Lokmat Sakhi >Beauty > ऐन तारुण्यात केस पांढरे होण्याची ४ कारणं आणि ३ उपाय- वाचा तज्ज्ञांचा सल्ला

ऐन तारुण्यात केस पांढरे होण्याची ४ कारणं आणि ३ उपाय- वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Hair Care Tips For Gray Hair: अगदी विशी- पंचविशीतच किंवा त्याच्याही आधी केस पांढरे (white hair) होण्याची समस्या आजकाल खूपच वाढली आहे. वाचा याबाबत तज्ज्ञांनी सांगितलेली विशेष माहिती.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2022 06:23 PM2022-06-22T18:23:05+5:302022-06-22T18:23:42+5:30

Hair Care Tips For Gray Hair: अगदी विशी- पंचविशीतच किंवा त्याच्याही आधी केस पांढरे (white hair) होण्याची समस्या आजकाल खूपच वाढली आहे. वाचा याबाबत तज्ज्ञांनी सांगितलेली विशेष माहिती.

Reasons for gray hair in early age, solutions for white hair, home remedies for gray hair | ऐन तारुण्यात केस पांढरे होण्याची ४ कारणं आणि ३ उपाय- वाचा तज्ज्ञांचा सल्ला

ऐन तारुण्यात केस पांढरे होण्याची ४ कारणं आणि ३ उपाय- वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Highlightsकेस कमी वयात पांढरे होण्याचं प्रमाण वाढलं आहे. याची नेमकी कारणं कोणती आणि त्यावर कसे उपचार करावेत, याविषयी ही विशेष माहिती. 

डोक्यात सुरुवातीला जेव्हा पांढरा केस  (Reasons for gray hair) दिसू लागतो, तेव्हा अगदी धस्स होऊन जातं. मग तुम्ही कोणत्याही वयातले का असेना. पांढरा केस तुम्हाला जबरदस्त धक्का देतो आणि पॅनिक करतोच. पण आजकाल असे धक्के चक्क २०- २२ वर्षांच्या तरुणाईलाही बसू लागले आहेत. त्याहीपेक्षा लवकर केस पांढरे (gray hair in early age) होत आहेत, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, इतकं केस कमी वयात पांढरे होण्याचं प्रमाण वाढलं आहे. याची नेमकी कारणं कोणती आणि त्यावर कसे उपचार करावेत, याविषयी HT ग्रुपशी बोलताना डॉ. अनूप धीर यांनी दिलेली ही विशेष माहिती. 

 

कमी वयात केस पांढरे होण्याची कारणं
१. पोषक घटकांची कमतरता

व्हिटॅमिन बी ६, बी १२, बायोटीन, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई हे घटक शरीरात कमी प्रमाणात असतील, तर त्यामुळे कमी वयात केस पांढरे होऊ शकतात. याविषयी २०१६ साली International Journal of Trichology यांच्यावतीने करण्यात आलेल्या अभ्यासात असं लक्षात आलं आहे की, वयवर्षे २५ पेक्षा कमी वयात केस पांढरे होणाऱ्या भारतीयांमध्ये शरीरात लोह धरून ठेवणाऱ्या Serum ferritin ची तसेच व्हिटॅमिन बी १२, HDL-C म्हणजेच गुड कोलेस्टरॉल या घटकांची कमतरता दिसून येते. म्हणूनच कमी वयात केस पांढरे होऊ नये, म्हणून आपल्या आहारात वरील सर्व घटक असायलाच हवेत. 

 

२. अनुवंशिकता
केस पांढरे होण्यासाठी अनुवंशिकता हे एक मोठे कारण असल्याचे डॉ. धीर म्हणाले. आपण कोणत्या प्रांतात राहतो, आपले पुर्वज, पुर्वीपासूनचा आपला आहार, यासगळ्या गोष्टीही केस पांढरे होण्यासाठी कारणीभूत ठरतात. International Journal of Trichology यांच्या २०१३ साली झालेल्या अभ्यासानुसार असं लक्षात आलं आहे की आशियायी लोकांचे केस वयाच्या पंचविशीत तर अमेरिकन- आफ्रिकन लोकांचे केस वयाच्या तिशीत पांढरे होण्यास सुरुवात होते.

 

३. ताण आणि वैद्यकीय कारणं
कमी वयात केस पांढरे होण्याची ही दोन मुख्य कारणं आहेत. आजकाल कमी वयातच मुलांवर अभ्यासाचे, करिअरचे, नोकरीचे, रिलेशनशिप्सचे टेन्शन असते. या सगळ्या ताणाचा परिणाम शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडवतो आणि त्यामुळेही केस पांढरे होतात. याशिवाय थायरॉईड, इम्युनिटी कमी असणे किंवा अन्य काही आजारांमुळेही केस पांढरे होऊ शकतात.

 

केस पांढरे होऊ नयेत म्हणून उपाय
१. ताजी फळं आणि भाज्या, ग्रीन टी, ऑलिव्ह ऑईल, कढीपत्ता, आवळा आणि ॲण्टीऑक्सिडंट्स भरपूर असणारे पदार्थ नियमित खावेत. यामुळे शरीराला पोषण तर मिळतच पण मानसिक, शारिरीक त्रास कमी होण्यास मदत होते.
२. केसांना नियमितपणे दुधी भोपळ्याचं तेल लावल्यास पांढऱ्या केसांचं प्रमाण कमी होऊ शकतं.
३. नियमित व्यायाम करावा.

 

Web Title: Reasons for gray hair in early age, solutions for white hair, home remedies for gray hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.