Lokmat Sakhi >Beauty > झूम मिटिंग, ऑनलाईन इंटरव्ह्यूसाठी सोप्या मेकअप टिप्स; वाचा डिसेंट लूकसाठी काय करायचं, काय नाही

झूम मिटिंग, ऑनलाईन इंटरव्ह्यूसाठी सोप्या मेकअप टिप्स; वाचा डिसेंट लूकसाठी काय करायचं, काय नाही

Quick & simple Makeup Tips for zoom Meeting : व्हर्च्युअल मीटिंग वर्क फ्रॉम होम रूटीन चा एक हिस्सा बनलं आहे.  घरच्याघरी जास्त मेकअप न करतासुद्ध तुम्ही ग्लोईंग डिसेंट लूक मिळवू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 06:29 PM2021-05-19T18:29:31+5:302021-05-19T18:43:14+5:30

Quick & simple Makeup Tips for zoom Meeting : व्हर्च्युअल मीटिंग वर्क फ्रॉम होम रूटीन चा एक हिस्सा बनलं आहे.  घरच्याघरी जास्त मेकअप न करतासुद्ध तुम्ही ग्लोईंग डिसेंट लूक मिळवू शकता.

Quick & simple Makeup Tips for zoom Meeting, interviews, virtual meeting | झूम मिटिंग, ऑनलाईन इंटरव्ह्यूसाठी सोप्या मेकअप टिप्स; वाचा डिसेंट लूकसाठी काय करायचं, काय नाही

झूम मिटिंग, ऑनलाईन इंटरव्ह्यूसाठी सोप्या मेकअप टिप्स; वाचा डिसेंट लूकसाठी काय करायचं, काय नाही

Highlightsऑनलाईन मिटिंगआधी आपल्याकडे फक्त 10 मिनिटे असतील तर फक्त मॉइश्चरायझर लावा.

कोरोनामुळे आता ऑफिसच्या मिटिंग असो किंवा कोणताही कार्यक्रम सगळं काही ऑनलाईनच अटेंड करावं लागत आहे. बाहेर जायचं म्हटलं तर आपण नेहमीच नवीन, फ्रेश ड्रेसअप करून, मेकअप करून जातो. घरच्याघरी व्यवस्थित दिसायचं असेल पण जास्त तयारी  करायचा कंटाळा आलाय तर काय करता येईल याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.  व्हर्च्युअल मीटिंग वर्क फ्रॉम होम रूटीन चा एक हिस्सा बनलं आहे.  घरच्याघरी जास्त मेकअप न करतासुद्ध तुम्ही ग्लोईंग डिसेंट लूक मिळवू शकता.  त्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही सिंपल टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहोत.

सगळ्यात आधी त्वचेला मॉईश्चराईज  करा

ऑनलाईन मिटिंगआधी आपल्याकडे फक्त 10 मिनिटे असतील तर फक्त मॉइश्चरायझर लावा. “मॉइस्चराईजरनं त्वचा चमकते. जी ऑनलाइन कॉलवर देखील ओळखण्यायोग्य असते. त्वचा व्यवस्थित डायड्रेट ठेवल्यास ती नेहमीच ग्लोईंग दिसते. याशिवाय तुम्ही तुमच्या तोंडाला नियमित तेलसुद्धा लावू शकता. 

ओठांवर लिपबाम किंवा लिपस्टिक लावा

ठळक, व्यवस्थित ओठांची ठेवण नेहमीच आपला आत्मविश्वास वाढवत असते. ऑफिस मिटिंगसाठी तुम्ही हलकी डार्क शेडची लिपस्टिक लावू शकता. जर तुम्हाला मेकअप लूक नको असेल तर लिपबामसुद्धा लावू शकता. यामुळे तुमचे ओठ अगदी चमकदार दिसतील. 

डोळ्यांचा मेकअप

आपले डोळे चांगले दिसण्यासाठी आपण लाईट मेकअपची निवड करू शकता. आपले डोळे मोठे दिसण्यासाठी आपण आपल्या पापण्यांवर मस्करा लावू शकता. ब्लू किंवा ब्लॅक आयलायनर तुमच्या डोळ्यांना चांगला लूक देण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. जाड पापण्या असतील तर त्यांनी पारदर्शक किंवा ब्राऊन मस्करा वापरावा. पापण्या बारीक असतील तर काळा मस्करा वापरावा .

ब्लश

जर तुमच्याकडे १० मिनिटांचा जास्तीचा वेळ असेल तर गालांवर काम करू शकता. गाल चमकदार आणि फ्रेश वाटण्यासाठी तुम्ही हलक्या हातानं ब्लश लावू शकता. ब्लश आणि लिपस्टीकचा रंग मॅच झाल्यास लूक आणखी चांगला दिसेल. लिपस्टिक ऐवजी तुम्ही डायरेक्ट टिंटेड लिप ग्लॉस पिंक, ब्राऊन किंवा पिच कलरमध्येही लावू शकता.  याशिवाय  क्लिनझिंग नंतर टोनिंगही आवश्यक. सध्या बाजारात खूप प्रकारचे टोनर्स आहेत पण स्वस्तात सोपा पर्याय म्हणजे गुलाब पाणी. अधेमधे कापसाने चेहऱ्याला लावा, ते कुठल्याही मेडिकल स्टोअरमध्ये सहज उपलब्ध होईल.

Web Title: Quick & simple Makeup Tips for zoom Meeting, interviews, virtual meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.