Lokmat Sakhi >Beauty > निळ्या- पांढऱ्या मलमल प्रिंटेड कॉटन साड्यांचा ट्रेंड; समर कलेक्शनची खास तयारी

निळ्या- पांढऱ्या मलमल प्रिंटेड कॉटन साड्यांचा ट्रेंड; समर कलेक्शनची खास तयारी

fashion trend: थंडीचे दिवस संपत आले आहेत.. आता समर कलेक्शनची तयारी सुरू करायला हरकत नाही.. म्हणूनच तर बघा हे निळ्या- पांढऱ्या मलमल प्रिंटेड साड्यांचं कलेक्शन (Printed cotton saree collection) !!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2022 04:39 PM2022-01-27T16:39:10+5:302022-01-27T17:07:00+5:30

fashion trend: थंडीचे दिवस संपत आले आहेत.. आता समर कलेक्शनची तयारी सुरू करायला हरकत नाही.. म्हणूनच तर बघा हे निळ्या- पांढऱ्या मलमल प्रिंटेड साड्यांचं कलेक्शन (Printed cotton saree collection) !!

Printed cotton saree, new trend for classy cool summer collection! | निळ्या- पांढऱ्या मलमल प्रिंटेड कॉटन साड्यांचा ट्रेंड; समर कलेक्शनची खास तयारी

निळ्या- पांढऱ्या मलमल प्रिंटेड कॉटन साड्यांचा ट्रेंड; समर कलेक्शनची खास तयारी

Highlightsउन्हाळ्यात घालण्यासाठी काही कुल, क्लासी पर्याय शोधत असाल तर सध्या ट्रेण्डमध्ये असणाऱ्या प्रिंटेड कॉटन साड्यांचा विचार करायला काहीच हरकत नाही..

थंडीची लहर सध्या तुफान वाढलेली आहे. अवघ्या राज्यातच थंडीचा कहर सुरू आहे. पण ही थंडी आता अवघ्या काही दिवसात ओसरणार असून उन्हाचा कडाका सुरू होणार आहे. त्यामुळे थंडीचे सगळे विंटर कलेक्शन आता लवकरच कपाटबंद होण्याच्या मार्गावर आहे. अशावेळी उन्हाळ्यात (summer wear) घालण्यासाठी काही कुल, क्लासी पर्याय शोधत असाल तर सध्या ट्रेण्डमध्ये असणाऱ्या प्रिंटेड कॉटन साड्यांचा विचार करायला काहीच हरकत नाही..

 

उन्हाळ्यात आपल्याकडे एवढा उकाडा असतो की काहीतरी हलके- फुलके, मऊसर कपडे घालावे वाटतात. जड, टोचके कपडे उन्हाळ्यात अगदी नकोसे होतात. त्यामुळे मग कॉटनच्या कपड्यांची त्या काळात चांगलीच चलती असते. कुर्ती, ड्रेसेस यांच्या बरोबरीने उन्हाळ्यात कॉटन साड्यांचही जबरदस्त कलेक्शन येतं, एव्हाना उन्हाळा डोळ्यासमोर ठेवून काही फॅशन हाऊसेसमध्ये उन्हाळी कॉटन साड्यांचं आगमन झालेलंही आहे.. त्यापैकीच ही एक आहे ब्रिज बाडी (Brij Bari) ब्रॅण्डची कुवाल्या (Kuvalya) साडी.

 

हिवाळ्यात भडक रंग चालून जातात, पावसाळ्यात फ्लुरोसंट रंगांचा ट्रेण्ड असतो. तसंच उन्हाळ्यात फिकट रंगांची क्रेझ असते. यातही पांढरा, निळा, आकाशी, गुलाबी, फिकट पिवळा असे रंग विशेष भाव खाऊन जातात. म्हणूनच तर Kuvalya साडीही निळ्या आणि पांढऱ्या रंगाचं सुंदर कॉम्बिनेशन असणारी आहे. या साडीचं वर्णन करताना या ब्रॅण्डतर्फे असं सांगण्यात आलं आहे की या साडीचं सुत अतिशय तलम असून यावर पोलका डॉट नक्षी आहे. साडीवर स्टायलिश tassel work करण्यात आलं असून साडीच्या पदरावर ब्लॉक प्रिंट्स आहेत. फाॅर्मल आणि पार्टीवेअर अशा दोन्ही ठिकाणी तुम्ही कॉटन साडी मस्तपैकी कॅरी करू शकता. या साडीची किंमत ४७५० रूपये आहे. 

 

कॉटन साडीसोबत मिळवा स्टायलिश लूक, या घ्या टिप्स.. (how to get stylish look with cotton saree)
- कॉटन साड्यांवर तुम्ही ब्लाऊज कसं शिवताय, यावरही तुमचा लूक बराच अवलंबून असतो.
- स्टायलिश लूक मिळविण्यासाठी किंवा पार्टीवेअर गेटअप करण्यासाठी कॉटन साड्यांवर तुम्ही स्लिव्हलेस ब्लाऊज घालू शकता. श्रीवल्ली रश्मिका मंदानाची ३१ हजारांची ऑर्गेंझा सिल्क साडी, महागड्या ऑर्गेंझा सिल्कची काय खास बात?
- ऑफिसवेअर किंवा फॉर्मलवेअर म्हणून कॉटन साडी नेसणार असाल तर त्यावर स्टॅण्डकॉलरचे ब्लाऊज घाला. अधिक परफेक्ट लूक मिळेल. 
- कॉटन साडीवर फार झगझगीत, चमकते दागिने घालणं टाळा.
- टेरिकोटा, ऑक्सिडाईज किंवा मग मोत्यांचे, मण्यांचे किंवा वुडन ज्वेलरी कॉटन साड्यांवर अधिक छान दिसते. 

image credit- google

Web Title: Printed cotton saree, new trend for classy cool summer collection!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.