Join us  

प्रियांका चोप्राची आई मधू चोप्रा सांगतात, खास घरगुती फेसपॅक - चमचाभर गव्हाच्या पिठाची जादू...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2023 3:45 PM

Priyanka Chopra's Mother Madhu Chopra Shows How To Make Homemade Ubtan For Glowing Skin In Viral Video : प्रियांका चोप्राची आई मधू चोप्रा यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पेजवरून घरगुती फेसपॅक-उटणं करण्याची कृती शेअर केली आहे.

बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा ही तिची फॅशन, स्किन केअर, फिटनेस या सर्वच गोष्टींसाठी अतिशय लोकप्रिय आहे. प्रियांका चोप्रा जशी आपल्या फिटनेसची काळजी घेते तशीच आपल्या स्किन केअरची काळजी घेताना दिसून येते. आपली स्किन कायम सुंदर दिसावी, असे प्रत्येकाचेच स्वप्न असते. आपण सगळेचजण आपल्या स्किनची काळजी घेत असतो. आपली स्किन सुंदर व मेंटेन्ड दिसण्यासाठी आपण काहीवेळा महागडे प्रॉडक्ट्स किंवा घरगुती उपायांचा वापर करतो. प्रियांका चोप्राची आई मधू चोप्रा हिने स्किन सुंदर दिसण्यासाठी एक घरगुती देसी उपाय सांगितला आहे. 

प्रियांका चोप्राची आई मधू चोप्रा यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पेजवरून घरगुती स्किन केअर उटणे कसे तयार करावे याबद्दलची सोपी कृती सांगितली आहे. मधू चोप्रा आपल्या इंस्टाग्राम अकाऊंट वरून कायम स्किन केअर रुटींनबद्दलचे व्हिडीओ शेअर करत असतात. सध्या त्यांनी असाच एक व्हिडीओ शेअर करत स्किन केअर करण्यासाठी घरगुती उटणे कसे तयार करायचे याबद्दल सांगितले आहे(Priyanka Chopra's Mother Madhu Chopra Shows How To Make Homemade Ubtan For Glowing Skin In Viral Video).

घरगुती उटणे तयार करण्यासाठी लागणारे साहित्य :- 

१. दही - २ ते ४ टेबलस्पून २. गव्हाचे पीठ - १ टेबलस्पून ३. हळद - चिमूटभर 

कोरफड म्हणजे उन्हाळ्यात वरदान, ७ प्रकारे कोरफड वापरा- उन्हामुळे होणारे त्रास होतील पटकन कमी....

१. सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये फ्रेश दही घेऊन त्यात गव्हाचे पीठ व चिमूटभर हळद घालून घ्यावी. 

२. आता हे सर्व मिश्रण चमच्याने ढवळून एकजीव करून घ्यावे. 

३. हे तयार झालेले फेस पॅकचे मिश्रण बोटांच्या मदतीने हलक्या हातांनी आपल्या चेहऱ्यावर लावून घ्यावे. हा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्यानंतर ५ ते १० मिनिटे तो तसाच चेहऱ्यावर लावून ठेवावा. १० मिनिटांनंतर बोटांच्या मदतीने हलक्या हातांनी मसाज करून हा फेसपॅक धुवून घ्यावा. 

४. चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर कोरड्या कापडाने पुसूंन घ्यावा. 

पिंपल्स, फोडांचे डाग जाता जात नाहीत? हा घ्या ‘खास’ पाण्याचा सोपा फॉर्म्युला, चेहरा दिसेल नितळ...

फेशियल नेमके किती दिवसांनी करायला हवे? महिन्यातून एकदा केले तर त्वचेला खरंच फायदा होतो?

हे घरगुती उटणे तयार करताना मधू चोप्रा यांनी काही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवण्यास सांगितल्या आहेत :- 

१. हे घरगुती उटणे तयार करत असताना ते अधिक पातळ किंवा घट्ट होणार नाही याची काळजी घ्यावी. उटणे जर अधिक घट्ट झालेच तर त्यात किंचित पाणी मिसळून ते हलकेच पातळ करून घ्यावे. 

२. चेहऱ्यावर उटणे लावल्यानंतर ते किंचित ओले असतानाच हलक्या हातांनी रगडून मसाज करून घ्यावा. उटणे संपूर्णपणे सुकल्यावर रगडून मसाज करू नये, यामुळे चेहऱ्याला इजा होऊ शकते किंवा रॅशेज येऊ शकतात. 

३. हे घरगुती उटणे चेहऱ्यावर लावण्याआधी हाताच्या एका कोपऱ्याला लावून पॅच टेस्ट करून घ्यावी. या पॅच टेस्टमध्ये हाताला उटणे लावल्यानंतर जर आपल्याला खाज येत असेल किंवा स्किन इरिटेशन तसेच लालसर पॅच येत असतील तर लगेच धुवून घ्यावे. आणि असे काही होत नसेल तरच हा फेसपॅक चेहऱ्यावरील त्वचेला लावावा.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी