Lokmat Sakhi >Beauty > स्वयंपाकघरातील ५ पदार्थांचा १ लहानसा गोळा चेहऱ्यावर करतो जादू ! चमक अशी की लोक विचारतील सिक्रेट...

स्वयंपाकघरातील ५ पदार्थांचा १ लहानसा गोळा चेहऱ्यावर करतो जादू ! चमक अशी की लोक विचारतील सिक्रेट...

Remove tan from hands, legs at home, with visible results in just one use : १५ मिनिटांत स्किन टॅनिंगची समस्या दूर करण्याचा हा एक सोपा घरगुती उपाय ठरेल फायदेशीर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2024 03:21 PM2024-06-27T15:21:33+5:302024-06-27T15:32:06+5:30

Remove tan from hands, legs at home, with visible results in just one use : १५ मिनिटांत स्किन टॅनिंगची समस्या दूर करण्याचा हा एक सोपा घरगुती उपाय ठरेल फायदेशीर...

Quick and Effective Natural Remedies to Remove Skin Tan at Home Simple Home Remedies To Remove Tan Highly effective home remedies to remove Sun tan SHARED SECRETS TO NATURALLY REMOVING TAN AT HOME | स्वयंपाकघरातील ५ पदार्थांचा १ लहानसा गोळा चेहऱ्यावर करतो जादू ! चमक अशी की लोक विचारतील सिक्रेट...

स्वयंपाकघरातील ५ पदार्थांचा १ लहानसा गोळा चेहऱ्यावर करतो जादू ! चमक अशी की लोक विचारतील सिक्रेट...

स्किन टॅन ही एक कॉमन समस्या झाली आहे. स्किनच्या अनेक समस्यांपैकी स्किन टॅन ही एक मोठी समस्या आहे. कडक उन्हामुळे बहुतेक जणांची स्किन काळी पडते आणि त्वचेवर एक प्रकारचा थर जमा होतो, यालाच स्किन टॅन म्हणतात. सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांमुळे आपल्या स्किनचे नुकसान होते. तळपत्या, कडक उन्हापासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीनचा उपयोग आपण करतो. पण तरीही आपली स्किन लगेच टॅन होते(Home Remedies to Remove Tan from Face, Hands, Arms, and Feet).

सूर्याच्या तीव्र किरणांमुळे (Simple Home Remedies To Remove Tan) स्किनचे अनेक प्रकारे नुकसान होते. थेट कडक सूर्यप्रकाशात स्किन उघडली राहिली तर त्यामुळे त्वचेवर काळपटपणा येतो. त्वचेचा हा काळपटपणा चेहरा, मान, हात, पाय (How to remove tan from body immediately at home) यांसारख्या मुख्य अवयवांवर जास्त प्रमाणात दिसून येतो. स्किन टॅन झाल्यामुळे तुमचा पूर्ण लूक खराब होतो. टॅनिंगच्या या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी आपण अनेक क्रिम, लोशन्स किंवा वेगवेगळे उपाय करुन पाहतो. सनस्क्रीन व्यतिरिक्त स्किन टॅन होऊ नये म्हणून तुम्ही पुढील काही घरगुती उपायांचा देखील उपयोग करू शकता(Highly effective home remedies to remove Sun tan).

साहित्य :- 

१. गव्हाचे पीठ - ४ टेबलस्पून 
२. हळद - १ टेबलस्पून 
३. तूप -  १ टेबलस्पून 
४. तिळाचे तेल - २ टेबलस्पून 
५. दूध - गरजेनुसार 

कृती :- 

१. एका बाऊलमध्ये गव्हाचे पीठ घेऊन त्यात हळद, तूप, तिळाचे तेल घालून घ्यावे. 
२. आता या मिश्रणात गरजेनुसार दूध घालून कणकेसारखे पीठ मळून घ्यावे.
३. हे पीठ मळून घेताना त्यात दूध गरजेनुसारच घालावे, जास्त प्रमाणांत दूध घातल्यास हे पीठ चिकट होऊ शकते. 
४. या पिठाची कणीक मळताना ती थोडी घट्टसरच मळावी.  

नखांवरील नेलपेंट काढण्यासाठी नेलपेंट रिमूव्हर नाही ? मग वापरा या '५' घरगुती गोष्टी... 

आता फक्त ५ सोप्या स्टेप्समध्ये घरच्याघरी करा बॉडी पॉलिशिंग, पार्लरमध्ये जाऊन मिळणार नाही इतका ग्लो!

आता हे मळून घेतलेले पीठ शरीराच्या ज्या भागांवर टॅन झाले आहे त्या भागांवर अलगद फिरवून मसाज करावा. या पिठाच्या गोळ्याने मसाज केल्यावर १० ते १५ मिनिटानंतर स्किनचा तो भाग स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा. या उपायाचा वापर केल्याने आपली टॅनिंग झालेली त्वचा पुन्हा चमकदार होण्यास मदत मिळते. 

१. हळदीमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट असतात ज्याचा वापर त्वचेचा रंग उजळण्यासाठी केला जातो. दुधाच्या वापरामुळे त्वचेचे आरोग्य सुधारते आणि हानिकारक किरणांमुळे होणारे त्वचेचे नुकसान भरून काढण्यासही मदत होते. हे दोन्ही एकत्र लावल्याने त्वचा नैसर्गिकरित्या चमकते. 

२. तुपामुळे त्वचा मऊ व नितळ होण्यास मदत मिळते. 

३. गव्हाचे पीठ त्वचेवरील टॅनिंग दूर करण्यास फायदेशीर ठरते.

Web Title: Quick and Effective Natural Remedies to Remove Skin Tan at Home Simple Home Remedies To Remove Tan Highly effective home remedies to remove Sun tan SHARED SECRETS TO NATURALLY REMOVING TAN AT HOME

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.