ऊन्हाळ्याच्या दिवसांत प्रत्येकालाच टॅनिंग येते. इतकंच नाही तर ऊन्हामुळे त्वचासुद्धा कोरडी होते. (Skin Care Tips) दिवसभर बाहेर फिरल्यानंतरही अभिनेत्रीची स्किन इतकी ग्लोईंग कशी राहते असा प्रश्न अनेकांना पडतो. तुमची त्वचा अभिनेत्रींप्रमाणे चमकावी असं तुम्हाला वाटत असेल तर प्रियांका चोप्राचे होममेड स्क्रब नक्की ट्राय करून पाहा. केमिकल्सयुक्त प्रोडक्ट्सपासून त्वचेला वाचवण्यासाठी हा उत्तम उपाय आहे. (Homemade Sun Tan Removal Face And Body Scrub) ज्यामुळे स्किन टॅनिंगपासून बचाव होतो स्किन ग्लो करते आणि मॉईश्चराईज राहण्यास मदत होते. (Priyanka Chopra's All-Natural, DIY Skin Secrets
प्रियांका चोप्रा या बॉडी स्क्रबचे फायदे सांगितले आहेत.
हे स्क्रब बनवणं खूपच सोपं आहे. या होममेड स्क्रबच्या वापराने स्किन एक्सफोलिएट होण्यास, हायड्रेट राहण्यास मदत होते. याशिवाय त्वचा मॉईश्चराईज रहाते. स्किन हिल करण्यासही मदत होते. एक दिवसाआड तुम्ही हे बॉडी स्क्रब लावू शकता. हे स्क्रब बनवण्यासाठी १ कप पीठ, २ चमचे प्लेन दही, अर्धा चिरलेल्या लिंबाचा रस, ४ चमचे दूध, २ चमचे चंदन पावडर, दिड चमचा हळदीची आवश्यकता असेल. स्क्रब तयार करण्यासाठी सगळ्यात आधी मोठा बाऊल घ्या. त्यात पीठ, दही घालून व्यवस्थित मिक्स करा. त्यात लिंबाचा रस आणि दूध मिसळून एकत्र करा. हे पदार्थ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यात चंदन पावडर आणि हळज घालून व्यवस्थित मिसळा तयार आहे.
प्रियांका चोप्राचे बॉडी स्क्रब
हे स्क्रब तयार झाल्यानंतर टॅन झालेल्या स्किनवर लावा त्यानंतर थोडावेळ सुकण्यासाठी ठेवा. थोड्यावेळानंतर पेस्ट हातांनी रब करून स्क्रब करा. तुम्हाला दिसेल की हात चमकत आहेत आणि टॅनिंगसुद्धा साफ होत आहे. याचा वापर तुम्ही आठवड्यातून २ ते ३ वेळा करू शकता. या स्क्रबमुळे तुमच्या त्वचेवर काळेपणा जाणवणार नाही आणि डेड सेल्स निघून जाण्यासही मदत होईल.
चालणं होतं तरी पोट कमी होत नाही? फक्त १० मिनिटं ‘असा’ करा 'पॉवर वॉक'; कमी होईल पाेट
तुम्ही एकावेळी जास्त सामानाचा वापर करू शकता. एक महिन्यासाठी स्क्रब तयार करा. जर तुमची स्किन सेंसिटिव्ह असेल तर सगळ्यात आधी हातांच्या वरच्या भागावर स्क्रब लावा स्किनवर कोणताही साईड इफेक्ट दिसत असेल याची वापर काळजीपूर्वक करा नंतर हात व्यवस्थित धुवून घ्या.