Lokmat Sakhi >Beauty > १ चमचा मेथी दाणे आणि चमचाभर कोरफड जेल, केसातला कोंडा होईल कमी- खास उपाय...

१ चमचा मेथी दाणे आणि चमचाभर कोरफड जेल, केसातला कोंडा होईल कमी- खास उपाय...

Use fenugreek seeds and aloe vera for better hair growth : केस गळणं आणि कोंडा या दोन गोष्टी हैराण करतात, त्यासाठीच हा खास घरगुती सोपा हेअरपॅक, कोंडा होईल गायब...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2023 07:23 PM2023-06-23T19:23:56+5:302023-06-23T19:41:49+5:30

Use fenugreek seeds and aloe vera for better hair growth : केस गळणं आणि कोंडा या दोन गोष्टी हैराण करतात, त्यासाठीच हा खास घरगुती सोपा हेअरपॅक, कोंडा होईल गायब...

Protect yourself from hair problems with these fenugreek seeds & aloevera gel hair masks | १ चमचा मेथी दाणे आणि चमचाभर कोरफड जेल, केसातला कोंडा होईल कमी- खास उपाय...

१ चमचा मेथी दाणे आणि चमचाभर कोरफड जेल, केसातला कोंडा होईल कमी- खास उपाय...

सुंदर आणि घनदाट केस सगळ्यांनाच आवडतात परंतु सध्याच्या बदलत्या लाइफस्टाइलमुळे अनेकांना केसांसंबंधित अनेक तक्रारी निर्माण होतात. या केसांच्या वारंवार उद्भवणाऱ्या समस्यांकडे वेळीच लक्ष दिले नाही तर केसांचे मोठे नुकसान होऊ शकते. केसांना योग्य पोषण मिळालं नाही तर केसगळतीची समस्या सुरु होते. केस गळणे ही एक सामान्य समस्या झाली आहे. आजकाल तरुणांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच केस गळतीने अक्षरश:  हैराण केले आहे. बऱ्याचदा धूळ-माती, चुकीची उत्पादने, सौंदर्य उत्पादनांचा अतिवापर यामुळे देखील केसांच्या अनेक समस्या उद्भवतात. बऱ्याचदा आपण पार्लरमध्ये जाऊन आपल्या केसांवर वेगवेगळे प्रयोग करतो. यामुळे केसांची अधिक हानी होते. अनेकदा तर आपण केसांच्या आरोग्यासाठी महागडी प्रॉडक्ट्स, शॅम्पू, हेअर मास्क, तेल यांसारख्या असंख्य गोष्टींचा भडीमार आपल्या केसांवर करत असतो. परंतु याने केसांमध्ये थोड्याफार प्रमाणात फरक पडतो किंवा काहीवेळा तर केस अधिकच खराब होऊन नवीन समस्या उद्भवतात. 

केसांच्या अनेक समस्यांना नाहीसे करण्यासाठी आपण घरच्या घरी हेअर मास्क बनवून त्याचा वापर करू शकतो. मेथी दाणे व एलोवेरा जेल हे आपल्या केसांच्या आरोग्यासाठी फारच उपयुक्त ठरतात. या दोन्ही घरगुती गोष्टींचा वापर करून आपण हेअर मास्क घरच्या घरी बनवून केसांना लावू शकतो. केसांच्या सौंदर्यासाठी मेथी दाणे व एलोवेरा जेल यांचा हेअर मास्क नेमका कसा बनवायचा हे पाहूयात(Protect yourself from hair problems with these fenugreek seeds & aloevera gel hair masks). 

मेथी दाणे व एलोवेरा जेल यांचा हेअर मास्क नेमका कसा बनवायचा :- 

केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी केसांवर मेथी दाणे व एलोवेरा जेलचा हेअर मास्क बनवण्यासाठी १ चमचा मेथी दाणे रात्रभर पाण्यांत भिजत घालावेत. दुसऱ्या दिवशी या मेथी दाण्यातील पाणी काढून घेऊन हे दाणे मिक्सरला लावून त्याची बारीक पेस्ट करून घ्यावी. मेथी दाण्याची बारीक पेस्ट करून झाल्यानंतर त्यात एलोवेरा जेल मिसळून घ्यावे. आपला मेथी दाणे व एलोवेरा जेलचा हेअर मास्क तयार आहे.

जास्वंद-मोगरा घालून केलेलं तेल लावा, विसरा केसाच्या समस्या! ऋजुता दिवेकरच्या आईने शेअर केला खास उपाय...

आता हा तयार हेअर मास्क केसांच्या मुळांपासून ते टोकांपर्यंत लावून हलक्या हातांनी मसाज करून घ्यावा. मसाज केल्यांनतर किमान १ तास हा हेअर मास्क केसांना तसाच लावून ठेवावा. १ तासानंतर केस पाण्याने धुवून स्वच्छ करून घ्यावे. केसांचे आरोग्य व सौंदर्य चांगले राखण्यासाठी हा हेअर मास्क महिन्यातून किमान २ ते ३ वेळा केसांवर लावावा. 

प्रियांका चोप्राची आई मधू चोप्रा सांगतात, खास घरगुती फेसपॅक - चमचाभर गव्हाच्या पिठाची जादू...

तुम्ही हमखास ५ चुका करता, म्हणून तर तुमचे केस गळतात! महागडी प्रॉडक्ट्स वापरुन मग काय उपयोग...

मेथी दाणे व एलोवेरा जेल यांचा हेअर मास्क लावण्याचे फायदे :- 

१. मेथी दाण्याच्या वापराने केसांतील कोंडा कमी होण्यास मदत होते. 

२. मेथी दाण्याच्या वापराने केस गळतीची समस्या कमी होऊन केसांच्या वाढीवर भर दिला जातो. 

३. या हेअर मास्कमुळे केसांची नैसर्गिक चमक परत येऊन केसांना फाटे फुटण्याची समस्या कमी होते. 

४. एलोवेरा जेलमध्ये असणाऱ्या अँटीमायक्रोबियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणांमुळे रुक्ष व निस्तेज झालेले केस पुन्हा नव्याने तजेलदार होण्यास मदत मिळते.

Web Title: Protect yourself from hair problems with these fenugreek seeds & aloevera gel hair masks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.