Join us  

प्रियांका चोप्रा सांगते तिच्या गुलाबी ओठांचं सिक्रेट- होममेड लिप स्क्रबचा अनोखा उपाय, खुलते सौंदर्य...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2024 5:56 PM

Priyanka Chopra's Secret Lip Scrub : Priyanka Chopra's sea salt scrub for pink lips : गुलाबी ओठांसाठी प्रियांका चोप्रा सांगते तिचा देसी उपाय...

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिच्या दमदार अभिनयामुळे बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये नाव कमावले आहे. यासोबतच ही अभिनेत्री तिच्या सौंदर्यासाठीही तितकीच लोकप्रिय आहे. प्रियांकाच्या अनेक चाहत्यांपैकी बरेचसे चाहते हे तिच्या सौंदर्याचे खूप मोठे फॅन आहेत. बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा तिच्या  अभिनयासोबतच तिच्या उत्कृष्ट फिगर आणि त्वचेसाठी प्रसिद्ध आहे. प्रियांका अनेकदा तिच्या स्किन केअर रूटीनबद्दल तिच्या चाहत्यांसोबत खूप काही शेअर करते(Priyanka Chopra's Secret Lip Scrub).

 प्रियांका स्किन केअरसाठी महागड्या स्किन ट्रिटमेंट्स, क्रिम्स असे अनेक उपाय करण्यापेक्षा अनेक होम रेमडीजचा वापर करताना दिसते. फक्त बॉलिवूडच नाही तर प्रियांका आता ग्लोबल आयकॉनही बनली आहे. पण असं असलं तरीही अजूनही काही बाबतीत ती पूर्ण देसी गर्लच आहे. यासाठीच आजही तिला काही घरगुती सौंदर्य उपचार करायला आवडतात आणि जमेल तसे वेळ काढून ती ते आवर्जून करते. तिने सांगितलेल्या लिप स्क्रबचा एक रेसिपी सध्या सोशल मीडियावर (Get Soft Pink Lips naturally at Home remedy) व्हायरल होत आहे. यामध्ये तिने घरगुती साहित्य वापरून लिप स्क्रब तयार केलं असून ते ओठांवरची डेड स्किन, टॅनिंग, काळे डाग काढून टाकत आणि ओठांना नैसर्गिक गुलाबी रंग देण्यास मदत करते तसेच हा उपाय केल्याने ओठांवर अधिक ग्लो येतो(Priyanka Chopra's sea salt scrub for pink lips).

प्रियांका चोप्राने सांगितलेले लिप स्क्रब... 

प्रियांका चोप्राने कशा पद्धतीने लिप स्क्रब तयार करायला सांगितलं आहे, याविषयीचा एक व्हिडीओ iam_grincy या इंस्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. 

हे लिप स्क्रब तयार करण्यासाठी लागणारे साहित्य :- 

१. सी सॉल्ट - १ टेबलस्पून २. ग्लिसरीन - १ टेबलस्पून ३. गुलाबपाणी - १ टेबलस्पून 

शोभितासारखा ग्लो हवा चेहऱ्यावर? पाहा तिचे सोपे सिक्रेट - एकदा लावा चेहऱ्यावर येईल चमक...

१ चमचा अळशी - १ चमचा तांदुळाचे पीठ, उपाय साधा- चेहऱ्यावरून तुमचं वय ओळखता येणार नाही...

लिप स्क्रब कसे बनवावे ? 

एक बाऊलमध्ये सी सॉल्ट घ्या. त्यात प्रत्येकी १ टेबलस्पून ग्लिसरीन आणि गुलाबपाणी घाला. हे मिश्रण व्यवस्थित एकत्रित करा. त्यानंतर हे मिश्रण बोटांवर घेऊन ओठांना हलक्या हाताने मसाज करत हे स्क्रब ओठावर चोळून घ्यावे. या उपायामुळे ओठ नैसर्गिकरित्या मऊ आणि गुलाबी होण्यास मदत मिळते. 

ओठांवर डेड स्किन साचून राहिली की ओठ काळपट दिसू लागतात. त्यांच्यातला कोरडेपणा वाढत जाऊन पांढरट सालही ओठान्वर साचून राहतात. म्हणूनच आठवड्यातून एकदा तरी ओठांना स्क्रब करणे गरजेचे असते. घरच्या घरी ओठांना स्क्रब कसे करायचे याचा एक मस्त उपाय प्रियांकाने शेअर केला आहे.

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सओठांची काळजीप्रियंका चोप्रा