Lokmat Sakhi >Beauty > साऊथ इंडियन तरूणींच्या लांबसडक दाट केसाचं सिक्रेट; १ सोपं काम करा, भराभर वाढतील केस

साऊथ इंडियन तरूणींच्या लांबसडक दाट केसाचं सिक्रेट; १ सोपं काम करा, भराभर वाढतील केस

How to make south indian hair mask long hair secret at home : हा हेअर मास्क केसांना लावल्यानं हळूहळू केस गळती थांबून केसांची चांगली वाढ झालेली पाहायला मिळेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 12:48 PM2023-07-06T12:48:00+5:302023-07-06T14:30:26+5:30

How to make south indian hair mask long hair secret at home : हा हेअर मास्क केसांना लावल्यानं हळूहळू केस गळती थांबून केसांची चांगली वाढ झालेली पाहायला मिळेल.

Quick home remedy for hair growth : How to make south indian hair mask long hair secret | साऊथ इंडियन तरूणींच्या लांबसडक दाट केसाचं सिक्रेट; १ सोपं काम करा, भराभर वाढतील केस

साऊथ इंडियन तरूणींच्या लांबसडक दाट केसाचं सिक्रेट; १ सोपं काम करा, भराभर वाढतील केस

आपले केस दाट- लांबसडक असावेत असं प्रत्येकालाच वाटत असतं. लांब केसांसाठी मुली वेगवेगळे उपाय करतात. अनेक साऊथ इंडीयन तरूणींचे केस दाट, झुपकेदार असतात. (Hair secrets remedies) महिन्याभरात केस वाढवण्यासाठी एक सोपा उपाय सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Quick home remedy for hair growth)  यामध्ये घरगुती साहित्याचा वापर करून तुम्हाला एक हेअर मास्क तयार करावा लागेल. (How to make south indian hair mask long hair secret at home)

हा हेअर मास्क केसांना लावल्यानं हळूहळू केस गळती थांबून केसांची चांगली वाढ झालेली पाहायला मिळेल. हा हेअर मास्क बनवण्यासाठी सगळ्यात आधी १ चमचा पांढरे तीळ, १ चमचा मेथीच्या बीया आणि १५ ते १६ कढीपत्त्याची पानं घ्या. हे साहित्य मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. त्यानंतर एका छोट्या प्लास्टीकच्या भांड्यात हे मिश्रण काढून ठेवा. त्यानंतर यात नारळाचं तेल मिसळा.

 

शेवटी  हे भांडं ३ दिवसांसाठी उन्हात ठेवा. ३ दिवसांनी केस धुण्याच्या ३ तास आधी हे तेल केसांना लावा. नंतर शॅम्पू आणि पाण्यानं केस स्वच्छ धुवा.  या उपायानं केस नैसर्गिकरित्या मजबूत राहतील आणि लांब-दाटही दिसतील. आवळ्याचे पाणी केस धुण्यासाठी उत्तम ठरते.  आवळ्याची पेस्ट करून तुम्ही हेअर मास्क लावू शकता. त्यातील  व्हिटामीन सी केस आणि त्वचेसाठी फायदेशीर ठरते. यात आयर्नचे प्रमाण भरपूर असते. केसांच्या आरोग्यासाठी उत्तम ठरते. 

१) छोट्या  केसांच्या तुलनेत मोठे केस विंचरायला जास्तवेळ लागतो. कारण लांब केस खूप गुंता होतात. अशावेळी केस कमकुवत होऊन तुटू लागतात. केस नेहमी मोठ्या दातांच्या फणीनं विंचरा.

२) रात्री झोपताना केस मोकळे ठेवण्याची चूक करू नका. रात्री सतत उशीला घासले गेल्यानं केस टुटतात किंवा गुंता होतात. याशिवाय कोरडेसुद्धा होतात. झोपताना सैल वेणी घालून केस बांधा.

३) केसांना पोषण मिळण्यासाठी तेलाची आवश्यकता असते. पण  लांब केसांना याची जास्त गरज असते. तुम्हाला कितीही घाई असेल तरीही केसांना आठवड्यातून २ वेळा ऑयलिंग करा.

४) लांब केसांची हेअर स्टाईल करायला बराचवेळ लागतो म्हणूनच लोक हेअर स्प्रे चा वापर करतात. पण याचा जास्त वापर केल्यानं केस रुक्ष आणि कोरडे होतात. म्हणून याचा जास्त वापर करणं टाळा.
 

Web Title: Quick home remedy for hair growth : How to make south indian hair mask long hair secret

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.