हल्ली कमी वयातच केस पांढरे होण्याचे प्रमाण खूप जास्त वाढले आहे. कॉलेजमध्ये जाणाऱ्या तरुण मुला-मुलींचेही केस पांढरे झालेले दिसत आहेत. केस असे अकाली पांढरे झाले की आत्मविश्वास आपोआपच कमी होतो. म्हणूनच मग पांढरे झालेले केस आपण रंगविण्याचा प्रयत्न करतो. केस रंगविण्यासाठी केमिकल्स असणारे डाय किंवा हेअर कलर कमी वयातच वापरायला नको वाटतं. म्हणूनच मग त्यातल्या त्यात सुरक्षित असणारा मेहेंदीचा पर्याय आपण निवडतो. पण मेहेंदीमुळे केसांना लालसर छटा येते. ती अनेकांना आवडत नाही (how to apply mehendi on hair for getting natural dark shade?). तुमच्या बाबतीतही तसंच असेल तर एकदा पुढे सांगितलेल्या पद्धतीने मेहेंदी भिजवून केसांना लावून पाहा (proper method of soaking mehndi for hair). केसांना छान नॅचरल शेड मिळेल.(Beauty Tips For Applying Mehndi On Hair)
केसांना मेहेंदी लावण्याची योग्य पद्धत
केसांना काळसर चॉकलेटी किंवा नॅचरल काळी शेड यावी यासाठी मेहेंदी नेमकी कोणत्या पद्धतीने भिजवावी, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ डॉक्टरांनी drmanojdasjaipur या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.
कुछ भी! नहीं तूम बोलो!- या नावाचे पदार्थ खायचे का तुम्हाला? खाण्यापेक्षा हसालच जास्त कारण..
तुम्ही केसांना लावायला २०० ग्रॅम मेहेंदी घेत असाल तर त्यासाठी इतर पदार्थ किती प्रमाणात घ्यावेत, ते लक्षात घ्या.. जर मेहेंदी कमी- जास्त झाली तर त्यानुसार इतर पदार्थांचे प्रमाणही कमी- जास्त करा.
सगळ्यात आधी तर एका भांड्यात २०० ग्रॅम मेहेंदी घ्या. त्यामध्ये २० ग्रॅम कॉफी पावडर टाका.
त्यामध्ये तेवढ्याच प्रमाणात म्हणजेच २० ग्रॅम एवढी चहा पावडर टाकायची आहे. अनेक जणी चहा पावडरचे पाणी करून त्यात मेहेंदी भिजवतात. पण त्या मिश्रणाचा म्हणावा तसा उपयोग होत नाही.
रिफाईंड ऑईल खाणं चांगलं की घाण्याचं तेल? तज्ज्ञ सांगतात कोणतं तेल कशासाठी वापरावं...
त्यामुळे चहा पावडर जर जाड असेल तर ती मिक्सरमध्ये फिरवून बारीक करून घ्या आणि मग ती मेहेंदीमध्ये टाका.
याच मिश्रणात ८ ते १० लवंगा गॅसवर भाजून त्यांची पावडर करून टाका.
त्यानंतर ४ ते ५ मध्यम आकाराचे तेज पान घ्या. ते देखील तव्यावर भाजून घ्या आणि त्याची पावडर करून मेहेंदीमध्ये घाला.
सकाळी उठताना 'ही' चूक करणं पडेल महागात! बीपी वाढून तब्येत बिघडण्याचा धोका- तज्ज्ञ सांगतात...
शेवटचा पदार्थ म्हणजे २ टेबलस्पून भाजलेली हळद. हे सगळे मिश्रण एकत्र करा आणि कडक पाण्यात ते भिजवा. मेहेंदी भिजविण्यासाठी नेहमी कडक पाणी वापरावे. ही मेहेंदी ४ ते ५ तास भिजू द्या आणि नंतर केसांना लावा.
केसांना लावल्यानंतर ३ ते ४ तासांनी केस धुवून घ्या. केसांना छान डार्क रंग येईल.