Join us  

राखीपौर्णिमेला दिसा सुंदर, फक्त १५ मिनिटांत व्हा झटपट तयार- ५ टिप्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2022 6:13 PM

Raksha Bandhan Special: राखी पौर्णिमेला झटपट तयार कसं व्हायचं, ड्रेसिंग- मेकअप- हेअरस्टाईल (makeup and hairstyle tips) याची तयारी आधीच कशी करून ठेवायची, याच्या या काही खास टिप्स...

ठळक मुद्देराखीपौर्णिमेला झटपट तयार व्हायचं असेल तर या काही टिप्स फॉलो करा.. अवघ्या अर्ध्या तासांत छानपैकी तयार व्हाल.

कोणताही सण- उत्सव असो.. जोपर्यंत आपण छानपैकी तयार होत नाही, त्या सणानुसार ड्रेसिंग करत नाही, तोपर्यंत आपल्याला काही सणाचा फिल येत नाही.. किंवा सण साजरा करतोय, असं वाटतंच नाही. आता लवकरच येणाऱ्या राखीपौर्णिमा सणाचही तसंच.. पण आजकाल राखीपौर्णिमेची सुटी अनेक ठिकाणी नसते. त्यामुळे एकतर भावाला गडबड असते किंवा मग बहिण- भाऊ दोघांच्या मागेही ऑफिसची धावपळ असते. म्हणूनच या दिवशी झटपट तयार व्हायचं असेल तर या काही टिप्स फॉलो करा.. अवघ्या अर्ध्या तासांत छानपैकी तयार व्हाल..(how to get ready fast during festive season?)

 

झटपट होण्यासाठी खास टिप्स..१. रात्रीच तयारी करून ठेवा..भावाला राखी बांधण्यासाठी आपण कोणते कपडे घालणार आहाेत, त्यावरचे दागिने कोणते, केसांची स्टाईल कशी करायची, याचा थाेडा विचार आधल्या दिवशी रात्रीच करून ठेवा आणि त्यानुसार कपडे, दागिने सगळं एका टेबलवर काढून ठेवा. त्याच्या जोडीला मेकअपचं सामानही वर काढून ठेवा. म्हणजे मग सगळं पक्क ठरलेलं असलं आणि सगळ्या गोष्टी हाताशी असल्या की फटाफट तयार होता येतं..

 

२. ड्रेसिंगची निवडबऱ्याचजणी साडीमध्ये खूप कम्फर्टेबल नसतात. तुमचंही तसंच असेल आणि मागे बरीच धावपळ असेल तर मग साडी नेसणं टाळाच. साडी व्यतिरिक्त इतर अनेक कपडेही तुम्हाला छानसा ट्रॅडिशनल लूक देऊ शकतात. त्यामुळे लेहेंगा, लाँग अनारकली  कुर्ता, ट्रॅडिशनल गाऊन, हेवी वर्क असलेला सलवार कुर्ता असे अनेक पर्याय तुम्ही फेस्टिव्ह लूकसाठी निवडू शकता. यात ट्रेण्डीतर दिसालच शिवाय वेळही वाचेल.

 

३. साडीच नेसायची असेल तर..भावाला साडी नेसूनच औक्षण करायचं आणि राखी बांधायची, असं ठरवलं असेल, शिवाय मागे खूप धावपळही असेल तर अशा वेळी खूप हेवी साडी नेसणं टाळा. एखादी कमी वजनाची, खूप हेवी वर्क नसलेली साडी निवडा. काही साड्या चटकन चापूनचोपून बसत नाहीत. त्यामुळे अशावेळी ज्या साड्या झटपट सेट होण्यासाठी खूप वेळ लागत नाही, अशा साड्या निवडा. 

 

४. हेअरस्टाईलकेस छान सेट केलेले असतील किंवा केसांवर खूप मेहनत घेण्याची गरज नसेल तर अशावेळी जसे आहेत तसे केस मोकळे सोडा. कारण ड्रेस असू द्या किंवा साडी असू द्या, कोणत्याही लूकवर माेकळे केस छानच दिसतात. एकदम माेकळे केस सोडणं नको असेल तर समोरच्या बाजूने थोडीशी स्टाईल बदला. लूकही बदलून जाईल. साडी नेसणार असाल आणि ट्रॅडिशनल लूक करायचा असेल तर केसांचे रेडीमेड हेअरबन मिळतात. त्यांचा वापर करा. यात खूप वेळही जाणार नाही. 

 

५. मेकअपड्रेसिंग झालं, हेअरस्टाईल झाली तरी तुमचा लूक तोपर्यंत पुर्ण होणार नाही, जोपर्यंत तम्ही मेकअपवर फोकस करणार नाही. झटपट मेकअप करण्यासाठी चेहरा आधी स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर चेहऱ्यावर बर्फाचा तुकडा फिरवा. सध्या दमट वातावरण आहे. त्यामुळे चेहरा बराच तेलकट होतो. त्यामुळे आपण खूप जास्त कॉस्मेटिक्स वापरणार नाहीत आणि आपल्याकडे तेवढा वेळही नाही. त्यामुळे प्रायमर, फाउंडेशन, कॉम्पॅक्ट, लिपस्टिक, काजळ, मस्कारा, आयशॅडो आणि आय लायनर एवढा मेकअप केला तरी पुरेसा आहे. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सरक्षाबंधनमेकअप टिप्स