Lokmat Sakhi >Beauty > दुर्गापूजेला राणी मुखर्जीने नेसली सुंदर गुलाबी सिल्क साडी, बघा तिच्या जरतारी साडीचा थाट

दुर्गापूजेला राणी मुखर्जीने नेसली सुंदर गुलाबी सिल्क साडी, बघा तिच्या जरतारी साडीचा थाट

Rani Mukharji's pink saree: अभिनेत्री आणि त्यांच्या महागड्या साड्या हा त्यांच्या चाहत्यांसाठी नेहमीच चर्चेचा विषय असतो. आता सध्या अशीच चर्चा सुरू आहे ती राणी मुखर्जीच्या सुंदर गुलाबी साडीची..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2022 10:27 AM2022-10-05T10:27:59+5:302022-10-05T10:30:02+5:30

Rani Mukharji's pink saree: अभिनेत्री आणि त्यांच्या महागड्या साड्या हा त्यांच्या चाहत्यांसाठी नेहमीच चर्चेचा विषय असतो. आता सध्या अशीच चर्चा सुरू आहे ती राणी मुखर्जीच्या सुंदर गुलाबी साडीची..

Rani Mukharji attends durga pooja festival in beautiful pink coloured saree | दुर्गापूजेला राणी मुखर्जीने नेसली सुंदर गुलाबी सिल्क साडी, बघा तिच्या जरतारी साडीचा थाट

दुर्गापूजेला राणी मुखर्जीने नेसली सुंदर गुलाबी सिल्क साडी, बघा तिच्या जरतारी साडीचा थाट

Highlightsसाडीचे ब्लाऊजही गुलाबी रंगाचे असल्याने मोनोटोनस प्रकारात मोडणारी ही साडी राणीवर खरोखरंच सुंदर दिसत होती.

नवरात्रीच्या काळात बंगाली बांधवांकडून दुर्गा पूजा (durga pooja) महोत्सव साजरा केला जातो. पाच दिवसांचा असणारा हा महोत्सव अतिशय धुमधडाक्यात, उत्साहात आणि भक्तीभावाने साजरा केला जातो. केवळ बंगालमध्येच नाही, तर भारताच्या विविध प्रांतात बंगाली बांधवांकडून या उत्सवाचे आयोजन केले जाते. मुंबईत हा दुर्गा पुजेचा सोहळा खूपच मोठ्या प्रमाणावर होतो आणि बॉलीवूडचे अनेक सेलिब्रिटी या सोहळ्यासाठी दरवर्षी आवर्जून हजेरी लावतात. यंदाही काजोल, जया बच्चन यांनी दुर्गा पुजेत सहभाग नोंदविला (Rani Mukharji attends durga pooja). 

 

त्यांच्या मागोमाग खंडाला गर्ल म्हणजेच अभिनेत्री राणी मुखर्जीही त्या मंडपात पोहोचली आणि तिने नेसलेल्या सुंदर गुलाबी साडीची एकच चर्चा सुरू झाली. या पुजेसाठी राणी एकदम पारंपरिक वेशभुषेत आली होती. तिची साडी तर पारंपरिक काठपदर धाटणीची होतीच, पण त्यावर तिने केलेली हेअरस्टाईल आणि घातलेले दागदागिने हे देखील तिला एकदम ट्रॅडिशनल लूक देणारे होते. केसांचा आंबाडा आणि त्यावर माळलेला गजरा, गुलाबी रंगाच्या हातभर बांगड्या, कपाळावर मोठी ठसठशीत टिकली आणि कानात- गळ्यात मोठे दागिने, असा तिचा एकंदरीत गेटअप होता. या तिच्या सगळ्या लूकला चार चाँद लावण्याचे काम निश्चितच तिच्या साडीने केले होते.

 

कशी होती राणी मुखर्जीची साडी?
राणी मुखर्जीच्या साडीचा रंग डार्क गुलाबी होता. तसेच साडी उच्च दर्जाच्या सिल्कची असल्याने त्यावर भरपूर चमक होती. इंटीक्रेट गोल्ड ब्रॉकेड अशा प्रकारच्या तिच्या साडीवर मोतीफ एम्ब्रॉयडरी केलेली होती. तसेच साडीच्या काठांवर आणि पदरावर सोनेरी धाग्यांनी भरजरी वर्क करण्यात आले होते. साडीचे ब्लाऊजही गुलाबी रंगाचे असल्याने मोनोटोनस प्रकारात मोडणारी ही साडी राणीवर खरोखरंच सुंदर दिसत होती.  

 

Web Title: Rani Mukharji attends durga pooja festival in beautiful pink coloured saree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.