सुप्रसिद्ध मॉडेल प्रियांका चोप्रो जोनास तिचे आऊटफिट्स आणि पतीसोबतच्या फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. प्रियांकाबाबत अनेकदा वादग्रस्त विधानं तुम्ही ऐकली असतील. या ट्रोलिंगकडे ती कसं बघते, याबाबत प्रियांकानं खुलासा केला आहे. प्रियांका चोप्रा तिच्या पॉडकास्ट मध्ये शरीराच्या बदल्यात स्थितीबाबत बोलली. ती वयाच्या 17 व्या वर्षापासून मनोरंजन इंडस्ट्रीचा एक भाग आहे. लोकांच्या कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं, कोणत्या नाही, हे तिला चांगलंच माहीत आहे.
व्हिक्टोरिया सीक्रेटच्या व्हीएस व्हॉईस पॉडकास्टवर प्रियांका म्हणाली, “साहजिकच, इंडस्ट्रीची भरभराट होऊ लागली आणि माझा आकार काय, मोजमाप काय आहे यावर लोकांचं लक्ष लागून होतं, माझ्या प्रत्येक भागाकडे विचित्रपणे पाहणे सुरू झाले. मी वयाच्या २० व्या दशकात यशस्वी होण्याचे वेगवेगळे टप्पे गाठायला सुरूवात केली. मी कधीच पूर्णपणे फॉटोशॉप केलेले चेहरा, व्यवस्थित केस लोकांसमोर ठेवला नाही. जितकं वास्तवदर्शी राहता येईल तसं राहण्यचा प्रयत्न केला.''
ती पुढे म्हणाली की, ''मला वाटते की माझ्यासाठी हा एक मोठा प्रवास होता कारण मी मनोरंजन विश्वात मोठी झाले. माझ्यावर फेकलेल्या प्रत्येक गोष्टी मी इतक्या वेगाने स्वीकारल्या आणि प्रत्येक प्रकारच्या हेडलाईन्सशी सामना केला. मी काय करतेय, लोक याबाबत काय विचार करतील याचा विचार करायला मला जराही वेळ नव्हता. ''
प्रियंका म्हणाली की, '' वडिलांच्या मृत्यूनंतर जेव्हा मी आहाराकडे व्यवस्थित लक्ष दिलं नाही तेव्हा मला वाटतं की कालांतराने माझे शरीर बदलू लागले आणि मी त्या टप्प्यातून गेले जेव्हा माझं मन मला खात होतं. माझं शरीर बदलू लागलं. माझं वय 30 पर्यंत पोहोचलं, मी संघर्षातून गेले. कारण लोकांकडून मला तुम्ही वेगळ्या दिसत आहात, तू दिवसेंदिवस म्हातारी होत आहात हे ऐकायला मिळायचं तेव्हा मी खूप गोंधळलेले असायचे.
माझं मन आधीच अशा अंधाऱ्या जागी होते आणि माझ्याकडे त्यासाठी वेळ नव्हता. सोशल मीडियाशी माझे संबंध बदलले, इंटरनेटशी माझे संबंध बदलले. मी स्वतःला अशा प्रकारे उदयास आणले जिथे मी स्वतः स्वत:चे रक्षण केले. नंतर माझी कॅन्सरची ट्रिटमेंटही पूर्ण केली.''
गेल्या दोन वर्षांमध्ये, प्रियांका निरोगी राहिली आणि ती तिच्या आयुष्याच्या 'खरोखर अंधकारमय' टप्प्यानंतर तिनं कम बॅक केलं आहे. ती म्हणाली की, ''मला वाटते की हा एक टप्पा आहे. आपल्यापैकी प्रत्येकजण चढ -उतारांमधून जातो. परंतु अखेरीस, जितक्या लवकर आपण स्वत: ला स्वीकारतो तितकं चांगले जीवन जगता येते. तेव्हा आपण दुसऱ्याच्या अपेक्षांच्या ओझ्याखालून मुक्त होतो, ”