भेंडीची भाजी (Okra) न खाणारा व्यक्ती क्वचितच सापडेल. प्रत्येकाला भेंडीची भाजी आवडते. भेंडीची भाजी, भरली भेंडी, भेंडी मसाला आपण खाल्लीच असेल. भेंडीतील गुणधर्म आरोग्यासाठी फायदेशीर ठरतातच, पण भेंडीचा वापर आपण कधी केसांसाठी करून पाहिलं आहे का? आता तुम्ही म्हणाल चिकट भेंडी केसांसाठी फायदेशीर कशी ठरेल?
हिवाळ्यात केस फार राठ, ड्राय आणि मोठ्या प्रमाणात गळतात. यावर उपाय म्हणून आपण भेंडीचा वापर करू शकता. भेंडीतील जीवनसत्त्वे आणि खनिजे केसांच्या मुळांना पोषण देतात (Bhendi for Hair). शिवाय निरोगी केसांच्या वाढीस प्रोत्साहन देतात. ज्यामुळे केस सिल्की आणि केसांच्या वाढीस मदत करतात. पण भेंडीचा नेमका वापर केसांसाठी कसा करावा? पाहूयात(Put Okra To Your Hair And See What Happens).
हिवाळ्यात स्किन ड्राय-टॅन झाली? २ चमचे हळदीचा सुपरडुपर उपाय; १० मिनिटात चेहरा फ्रेश
केसांच्या वाढीसाठी भेंडीचा वापर कसा करावा?
सर्वप्रथम, भेंडी धुवून बारीक चिरून घ्या. नंतर एका भांड्यात पाणी घ्या, त्या पाण्यात चिरलेली भेंडी घाला. मध्यम आचेवर गॅस ठेवा, आणि उकळी येऊ द्या. पाण्याला उकळी आल्यानंतर एका बाऊलवर गाळणी ठेवा. त्यात पाणी गाळून आणि भेंडी वेगळी करा.
मानेचा काळपटपणा होईल अर्ध्या टोमॅटोने दूर, पाहा इन्स्टंट उपाय; डाग होतील गायब-मान चमकेल
भेंडीचं पाणी वेगळं केल्यानंतर थंड होऊ द्या. पाणी थंड झाल्यानंतर केस विंचरून घ्या, स्काल्प आणि केसांवर तयार भेंडीचे जेल लावा. एका तासानंतर शाम्पूने केस धुवून घ्या. आपण या जेलचा वापर आठवड्यातून २ वेळा करू शकता. यामुळे स्काल्प क्लिन होईल, शिवाय केस मुलायम आणि शाईन करतील.