Join us  

केस गळणं थांबण्यासाठी रामदेव बाबा सांगतात २ खास उपाय, केस वाढतील भराभर - राहतील काळेभोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2022 2:13 PM

Ramdev Baba's Remedies for Hair Growth: केस खूप गळत असतील किंवा कमी वयात पांढरे (gray hair) होत असतील तर रामदेव बाबांनी सांगितलेले हे २ उपाय करून बघा.(How to stop hair fall? )

ठळक मुद्देकेसांचं आरोग्य सुधारायचं असेल तर योगगुरू रामदेव बाबा यांनी सुचविलेले हे २ उपाय करून बघायला हरकत नाही.

आजकाल केसांची समस्या खूपच जास्त वाढली आहे. प्रदुषण, केसांवर वारंवार केले जाणारे केमिकल्सचे प्रयोग आणि आहारातूनही पुरेसं पोषण न मिळणे या सगळ्या गोष्टींमुळे प्रत्येकालाच केसांबाबत कोणती ना कोणती तक्रार आहे. शिवाय प्रत्येकाचंच रुटीन एवढं व्यस्त आहे की केसांची योग्य ती काळजी घेण्यासाठीही पुरेसा वेळ मिळत नाही. म्हणूनच तुमच्याकडे खूप वेळ नसेल पण केसांचं आरोग्य सुधारायचं असेल तर योगगुरू रामदेव बाबा यांनी सुचविलेले हे २ उपाय (Ramdev Baba's Remedies for Hair Growth) करून बघायला हरकत नाही. यामुळे केसांमध्ये नक्कीच सकारात्मक बदल दिसून येईल. 

 

केस गळणं थांबविण्यासाठी रामदेवबाबांनी सांगितलेले उपाय१. पहिला उपायकेस गळणं थांबविण्यासाठी किंवा केसांचं आरोग्य सुधारण्यासाठी रामदेव बाबांनी सांगितलेला हा पहिला उपाय जवळपास सगळ्यांनाच माहिती आहे आणि करायला अगदी सोपाही आहे.

हिवाळ्यातले सुपरफूड: वाढत्या थंडीत आजारपण टाळून फिट रहायचंय ना? मग ५ पदार्थ न चुकता खा

पण माहिती असूनही तो करण्यासाठी आपण टाळाटाळ करतो. हा उपाय म्हणजे दोन्ही हातांची नखे एकमेकांवर घासणे. दिवसांतून कधीही १० मिनिटांसाठी हा उपाय करून बघा. टीव्ही बघत असताना, पुस्तक वाचताना, गप्पा मारताना असं कधीही जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हा उपाय केला तरी चालतो.

 

२. दुसरा उपायरामदेव बाबांनी सांगितलेला दुसरा उपाय म्हणजे भोपळा आणि आवळा यांचा एकत्रित ज्यूस करून पिणे. या दोन्हींमध्ये असणारे पौष्टिक घटक केसांचं आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतात.

घ्या स्वत:ची परीक्षा आणि बघा तुमच्या शरीराचं नेमकं वय किती.. करून तर पाहा

सध्या आवळ्याचा हंगाम आहे. त्यामुळे आवळ्याचा फ्रेश ज्यूस घरी सहज करता येईल. पण जेव्हा आवळ्याचा सिझन नसेल तेव्हा आवळा कॅण्डी, मुरंबा असे आवळ्याचे कोणते ना कोणते पदार्थ आवर्जून खा, असंही रामदेव बाबा सांगतात. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी