व्हॅसलिन (Vaseline) एक अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाच्याच घरी असते. हे एक असं कॉस्मेटीक आहे सर्वच त्वचेपासून, केसांपर्यंत तसंच घरातल्या इतर कामात वापरले जाते. निळ्या झाकणाच्या डब्बीतील पेट्रोलियम जेली तुम्ही तुम्ही प्रवासात कुठेही नेऊ शकता, व्हॅसलिनच्या वापराचे अनेक फायदे आहेत. (Vaseline Blue Seal Original Pure Petroleum Jelly) ५ रूपयांपासून ते २५० रुपयांपर्यंतच्या किमतीत तुम्हाला व्हॅसलिन उपलब्ध होईल. व्हॅसलिनचे फायदे पाहूयात.
१) ओठ फाटू नयेत यासाठी
थंडीत ओठ काळे पडतात. ओठांवर मऊपणा येण्यासाठी अनेक वर्षांपासून व्हॅसलिनचा वापर केला जात आहे. चमकदार ओठ आणि फिनिशिंगसाठी तुम्ही ओठांवर व्हॅसलिन पेट्रोलियम जेली लावू शकता.
२) केसांना फाटे फुटत नाही-
प्रदूषण, धूळ मातीमुळे केसांना फाटे फुटतात. फ्रिजी केसांना स्ट्रेट करण्याासठी तसंच केसांवर फाटे फुटू नये यासाठी तुम्ही व्हॅलसिनचा वापर करू शकता.
३) पापण्या जाड दिसतात
आपल्या पापण्या, दाट-सुंदर दिसाव्यात अशी प्रत्येकाची इच्छा असते. व्हॅसलिनच्या वापराने तुम्ही सुंदर पापण्या मिळवू शकता. रात्री झोपताना पाण्यांना व्हॅलसिन लावा. यासाठी थोडावेळ लागेल पण परिणाम दिसून येईल.
४) परफ्यूमचचा स्मेल टिकून राहतो
आपण लावेलल्या परफ्यूमचा स्मेल लगचे उडून जातो अशी अनेकांची तक्रार असते. अशावेळी तुम्ही हा स्मेल टिकून राहण्यासाठी मानेवर किंवा हाताच्या मनगटावर आधी परफ्यूम लावण्याआधी व्हॅसलिन लावू शकता.
५) आयब्रोजचे केस दाट दिसतात
जर तुमचे आयब्रोज जास्त पातळ असतील तर तुम्ही व्हॅसलिन लावून आयब्रोजना दाट बनवू शकता. ब्रश किंवा जुन्या मस्कारा घेऊन तुम्ही व्हॅसलिन आयब्रोजना लावा. ज्यामुळे आयब्रोज दाट दिसतील.
६) मेकअप करताना हायलाईट
मेकअप करतान हायहायलाटयर नसेल किंवा संपले अेल तर तुम्ही व्हॅसलिनचा वापर करू शकता. व्हॅसलिन एक स्वस्त हायलायटर आहे. बोटांच्या साहाय्याने गालांना लावू शकता.
७) मेहेंदी लावण्याआधी
केसांना मेहेंदी लावण्याआधी कानांना किंवा चेहऱ्याच्या वरच्या भागात आधी व्हॅसलिन लावा जेणेकरून मेहेंदीचे डाग लागणार नाहीत.
८) बुटांवर वापर
बुटांवर स्क्रॅचेच येतात. हे टाळण्यासाठी आधी व्हॅसलिन लावा. यामुळे बुट अधिक चमकदार दिसतील.
९) स्किनसाठी फायदेशीर
टॅटू काढण्याच्या एक आठवडाआधी तुम्हाला जास्त काळजी घ्यावी लागेल. त्या ठिकाणी व्हॅसलिन लावा त्यामुळे खाज-जळजळ होणार नाही.
१० ) हेअर स्पा
व्हॅसलिनमध्ये पाणी मिसळून तुम्ही या जेलने तुम्ही केसांची मसाज करू शकता. यामुळे घरच्याघरी हेअर स्पा करता येईल.