Join us  

हात, बोटं खरखरीत होऊन काळे पडले? रविना टंडनचा खास उपाय- १५ मिनिटांत हात होतील मऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2024 11:52 AM

Raveena Tandon’s Hack For Soft Hands: दररोज घरातली एवढी कामं करून आपले हातही थकून जातात. त्यामुळेच त्यांना रिलॅक्स करण्यासाठी हा उपाय करा...(how to remove tanning from hands)

ठळक मुद्देआपले हात काळे पडतात. खरखरीत होतात. हाताची त्वचा सुरकुतल्यासारखी दिसते किंवा खूपच जाड- रखरख झाल्यासारखी वाटते.

बऱ्याचदा असं होतं की आपण चेहऱ्याची व्यवस्थित काळजी घेतो. खूप काही केलं नाही तरी अधूनमधून एखादा फेसपॅक लावताे. रोजच्यारोज मॉईश्चराईज करतो. पण तसं काही आपण आपल्या हातांच्या बाबतीत करत नाही. हातांना क्रिमही बऱ्याचदा लावणं होत नाही. शिवाय दिवसभराच्या कामांचा ताण आपल्या हातांवर असतोच. यामुळे मग आपले हात काळे पडतात. खरखरीत होतात. हाताची त्वचा सुरकुतल्यासारखी दिसते किंवा खूपच जाड- रखरख झाल्यासारखी वाटते. (how to remove tanning from hands). यासाठी काय उपाय करावा आणि आपल्या हातांना महागडं मेनिक्युअर न करताही घरच्याघरी कसं स्वच्छ, मऊ- मुलायम करावं, याचा उपाय अभिनेत्री रविना टंडन हिने सोशल मिडियावर शेअर केला आहे. (Raveena Tandon’s Hack For Soft Hands)

 

हातावरचं टॅनिंग काढून त्यांना मुलायम करण्यासाठी उपाय

हातावरचं टॅनिंग कसं कमी करायचं यासाठी रविना टंडन हिने एक अतिशय सोपा उपाय सुचवला आहे. हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये साधारण २ चमचे ऑलिव्ह ऑईल घ्या. त्यामध्ये १ चमचा मीठ टाका.

फॅटी लिव्हरचा त्रास? तज्ज्ञ सांगतात ५ सोपे उपाय, जेवणातले छोटेसे बदल लिव्हर ठेवतील ठणठणीत.. 

हे दोन्ही पदार्थ व्यवस्थित हलवून त्याची पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट तुमच्या हातांवर मागून- पुढून लावा आणि साधारण १५ मिनिटे हातांना हळूवारपणे मसाज करा. यानंतर काेमट पाण्याने हात धुवून टाका. तुम्हाला तुमच्या हातांवर लगेचच खूप छान फरक दिसून येईल. हाताला कुठे जखम झाली असेल तर हा उपाय करू नका. शिवाय मीठाऐवजी तुम्ही पिठीसाखर घेऊनही हा उपाय करू शकता.

हातांना मऊपणा देण्यासाठी हे उपायही करून पाहा

१. काेरफडीचा गर आणि कॉफी पावडर व्यवस्थित एकत्र करा आणि त्या पेस्टने हातांना १० ते १२ मिनिटांसाठी मसाज करा. हात छान मुलायम होतील.

रोपांसाठी फ्लॅटमध्ये जागाच नाही, बाल्कनीत ऊनही येत नाही? ३ टिप्स- घराचा १ कोपरा होईल हिरवागार

२. हात काळे पडले असतील तर १ चमचा दह्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस टाका. त्यामध्ये चिमूटभर मध आणि १ टेबलस्पून हरबरा डाळीचं पीठ टाका. आता या मिश्रणाने हातांना मालिश करा. हात छान मुलायम होतील.

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडीरवीना टंडन