांढरे व्हायला लागलेत? ४ उपाय, केस राहतील कायम काळेभोर

कॉलेजात असतानाच, अगदी ऐन तारुण्यात केस पांढरे व्हायला लागलेत? ४ उपाय, केस राहतील कायम काळेभोर

Premature White Hair Remedy : केसांची काळजी घेण्यासाठी आहारात बदल करून काही घरगुती उपाय वापरले तर कमी खर्चात केसांमध्ये चांगला बदल दिसू  शकतो. (How to stop white hair)

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 12:50 PM2022-07-30T12:50:04+5:302022-07-30T13:32:43+5:30

Premature White Hair Remedy : केसांची काळजी घेण्यासाठी आहारात बदल करून काही घरगुती उपाय वापरले तर कमी खर्चात केसांमध्ये चांगला बदल दिसू  शकतो. (How to stop white hair)

Premature White Hair Remedy : Prevention for premature white hair issue stress unhealthy foods thyroid hormone smoking | कॉलेजात असतानाच, अगदी ऐन तारुण्यात केस पांढरे व्हायला लागलेत? ४ उपाय, केस राहतील कायम काळेभोर

कॉलेजात असतानाच, अगदी ऐन तारुण्यात केस पांढरे व्हायला लागलेत? ४ उपाय, केस राहतील कायम काळेभोर

आधीच्या काळात डोक्यावर पांढरे केस दिसणे हे वृद्धत्वाचे लक्षण मानले जात होते, परंतु सध्याच्या जमान्यात २० ते ३० वर्षे वयोगटातील लोकांचे केस पांढरे होऊ लागले आहेत. (Premature White Hair Remedy) यामुळे तरुणांना अनेकदा न्युनगंड आणि कमी आत्मविश्वासाला सामोरे जावे लागते. केस पुन्हा काळे करण्यासाठी अनेक नैसर्गिक उपाय आहेत. (Hair Care Tips) पण केमिकलयुक्त ट्रिटमेंट घेऊनहीअनेकदा केसांमध्ये हवातसा बदल दिसून येत नाही. तर तुम्ही केसांची काळजी घेण्यासाठी आहारात बदल करून काही घरगुती उपाय वापरले तर कमी खर्चात केसांमध्ये चांगला बदल दिसू  शकतो (How to stop white hair)

१) हेल्दी पदार्थांचा आहारात समावेश करा

आपल्या शरीरातील बहुतेक समस्या अयोग्य आहारामुळे उद्भवतात. केस पांढरे होणे देखील त्याला अपवाद नाही. सध्याच्या युगातील तरुणांना बाजारातील जंक आणि फास्ट फूड खाणे आवडते ज्यामुळे आपले आरोग्य बिघडू शकते. जर तुमचे पोट बरोबर नसेल तर परिणाम केसांवर होणार हे नक्की. तुमच्या दैनंदिन आहारात जीवनसत्त्वे, कॅल्शियम, प्रथिने, जस्त, लोह आणि तांबे यासारख्या महत्त्वाच्या पोषक घटकांचा समावेश करणे आवश्यक आहे.

२) स्मोकिंग करू नका

सिगारेट, बिडी, हुक्का यांसारख्या गोष्टी आरोग्यासाठी अजिबात चांगल्या  नाहीत, या पदार्थांमधून निघणारा धूर आपली फुफ्फुस खराब करतो.  धुम्रपान केल्याने केस अकाली पांढरे होतात. हे व्यसन आजकालच्या तरुणांमध्ये जास्त असल्याने त्यांच्या केसांचे आरोग्य बिघडते.

३) जास्त ताण घेऊ नका

तणाव हे अनेक रोगांचे मूळ मानले जाते, कारण निरोगी मनाशिवाय आपण निरोगी शरीराची कल्पना करू शकत नाही. टेन्शनमुळे पांढरे केस वाढतात आणि पांढऱ्या केसांमुळे टेन्शन येते असे म्हणतात. त्यामुळे दैनंदिन जीवनात जास्त ताण न घेणे चांगले.

४) थायरॉईड टेस्ट

जेव्हा थायरॉक्सिन हार्मोन आपल्या शरीरात वाढतो. तेव्हा त्यामुळे केस पांढरे होण्याची समस्या उद्भवू शकते. हायपोथायरॉईडीझम टाळण्यासाठी, आपण थायरॉईड चाचणी करणे आवश्यक आहे. शारीरिकदृष्या सक्रिया राहून योगा, नियमित व्यायाम, निरोगी आहार घेऊन आपण  हार्मोनल असंतुलन टाळू शकता.

Web Title: Premature White Hair Remedy : Prevention for premature white hair issue stress unhealthy foods thyroid hormone smoking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.