Join us

सनस्क्रिन लावल्यानंतर चेहरा जास्तच काळपट-तेलकट दिसतो? 'या' पद्धतीने लावा- चेहरा दिसेल फ्रेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2025 17:37 IST

Proper Method Of Applying Sunscreen Lotion On Face: सनस्क्रिन लोशन लावल्यानंतर चेहरा खूपच काळपट, तेलकट दिसतो असा अनेकींचा अनुभव आहे (how to apply sunscreen?). म्हणूनच या काही टिप्स...(why skin get oily after applying sunscreen?)

ठळक मुद्देतुम्हालाही असाच अनुभव येत असेल तर त्यासाठी काय करायचं ते पाहुया

बहुतांश ब्यूटी एक्सपर्ट असं सांगतात की सनस्क्रिन लोशन हा आपल्या स्किन केअर रुटीनचा भाग असायलाच हवा. फक्त उन्हाळ्यातच नाही तर अगदी वर्षभर तुम्ही नियमितपणे सनस्क्रिन लावायला हवं. शिवाय घराच्या बाहेर पडायचं असेल तरच सनस्क्रिन लावायचं असंही नाही. तुम्ही घराच्या बाहेर पडो अथवा घरातच राहो तरीही त्वचेला जपण्यासाठी सनस्क्रिन लावणं गरजेचं असतं असं तज्ज्ञ सांगतात. हे सगळं ऐकून बऱ्याचजणी सनस्क्रिन लोशन लावायला सुरुवात करतात. एरवी नाही लावलं तरी उन्हाळ्यात मात्र आवर्जून लावतात. पण त्यापैकी कित्येक जणींना असा अनुभव येतो की सनस्क्रिन लावल्यानंतर पुढच्या काही वेळातच चेहरा खूपच काळपट वाटू लागतो आणि तेलकट होऊन जातो (Proper Method Of Applying Sunscreen Lotion On Face). त्यामुळे मग काही दिवसांनी सनस्क्रिन लावणं बंद केलं जातं (why skin get oily after applying sunscreen?). 

 

सनस्क्रिन लोशन लावताना काय काळजी घ्यावी?

चेहरा धुतल्यानंतर सगळ्यात आधी चेहऱ्याला व्यवस्थित माॅईश्चराईज करा. चेहरा माॅईश्चराईज झाल्यानंतर दोन ते तीन मिनिटांचा वेळ जाऊ द्या आणि त्यानंतर सनस्क्रिन लावा. 

तुळशीची पानं पिवळी पडून गळू लागली? 'हा' पांढरा पदार्थ घाला- तुळस नेहमीच राहील हिरवीगार

चेहऱ्याला जर खूप सनस्क्रिन लावलं तर टॅनिंग कमी होईल असं अनेकांना वाटतं. पण असं काही नसतं. जेवढी गरज असते तेवढंच सनस्क्रिन पुरेसं आहे. त्यामुळे साधारणपणे तुम्ही माॅईश्चरायजर जेवढं घेता तेवढंच सनस्क्रिन घ्या. फक्त ते लावत असताना ते तुमच्या चेहऱ्यावर समप्रमाणात सगळीकडे लागलं जाईल याची काळजी घ्या.

 

सनस्क्रिन लोशन लावल्यानंतर लगेचच पुढच्या मेकअपला सुुरुवात करू नका. ते लावल्यानंतर ७ ते ८ मिनिटांचा वेळ जाऊ द्या. ते व्यवस्थित सेट हाेऊ द्या आणि त्यानंतरच पुढचा मेकअप करा. सनस्क्रिन लावल्यानंतर लगेचच उन्हात जाऊ नका.

उन्हामुळे टॅनिंग होऊन हात खूप काळे पडले? २ सोपे घरगुती उपाय- हात होतील स्वच्छ, उजळ

तज्ज्ञ असं सांगतात की सनस्क्रिन लावल्यानंतर त्याचा परिणाम चेहऱ्यावर पुढचे ९० मिनिटे ते २ तास एवढ्या काळापुरताच राहात असतो. त्यामुळे त्यानंतर पुन्हा सनस्क्रिन लावून घ्यावे. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडीसमर स्पेशल