निराली बॅनर्जी
प्रियांका चोप्राचा लेटेस्ट लूक पाहिला, तिने इन्स्टावर शेअर केलेला फोटो. रेड हॉट बॉडीकॉन टाइप ड्रेस. त्यावरची लालभडक लालेलाल लिपस्टिक. या इन्स्टाग्राम हॅण्डलवर टाकलेला फोटो म्हणे तिच्या म्युझिक व्हीडीओमधल्या गाण्याचा लूक आहे. तर असेलही तसं. पण आपला विषय तो ड्रेस, तो लूक, प्रियांका चोप्रा हा नाही. तर विषय आहे. लाल लिपस्टिकचा. अर्थात सध्या पून्हा नव्यानं चर्चेत येत असलेल्या लाऊड लिपस्टिक ट्रेण्डचा. त्याचं एक उत्तम उदाहरण आहे, प्रियांकाची ही लिपस्टिक. जगभरातच सगळ्यांचे चेहरे मास्कआड गेले आणि लिपस्टिक मेकअपवाला लूक घेऊन कुठं जायचं असा प्रश्नच पडला. त्यातही डार्क-लाऊड लिपस्टिक. गेल्या वर्षभरात हा ट्रेण्ड मागे पडला होता, मात्र आता नव्यानं त्याची चर्चा आहे की मास्कआड तर मास्कआड पण आपण लावायची तर डार्कच लिपस्टिक लावायची. नुकत्याच ग्रॅमी अवार्ड्स सोहळ्यात फोब ब्रिजर्सने लावलेली डार्क लिपस्टिकीं चर्चेचा विषय ठरली.
आता कुणी हे वाचून म्हणेल की एवढं काय महत्व द्यायचं त्या लिपस्टिकला? पण हे फक्त लिपस्टिक लावणं नाही. ते एक स्टेटमेण्ट आहे. लाऊड ॲण्ड क्लिअर, बोल्ड ॲण्ड ब्युटीफुल स्टेटमेण्ट. जे म्हणतं की, कुणाला आवडो न आवडो, मला आवडलं, करुन पहावंसं वाटलं तर मी ते करणार! मग ती डार्क रंगाची लिपस्टिक का असेना लावणार बिनधास्त. कुणाला काय वाटेल यााच विचार करुन मी मला आवडणारे रंग टाळणार नाही.आता कोरोनाकाळात तर अनेकींनी मेकअप ट्युटोरिअल्स ऑनलाइन घेतले. अनेकींनी तर फक्त लिपस्टिक कशी लावायची याचे क्लासेस घेतले. मास्क लावायची का असेना लिपस्टिक, तिचे रंग आपण निवडावे हे ठरवलं.आणि ते खरंच है, मास्क है तो क्या हुआ, एक लिपस्टिक आपका लूक बदल सकती है!
(Phoebe Bridgers)
म्हणूनच सध्या पुन्हा एकदा गुलाबी आणि लाल लिपस्टिक चर्चेत आहेत. जांभळ्या, निळ्या लिपस्टिकची चर्चा होती पण आता ते रंग मागे पडले आहेत. ब्राऊन रंगाचं तर बोअर कलर असं नामकरणही अनेकींनी करुन टाकलं आहे. बिग नो टू ब्राऊन, बिग येस टू ब्राइट असा हा नवा ट्रेण्ड आहे.दोन लिपस्टीक एकत्र करून वापरणंही आता कूल मानलं जातं. म्हणजे तुम्ही ब्राऊन रंगाचा ड्रेस घातलाय म्हटल्यावर त्याच कलरची लिपस्टीक न लावता आधी बेबी पिंक कलरची लिपस्टीक लावून त्यावर ब्राऊन कलरची लिपस्टीक लावून जो पिंकीश ब्राऊन कलर येतो तोही उठावदार दिसतो. याशिवाय रेड-पिंक, ऑरेंज -पिंक, असे काही रंग मिक्स- मॅच करून वापरता येतात.
सॅटिन वाईन, रेड आणि मरून, ब्राइट ऑरेंन्ज, पॅले पिंक, मेट रेड असे काही रंगही अनेकजणी वापरतात.म्हंटलं ना, एक लिपस्टिक आप का लूक बदल सकती है!