Lokmat Sakhi >Beauty > डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी प्रियांका चोप्राची आई सांगतेय घरगुती उपाय, ८ दिवसांतच दिसेल फरक

डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी प्रियांका चोप्राची आई सांगतेय घरगुती उपाय, ८ दिवसांतच दिसेल फरक

Home Remedies For Reducing Dark Circles: डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळं कमी करण्यासाठी काय उपाय करावा, याविषयी अभिनेत्री प्रियांका चोप्राची आई डॉ. मधू चोप्रा (Priyanka Chopras Mother Madhu Chopra) एक खास उपाय सांगत आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2024 12:40 PM2024-05-31T12:40:09+5:302024-05-31T12:41:20+5:30

Home Remedies For Reducing Dark Circles: डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळं कमी करण्यासाठी काय उपाय करावा, याविषयी अभिनेत्री प्रियांका चोप्राची आई डॉ. मधू चोप्रा (Priyanka Chopras Mother Madhu Chopra) एक खास उपाय सांगत आहेत.

priyanka chopras mother madhu chopra suggest home remedies for reducing dark circles, how to get rid of dark circles? | डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी प्रियांका चोप्राची आई सांगतेय घरगुती उपाय, ८ दिवसांतच दिसेल फरक

डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी प्रियांका चोप्राची आई सांगतेय घरगुती उपाय, ८ दिवसांतच दिसेल फरक

Highlightsकाही घरगुती उपाय केल्यानेही डोळ्यांखालची काळी वर्तूळं कमी होण्यास मदत होते. असाच एक घरगुती उपाय अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिची आई डॉ. मधू चोप्रा यांनी सुचविला आहे.

काही जणींच्या डोळ्यांखाली खूपच काळेपणा असतो. यालाच आपण डार्क सर्कल्स असंही म्हणताे. खासकरून जेव्हा आपण आयब्रोज किंवा थ्रेडिंग करून येतो, तेव्हा तर डोळ्यांभोवतीचा काळेपणा अधिक तीव्रपणे जाणवतो. यामुळे मग साहजिकच सौंदर्यही कमी होतेच.. डोळ्यांभोवतीची काळी वर्तूळं येण्यामागची अनेक कारणं आहेत. आहारात अधिक पौष्टिक पदार्थ घेणे, रात्रीचं जागरण तसेच स्क्रिन टायमिंग कमी करणे, यामुळेही डार्क सर्कल्स कमी होतात (how to get rid of dark circles?). पण त्याचबरोबर काही घरगुती उपाय केल्यानेही डोळ्यांखालची काळी वर्तूळं कमी होण्यास मदत होते. असाच एक घरगुती उपाय अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिची आई डॉ. मधू चोप्रा यांनी सुचविला आहे. (priyanka chopras mother madhu chopra suggest home remedies for reducing dark circles)

डोळ्यांखालची काही वर्तूळं कमी करण्याचा उपाय

 

डॉ. मधू चोप्रा या इन्स्टाग्रामवर बऱ्यापैकी ॲक्टीव्ह असतात. त्या नेहमीच वेगवेगळे घरगुती उपायही शेअर करतात.

 

 

कापूर- तूप एकत्र करा आणि बघा जादू, पिंपल्सपासून ते डोकेदुखीपर्यंत अनेक समस्या गायब

असाच त्यांचा डोळ्यांखालची काही वर्तूळं कमी करण्याविषयीचा एक व्हिडिओही सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. यामध्ये त्यांनी २ सोपे उपाय सांगितले आहेत.

 

१. त्यापैकी पहिला उपाय करण्यासाठी कच्ची साय लागणार आहे. कच्ची साय म्हणजे न तापवलेलं दूध एखाद्या तासासाठी किंवा त्यापेक्षाही जास्त वेळ तसंच पातेल्यात ओतून ठेवा.

सेल डाऊन झाल्यास लगेच फेकू नका- करा एकदम देसी जुगाड, आठवडाभर तरी आरामात चालतील... 

त्यानंतर तासाभराने त्याला अलगद हात लावला असता दुधाच्या वर एक अतिशय क्रिमी असा घट्ट थर जमा झालेला दिसतो. यालाच कच्ची साय म्हणायचं. ही साय डार्क सर्कल्सवर लावा आणि हलक्या हाताने गोलाकार पद्धतीने काही सेकंद मसाज करा. ८ दिवस हा उपाय नियमितपणे कर. डार्क सर्कल्स कमी होतील.

 

२. कच्च्या सायीचा उपाय ८ दिवस नियमितपणे केल्यानंतर आता हा एक दुसरा उपाय करा. यासाठी एका वाटीत १ टीस्पून ग्लिसरीन घ्या. त्यामध्ये ३ ते ४ थेंब लिंबाचा रस आणि ३ ते ४ थेंब रोज वॉटर टाका.

बायांनो, स्वतःची काळजी घ्या! उन्हाच्या तडाख्याने पुरुषांपेक्षा महिला जास्त आजारी, उष्माघाताचे बळीही वाढले...

सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या. त्यामध्ये एक कॉटन पॅड बुडवा आणि तो तुमच्या डोळ्यांवर अर्धा ते पाऊण तास ठेवा. हा उपाय केल्यानंतर जेव्हा चेहरा धुवाल तेव्हा एखादं व्हिटॅमिन ई असणारं अंडरआय क्रिम लावा. काही दिवसांतच डार्क सर्कल्स कमी होतील, असं त्या म्हणाल्या. 

 

Web Title: priyanka chopras mother madhu chopra suggest home remedies for reducing dark circles, how to get rid of dark circles?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.