Join us  

रविना टंडनच्या चेहऱ्यावर अजूनही विशीतला ग्लो, चेहऱ्यावरचे तरुण चकाकीचे पाहा तिचे खास सिक्रेट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2024 11:10 AM

Raveena Tandon's beauty secret that makes her look ten years younger than her actual age : Raveena Tondon Seems To Be Ageing Backwards, Here Are Her Secrets :वयाची पन्नाशी आली तरी रविना टंडन अजूनही दिसते तरुण-तेजस्वी, काय तिचे सिक्रेट

आपला फिटनेस आणि सौंदर्यासाठी सुप्रसिद्ध असणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रींपैकी रवीना टंडन ही एक आहे. अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tondon) हिने स्वतःची मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले भक्कम स्थान निर्माण केलं आहे. एके काळी रुपेरी पडदा गाजवणारी रवीना आजही अभिनय क्षेत्रात अ‍ॅक्टिव्ह आहे. मोठ्या पडद्यावर अभिनय आणि सौंदर्याची जादू दाखवल्यानंतर अभिनेत्रीने अनेक चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. ९० चं दशक गाजवणाऱ्या रवीनाची जादू आजही चाहत्यांच्या मनातून कमी झालेली नाही. आज रवीना फार कमी सिनेमांमध्ये झळकत असली तरी, अभिनेत्री सोशल मिडियावर आणि चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते(Raveena Tondon Seems To Be Ageing Backwards, Here Are Her Secrets).

अभिनेत्री रवीना टंडन हिने नुकताच तिचा ५० वा वाढदिवस साजरा केला. रवीना टंडन ५० वर्षांची झाली असूनही आजही ती तिच्या फिटनेस आणि त्वचेची तितकीच काळजी घेताना दिसून येते. वयाच्या ५० व्या वर्षी देखील तिची त्वचा ऐन पंचविशीतल्या तरुणीसारखी यंग, ग्लोइंग आणि नितळ आहे. रवीना तिचे फिटनेस आणि सौंदर्य मेंटेन करण्यासाठी अनेक घरगुती उपायांचा वापर करते. महागडे केमिकल्सयुक्त ब्यूटी प्रॉडक्ट्स वापरण्यापेक्षा ती घरगुती नैसर्गिक उपाय करण्याला अधिक प्राधान्य देते. वयाच्या ५० व्या वर्षी देखील तरुण तेजस्वी दिसण्यासाठी रवीना नक्की काय, आणि कोणते घरगुती उपाय करते ते पाहूयात(Raveena Tandon's beauty secret that makes her look ten years younger than her actual age).

१. अशी घेते हातांची काळजी... 

सगळ्यांनाच आपल्या हातांची स्किन मऊ, मुलायम आणि पांढरीशुभ्र हवी असते. पण रोजची काम करून आपले हात पाहिजे तसे सुंदर, आकर्षक दिसत नाही. अशावेळी रवीना एक खास घरगुती उपाय करायला सांगते. हातांची स्किन मऊ, मुलायम आणि पांढरीशुभ्र होण्यासाठी रवीना ऑलिव्ह ऑईल आणि मीठापासून तयार केल्या जाणाऱ्या होममेड स्क्रबचा वापर  करण्याच्या सल्ला देते. यासाठी एका बाऊलमध्ये ऑलिव्ह ऑईल घेऊन त्यात मीठ घालावे. आता हे मिश्रण चमच्याने मिसळून एकजीव करून घ्यावे. हे तयार स्क्रब हातांच्या त्वचेला लावून १५ मिनिटे हलकेच मसाज करून घ्यावा. मसाज केल्यानंतर हात कोमट गरम पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावेत. हा उपाय आठवड्यातून २ ते ३ वेळा करावा. या उपायामुळे आपल्या हातांची स्किन अधिकच यंग आणि ग्लोइंग दिसू लागेल, तसेच त्वचा मऊ, मुलायम होण्यास मदत होईल.  

विरळ झालेल्या आयब्रो जाड-भरीव करण्याचा खास उपाय-पाहा आयब्रो टिटिंगचा नवा ट्रेण्ड...

   

सतत केस गळून विरळ झालेत ? टक्कल दिसतंय? 'या' ४ तेलांचे मिश्रण करेल जादू, केसांची होईल वाढ...

२. ग्लोइंग स्किनसाठी सिक्रेट ड्रिंक... 

वयाच्या ५० व्या वर्षी देखील स्किनवर नॅचरल ग्लो येण्यासाठी रवीना एक हेल्दी सिक्रेट ड्रिंक पिणे पसंत करते. ग्लोइंग स्किनसाठी सिक्रेट ड्रिंक तयार करण्यासाठी कच्ची हळद १ टेबलस्पून व २ ग्लास पाणी इतके साहित्य लागेल. एक भांड्यात पाणी घेऊन ते व्यवस्थित ५ ते १० मिनिटे उकळवून घ्यावे. पाणी उकळवून झाल्यावर या गरम पाण्यांत १ टेबलस्पून कच्ची हळद किसून घालावी. त्यानंतर हे पाणी ३ ते ४ मिनिटे मंद आचेवर गरम करून घ्यावे. आता हे गरम  पाणी एका ग्लासमध्ये ओतून थोडे कोमट थंड करून प्यावे . यामुळे तुमच्या स्किनवर हेल्दी ग्लो येण्यास मदत होईल. त्याचबरोबर वाढत्या वयासोबतच त्वचेवर येणाऱ्या एजिंगच्या खुणा, बारीक रेषा कमी करण्यास हे हेल्दी ड्रिंक फायदेशीर ठरेल.

आंघोळीनंतर स्किनकेअर रुटिन नेमकं कसं असावं? वेळ चुकली तर त्वचेचे आजार छळतात कारण...

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीरवीना टंडन