Join us  

देसीगर्ल प्रियांका चोप्राचा खास बॉडी स्क्रब- महागड्या बॉडी पॉलिशिंगसारखा इफेक्ट मिळेल फक्त १० रुपयांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2024 3:17 PM

Priyanka Chopra's Home Remedies For Glowing Skin: घरच्याघरी स्वयंपाक घरातलं साहित्य वापरून बॉडी स्क्रब कसं तयार करायचं याविषयी देसीगर्ल प्रियांका चोप्राने दिलेली ही खास माहिती...

ठळक मुद्देहा उपाय केल्यानंतर तुम्हाला तुमची त्वचा अतिशय मऊ, मुलायम वाटेल. तसेच त्वचेवर एक छानसा ग्लो आल्यासारखं दिसेल. 

देसीगर्ल प्रियांका चोप्रा ही आता जागतिक दर्जाची सेलिब्रिटी म्हणून ओळखली जाते. भारतात जसा तिचा चाहता वर्ग आहे तसाच तिने जगभर निर्माण केला आहे. पण असं असलं तरी प्रियांका मात्र काही काही बाबतीत अजूनही पुर्णपणे देसीगर्लच आहे. म्हणूनच तिला आजही काही घरगुती सौंदर्योपचार करायला आवडतात आणि जमेल तसे वेळ काढून ती ते आवर्जून करते. तिने सांगितलेल्या बॉडी स्क्रबची एक रेसिपी सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे (home made body scrub by Priyanka Chopra). यामध्ये तिने घरगुती साहित्य वापरून बाॅडी स्क्रब तयार केलं असून ते शरीरावरचं टॅनिंग, डेडस्कीन काढून टाकतं आणि त्वचेला बॉडी पॉलिशिंग ट्रिटमेंट केल्याप्रमाणे छानसा ग्लो देतं. (Priyanka Chopra's Home Remedies For Glowing Skin)

 

प्रियांका चोप्राने सांगितलेले होममेड बॉडी स्क्रब

प्रियांका चोप्राने कशा पद्धतीने बॉडी स्क्रब तयार करायला सांगितला आहे, याविषयीचा एक व्हिडिओ kareena2227_ या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे.

बघा आलिया- दीपिकासह बॉलीवूड अभिनेत्रींचे सुपर ट्रेण्डी मॅटर्निटी ड्रेस, स्टाईल करायची तर अशी...

हा स्क्रब तयार करण्यासाठी आपल्याला अर्धा कप बेसन, २ टेबलस्पून दही, अर्ध्या लिंबाचा रस, ३ ते ४ टेबलस्पून कच्चं दूध, १ टेबलस्पून चंदन पावडर आणि चिमूटभर हळद असं साहित्य लागणार आहे.

हे सगळं साहित्य एका वाटीत घेऊन एकत्र करा. हा लेप खूप घट्ट झाला आहे असं वाटलं तर त्यात गरजेनुसार कच्चं दूध टाकू शकता.

 

यानंतर चेहरा, मान, पाठ, गळा, हात, पाय अशा पद्धतीने एकेक करून संपूर्ण शरीरावरच तुम्ही हा लेप लावू शकता.

केसांच्या सगळ्याच तक्रारी दूर करण्यासाठी चिमूटभर कॉफी 'अशा' पद्धतीने वापरा, केस होतील दाट- लांब

लेप अंगाला लावल्यानंतर १५ ते २० मिनिटे तो तसाच राहू द्या. त्यानंतर लेप अर्धवट सुकला की हलक्या हाताने चोळून तो काढून टाका. यानंतर अंग धुवून घ्या आणि त्वचा मॉईश्चराईज करा. हा उपाय केल्यानंतर तुम्हाला तुमची त्वचा अतिशय मऊ, मुलायम वाटेल. तसेच त्वचेवर एक छानसा ग्लो आल्यासारखं दिसेल. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडीप्रियंका चोप्रा