Join us  

केस गळणं ताबडतोब थांबवायचंय? 8 कारणं समजून घ्या- खर्च न करता लांब, सुंदर केस मिळतील

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 5:53 PM

Reasons of Hair Fall and Hair Baldness : केसांची व्यवस्थित काळजी घेतली नाही केस पातळ होतात आणि गळू लागतात.

महिलांप्रमाणेच पुरूषांचेही केस मोठ्या प्रमाणात गळतात. ज्याला बाल्डनेस किंवा एंड्रोजेनेटिक एलोपेसिया असं म्हणतात.  (hair Care Tips) या स्थितीत पुरूषांचे हळू-हळू केस गळू लागतात. जेनेटिक आणि हॉर्मोनल डिसॉडरमुळे हे होते. पुरूषांमध्ये टक्कल पडण्याचे प्रायमरी कारण जेनेटीक ट्रेंड आणि हॉर्मोनल डायहाइड्रोटेस्टोस्टेरोनच्या (डीएचटी) प्रभावाचे कॉम्बिनेशन समजले जाते. केसांची व्यवस्थित काळजी घेतली नाही केस पातळ होतात आणि गळू लागतात. या कारणांमुळे पुरूषांच्या केसांना टक्कल पडते.(Simple Ways to Stop Hair Thinning) 

केस का गळतात?

१) कॅन्सर, हाय ब्लड प्रेशर, डिप्रेशन आणि संधीवाताचा त्रास उद्भवतात. यावरील औषधांच्या परिणामांमुळे केस पांढरे होतात किंवा गळतात. तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने केस गळण्याच्या समस्येवर औषधोपचार सुरू करू शकता. 

२) हॉर्मोनल असंतुलन केस पांढरे होण्याचे कारण ठरते. वैद्यकीय स्थिती, थायरॉईड डिसॉर्डर किंवा हॉर्मोनल थेरेपीचे कारण ठरते. इंटरनल हॉर्मोनल समस्या केस गळण्यासाठी कारणीभूत असतात.

४९ व्या वर्षी सुपरफिट दिसणाऱ्या मलायकाचं ब्युटी सिक्रेट; ३ योगासन करा-पन्नाशीत विशीतले दिसा

३) जसजसं वाढत जातं तसतसं टेस्टोस्टेरॉल हॉर्मोन पुरूषांमध्ये कमी होऊ लागते. यामुळे वाढत्या वयात केस गळण्याची स्थिती उद्भवते. हेअर केअर उत्पादनांचा वापर केल्यास केस हेल्दी राहण्यास मदत होते. 

४) पोषणाचा अभाव, व्हिटामीन, मिनरल्सची कमतरता यामुळे केस गळणं कमी होण्यास मदत होते. व्हिटामीन एस, व्हिटामीन सी, डी, ई बायोटीन आणि आयर्नने परिपूर्ण आहे. यामुळे केस गळणं कमी होण्यास मदत होते. 

५) ताण-तणावामुळे केसांच्या वाढीवर आणि रंगावर परिणाम होतो. जर तुम्ही खूप टेंशन घेत असाल तर केस गळणं कमी होणार नाही. रिलॅक्सेशन टेक्निक, व्यायामाने तुम्ही ताण-तणाव कमी करू शकता. 

६) ऑटो इम्यून आजार एलोपेसिया एरीटा, स्काल्प इन्फेक्शन, किमोथेरेपी केस गळण्याचे कारण ठरू शकते.

चष्मा लावण्याची गरजच पडणार नाही; रोज ५ गोष्टी करा, डोळे कायम राहतील चांगले-तीक्ष्ण 

७) धुम्रपानामळे ब्लड सर्क्युलेशन आणि केसांच्या मुळांवर परिणाम होतो. याच्या नुकसानकारक परिणामांमुळे ओव्हरऑल हेल्थवर परिणाम होतो. 

८) हेअर स्ट्रेटनिंग, स्मूथनिंग, ग्लोबल कलर यांसारख्या हेअर ट्रिटमेंट्स केल्यामुळे केसांच्या आरोग्यावर परिणाम होतो. केसांची वाढ व्यवस्थित होत नाही. म्हणून केस नैसर्गिकरित्या जसे आहेत तसंच त्यांना मेंटेन करा. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी