Join us  

ओठ खूप काळे पडलेत? तज्ज्ञ सांगतात ८ महत्त्वाची कारणं आणि उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2022 10:06 AM

Reasons and Remedies for Dark Lips : काही ना काही कारणांनी आपले ओठ खूप काळे पडतात आणि त्यामुळे आपल्या सौंदर्यात त्याने बाधा निर्माण होते.

ठळक मुद्देओठ काळे होण्यामागे नेमकी काय कारणं असतात ते समजून घ्यायला हवे.ओठ काळवंडले म्हणून त्यावर सतत लिपस्टीक लावण्यापेक्षा काळेपणामागची कारणं समजून घेणं महत्त्वाचं आहे.

आपले ओठ गुलाबी, मऊ आणि आकर्षक असावेत असं प्रत्येक स्त्रीला वाटतं. ओठ हा सौंदर्यातील एक महत्त्वाचा घटक असल्याने हे ओठ छान असावेत यासाठी आपण खूप प्रयत्न करतो. ओठांना आकर्षक करण्यासाठी आपण बाहेर जाताना त्यावर आवर्जून लीप बाम, लिपस्टीक आणि लीप लायनर लावतो. मात्र हे न लावताही आपले ओठ छान दिसले तर कोणाला नाही आवडणार. पण काही ना काही कारणांनी आपले ओठ खूप काळे पडतात. एकदा ओठ काळे पडले की ते पुन्हा गुलाबी करण्यासाठी किंवा काळेपणा घालवण्यासाठी काय करायचं याबाबत आपल्याला माहिती नसते. मग आपण लिपस्टीक लावून ते कसे झाकले जातील ते पाहतो. मात्र सतत लिपस्टीक लावणेही ओठांच्या आरोग्यासाठी चांगले नसते. आता ओठ काळे पडण्यामागे नेमकी काय कारणं असतात आणि त्यावर काय उपाय केल्यास हा काळेपणा दूर होतो याविषयी प्रसिद्ध डॉ. जयश्री शरद यांनी माहिती शेअर केली आहे. इन्स्टाग्राम पोस्टद्वारे त्यांनी याविषयी माहिती शेअर केली असून ती काय ते पाहूया (Reasons and Remedies for Dark Lips)...

(Image : Google)

ओठ काळे पडण्याची कारणं 

१. ओठ चाटणे 

२. धूम्रपान 

३. लिपस्टीक, लीप बाम यांची अॅलर्जी असणे 

४. बराच वेळ उन्हाशी संपर्क येणे 

५. सिल्व्हर कोटेड माऊथ फ्रेशनर्सची अॅलर्जी

६. टूथ व्हायटनिंग आणि टूथपेस्टची अॅलर्जी

७. अनुवंशिकता

८. त्वचेशी निगडीत समस्या

उपाय 

१. वरील कारणे आधी दूर करा

२. ओठ सतत ओले राहतील याची काळजी घ्या

३. धूम्रपान टाळा

४. ओठ चाटू नका 

५. वास नसलेले क्रिम ओठांना लावा.

६. तूप किंवा बदामाचे तेल ओठांना लावा. 

७. वास असणारी उत्पादने ओठांवर वापरु नका.

८. ओठांना कोणत्या प्रकारची अॅलर्जी किंवा काही त्रास असेल तर त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या

 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीओठांची काळजी