बाॅलिवूडची प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) हॉलीवूडमध्येही आता चांगलीच लोकप्रिय झालेली आहे. त्यामुळे ती आता एक आंतरराष्ट्रीय दर्जाची सेलिब्रिटी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे भारतातच नाही तर आता जगभरात प्रियांकाचे चर्चे असतात. तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी जगभरातील कित्येक लोक उत्सूक असतात. त्यामुळेच तर प्रियांकाचा एक व्हिडिओ सध्या बराच व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओमध्ये प्रियांका तिच्या सौंदर्याचं एकेक रहस्य (Beauty secret by Priyanka Chopra) उलगडून सांगत आहे.. ओठ गुलाबी, नाजूक आणि भेगा नसणारे असावेत... त्वचा तजेलदार आणि चमकदार असावी, केस छान मुलायम, मजबूत आणि दाट असावेत असं प्रत्येकीला वाटतं.. पण बऱ्याचदा असं होतं की या सगळ्या गोष्टी मिळविण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन भरपूर पैसा खर्च करण्याची मुळीच इच्छा नसते.. म्हणूनच तर हा बघा प्रियांकाने सांगितलेला एक स्वस्तात मस्त उपाय..
या व्हिडिओमध्ये प्रियांका सांगते आहे की सगळ्या नैसर्गिक गोष्टी वापरून ती तिच्या त्वचेची आणि केसांची काळजी घेते. हे सगळे उपचार तिच्या आई, आजी नियमितपणे करायच्या. यामुळेच तर आता वय वाढलं असलं तरीही त्यांची त्वचा आणि केस उत्तमच आहेत.. म्हणूनच तर कॉस्मेटिक्स वापरा पण कधीतरी आठवड्यातून एक- दोनदा तरी त्वचेसाठी नैसर्गिक घटकांचा वापर करावा, असं काही सौंदर्यतज्ज्ञही सांगत असतात.
प्रियांकाने सांगितलेले घरेलू नुसके
१. असा तयार करा लीप स्क्रब (lip scrub)
ओठांवर डेड स्किन साचू लागली की ओठ काळपट दिसू लागतात. त्यांच्यातला काेरडेपणा वाढत जाऊन पांढरट सालंही ओठांवर साचू लागतात. म्हणूनच आठवड्यातून एकदा तरी ओठांना स्क्रब करणं गरजेचं असतं. घरच्याघरी ओठांना स्क्रब कसं करायचं याचा एक मस्त उपाय प्रियांकाने सांगितला आहे. ती म्हणजे की यासाठी एका बाऊलमध्ये सी सॉल्ट घ्या. त्यात थोडं ग्लिसरीन आणि थोडं रोझ वॉटर टाका. हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करा आणि बोटावर घेऊन हळूवार हाताने ओठांना मसाज करा. या उपायामुळे ओठ मऊ, गुलाबी होतील.
२. बॉडी स्क्रब (body scrub)
संपूर्ण अंगाला लावण्यासाठी घरगुती बॉडी स्क्रब कसा तयार करायचा हे देखील प्रियांकानं सांगितलं आहे. बॉडी स्क्रब तयार करण्यासाठी एका बाऊलमध्ये एक वाटी डाळीचं पीठ घ्या. त्यात दोन टेबलस्पून प्लेन योगर्ट, एका लिंबाचा रस, एक टेबलस्पून चंदनाची पावडर, एक वाटी कच्चं दूध आणि दोन टीस्पून हळद टाका. हे सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या. ही पेस्ट संपूर्ण अंगाला तुम्ही लावू शकता. त्यासाठी अंगाला पेस्ट लावल्यानंतर ती वाळू द्या. सुकत आली की चोळून चोळून अंगावरून काढून टाका. त्यानंतर आंघोळ करा.. त्वचेचा काळवंडलेपणा दूर होऊन ती चमकदार दिसू लागेल.