Join us  

थंडीत स्किन काळवंडली-ड्राय झाली? १ बोरोलिन 5 फायदे-चेहऱ्यावर येईल तेज, डार्क सर्कल्स दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2024 12:57 PM

Product Review Boroline Sx Antiseptic Ayurvedic Cream : बोरोलिन आयुर्वेदीक सॉफ्टनिंग एंटी सेप्टिक क्रिम त्वचेसाठी (Boroline Ayurvedic Softening Anticeptic Cream) कशी फायदेशीर ठरते पाहूया.

थंडीच्या दिवसात त्वचा कोरडी होत असते. (Winter Skin Care Tips) अशावेळी त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी क्रिम्स लावण्याची गरज असते. तुम्ही बोरोलिनचा वापर करू शकता.  ५० ते १०० रूपयांच्या आत तुम्हाला बोरोलिन सहज उपलब्ध होईल. फक्त त्वचाच नाही तर नखं आणि ओठांसाठीही बोरोलिनचे बरेच फायदे आहेत. बोरोलिन आयुर्वेदीक सॉफ्टनिंग एंटी सेप्टिक क्रिम त्वचेसाठी (Boroline Ayurvedic Softening Anticeptic Cream) कशी फायदेशीर ठरते पाहूया.

बोरोलीन क्रिम कशासाठी वापरायची? (How to Use Broline in Winter)

बोरोलिन नाईटक्रिम, एक्ने दूर करणारी क्रिम म्हणून काम करते. एक्ने, फंगल इन्फेक्शनपासूही बचाव होतो. चेहरा स्वच्छ धुवून बोरोलिनने  मसाज करा. यामुळे त्वचेचा पोत सुधारेल आणि स्किन इन्फेक्शनपासूनही बचाव होईल. याचे पॅकेजिंग पण खूपच साधे आणि सहज ओपन करता येते. थिक टेक्स्चरमुळे ही क्रिम कधी कधी त्वचेला तेकटही बनवू शकते.

बोरोलिनचे त्वचेला होणारे फायदे (Benefits Of Using Boroline in Winter)

1) नाईट क्रिम

आपला चेहरा फेसवॉशने व्यवस्थित धुवून घ्या त्यानंतर चेहऱ्याला बोरोलिन लावा. यातील इमोलिएंट्स त्वचेला मॉईश्चराईज ठेवतात. जर तुमची त्वचा फारच तेलकट असेल तर बोरोलिनचा वापर टाळा. नाईट क्रिमच्या स्वरूपात तुम्ही बोरोलिनचा वापर करू शकता. ज्यामुळे त्वचा मऊ, कोमल राहते आणि चमकदार दिसते.

केस फार पातळ झालेत? तुळशीच्या पानांचा १ जादूई उपाय, कंटाळा येईल इतके दाट-लांब होतील केस

2) ओठ मऊ राहतात.

झोपण्याच्या आधी  ओठ क्लिन करून आठवड्यातून २ वेळा बोरोलिन ओठांना लावा आणि  स्क्रब करा. त्यानंतर तुमचे ओठ मऊ, मुलायम आणि गुलाबी दिसतील. ओठ फाटले असतील तर बोरोलिन लावल्यानंतर मऊ होतील.  

3) ढोपर आणि कोपर

बोरोलिनमध्ये लॅनोलिन असते.  ड्राय झालेल्या  कोपरांना आणि  गुडघ्यांना रोज अंघोळ  केल्यानंतर तुम्ही ही क्रिम लावू शकता. या क्रिमने मालिश केल्यानंतर हळूहळू कोपर मऊ होऊ लागतील.

१ वाटी उरलेल्या भाताचा १ सोपा उपाय त्वचेवर करा; गोल्ड फेशियलपेक्षा जास्त ग्लो चेहऱ्यावर येईल

4) नखं सुंदर दिसण्यासाठी

  बोरोलिनने नखं मऊ आणि चमकदार, सुंदर होतात. झोपण्याच्या आधी १ ते २ मिनिटं बोरोलिन लावून नखांची मसाज करा. एका आठवड्याच्या आतच नखांमध्ये फरक दिसून येईल. 

5) कोरडे पॅचेस

बदलत्या वातावरणात त्वचेवर कोरडे पॅच यायला सुरूवात होते. यामुळे त्वचेवर खाज येऊ लागते. प्रभावित जागेवर बोरोलिन लावल्यानं त्वचा मऊ होते आणि त्वचेचे विकारही उद्भवत नाहीत. रात्रीच्यावेळी बोरोलिनचा वापर करा. यामुळे सकाळी त्वचेवर ग्लो येईल.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी