देसी गर्ल प्रियांका चोप्राची (Priyanka Chopra) आई नेहमीच तिला वेगवेगळ्या महत्वपूर्ण टिप्स देताना दिसते. प्रियांका चोप्राचा एग्ज फ्रिजिंगचा निर्णय असो किंवा डोळ्यांखालील डार्क सर्कल्स तिच्या प्रत्येक एका महत्वपूर्ण गोष्टीत ती नेहमी तिच्या आईचा सल्ला घेताना दिसते. देसी गर्ल प्रियांका चोप्रा एक जागतिक दर्जाची सेलेब्रिटी म्हणून ओळखली जाते. प्रियांकाच्या अभिनयाचा जसा एक चाहता वर्ग आहे तसेच तिच्या फिटनेस आणि सौंदर्याचे देखील अनेक फॅनफॉलोअर्स आहेत. प्रियांका अभिनयासोबतच तिचा फिटनेस आणि सौंदर्याकडे नेहमी तितकेच लक्ष देता दिसते(Global Icon Priyanka Chopra Jonas Shares Her Beauty Secrets).
प्रियांकाच्या त्वचेमध्ये एक वेगळीच चमक दिसून येते. प्रियांका चोप्रा अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जी तिच्या उत्कृष्ट फॅशन आणि सौंदर्यासाठी ओळखली जाते. जेव्हा ही देसी गर्ल मीडियाद्वारे कॅमेऱ्यात कैद होते तेव्हा प्रत्येकजण तिच्या नैसर्गिक सौंदर्याची प्रशंसा करताना थकत नाही. वयाच्या चाळीशीनंतरही प्रियांका चोप्राची त्वचा ग्लोइंग, चमकदार दिसते. या चाळीशीच्या वयात देखील ती नेमकं त्वचेसाठी काय करते, असा प्रश्न पडला असेल तर तिच्या सुंदर त्वचेचं गुपित कोणतं याची माहिती तिच्या आईनेच दिली आहे. प्रियांका नेहमीच आपल्या फिटनेस, ब्यूटी यांसारख्या गोष्टींमध्ये तिची आई मधू चोप्रा यांचा सल्ला घेताना दिसते. प्रियांकासारखी नैसर्गिकरित्या निरोगी आणि चमकदार त्वचा मिळविण्यासाठी तिच्या आईनेच तिला एक ब्यूटी सिक्रेट सांगितले आहे, ते सिक्रेट नेमकं काय आहे ते पाहूयात(Priyanka Chopra's Guide to Skincare).
प्रियांका चोप्राचे ब्यूटी सिक्रेट...
१. कॉफीऐवजी प्रियांका पिते...
सकाळी उठल्यावर दिवसाची सुरुवात कॉफीने करण्याऐवजी प्रियांका तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे पसंत करते. रात्री झोपतानाच ती आपल्या उशाशी तांब्याच्या ग्लासात पाणी भरुन ठेवते. तांब्याच्या भांड्यात भरुन ठेवलेले पाणी ती सकाळी उठल्या उठल्या पिते. प्रियांकाने तांब्याच्या भांड्यातून पाणी पाण्याचे फायदे देखील सांगितले आहेत की ते आपली रोगप्रतिकारक शक्ती, हाडे आणि मज्जातंतूंसाठी खूपच फायदेशीर ठरते.
शरीराच्या 'या' भागांवर परफ्यूम लावणे पडेल महागात, परफ्युम लावताना अशी घ्या काळजी...
२. महिन्यातून दोनदा फेशियल करते...
प्रियांकाने सांगितले की तिला फेशियल खूप आवडते आणि वेळ मिळाल्यास ती महिन्यातून दोनदा फेशियल करून घेते. तिने असेही सांगितले की त्वचा निरोगी बनवण्यासाठी ती भरपूर पाणी पिते. ती कुठेही बाहेर गेली असता आपल्या बॅगेत नेहमी पाण्याची बाटली ठेवते. भरपूर पाणी पिण्यासोबतच किमान ८ तासांची झोप ही गरजेची असते.
३. त्वचेसाठी फाऊंडेशनचा वापर कमी करा...
प्रियांका तिच्या त्वचेसाठी फाऊंडेशनचा वापर फारच कमी करते. ती गरज असेल तरच अगदी योग्य प्रमाणात फाऊंडेशन लावते. आपल्या त्वचेसाठी फाऊंडेशनची विशेष भूमिका असते पण त्याचा वापर किती करायचा आणि कोणत्या प्रकारचे फाऊंडेशन वापरावे हे आपले आपण स्वतः ठरवले पाहिजे. प्रियांकाने सांगितले की तिला तिची त्वचा नॅचरली आहे तशीच ठेवायला आवडते, म्हणून ती फक्त त्वचेवरील काही भाग लपवण्यासाठी फाऊंडेशनचा वापर करते. प्रियांकाप्रमाणे तुम्हाला तुमच्या त्वचेला नैसर्गिक चमक द्यायची असेल, तर फाऊंडेशनचा वापर कमी प्रमाणांत करावा.
डेड स्किनमुळे चेहरा डल दिसतो? हा घ्या डेड स्किन रिमुव्हल मास्क, पार्लरला जाण्याचीही गरज नाही...
४. आईकडून मिळाली खास ब्यूटी टिप...
आईने दिलेली ब्यूटी टिप शेअर करताना प्रियांका म्हणते की, "आत्मविश्वास हेच आपले खरे सौंदर्य आहे." तुमच्याकडे चांगले कपडे, केस आणि मेकअप असला तरी पण जर तुमचा आत्मविश्वास नसेल तर तुम्ही तुमच्यातील सकारात्मक ऊर्जा इतरांपर्यंत पोहचवू शकत नाही. प्रियांकाने सांगितले की, ही तिची आजपर्यंतची सर्वोत्तम ब्यूटी टिप आहे.