Join us  

फ्रींजेस नावाची कपड्यांची ‘बंडखोर’ फॅशन, पार्टी सिझनमध्ये फ्रींज देतात भन्नाट लूक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2021 2:43 PM

फ्रींजेस (fringes clothes) ही फॅशन सध्या एकदम इन आहे, तुम्हाला नवीन काही ट्राय करायचं असेल तर फ्रींजेस उत्तम पर्याय.

ठळक मुद्देफ्रींजेस ही सध्याची इन फॅशन आहे, जर तुम्ही फॅशन बंडखोर असाल तर नक्कीच हा ट्रेण्ड तुम्हाला आवडू शकतो. 

तुम्हाला दरवेळी नवीन, कोरीकरकरीत फॅशन ट्राय करायला आवडते का? मग फ्रींजेस तुम्हाला आवडेल! ( fringes clothes) नेहमीच्या ड्रेस, जॅकेट, स्कार्फमुळे येणाऱ्या लुक ला अजून हटके करायची संधी फ्रीन्जेस तुम्हाला नक्की देतील. पार्टीला एकदम फ्रेश, यंग, कूल लुक फ्रींजेस देईल यात शंकाच नाही! आता हे दिवस सेलिब्रेशन, पार्टी करण्याचे, आऊटिंगचे आहेत. घरच्या घरी जरी छोटं कुल फंक्शन असेल तर तुम्ही हा पर्याय वापरू शकतात.मलायका अरोरा आणि अमृता यांची फ्रींज अर्थात झालरवाल्या ड्रेसेसची स्टाइल प्रचंड गाजलेली होती. झालर, पताका, असा साधारण या फॅशनचा डौल.  

(Image : Google)

फ्रीन्जेस चा इतिहास हा तसा अनोखा आहे. फ्रीन्जेस चा पहिल्यांदा वापर अमेरिकेत फ्लॅपर गर्ल्सनी केला. फॅशिवनेबल, बिनधास्त आणि समाजची चौकट न मानणाऱ्या मुलीना फ्लॅपर म्हणत असत. त्यांचा पेहराव, केसरचना सुद्धा साधारण स्त्रियांपेक्षा वेगळी असायची. नंतर ह्याच फ्रीन्जेस बॉलीवूडच्या कॅब्रे, डिस्को अश्या बेधडक गाण्यासाठी वापरू जाऊ लागल्या.

(Image : Google)

आता फ्रींजेसचा वापर खास तरुणींसाठी कपडे बनवणारे ब्रॅण्ड्स वेगवेगळ्या रूपात करताना दिसतात. कधी ड्रेसच्याच कापडाच्या, मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्ट, कधी फूटवेअर कधी पर्सना सुद्धा फ्रींजेस लावलेले पाहायला मिळतात. फ्रींजेस सहसा ड्रेसच्या आणि बाह्यांचा काठाला लावल्या जातात. या लोकरीच्या, लेदर आणि पॉलीएस्टर मध्ये विविध रंगात उपलब्ध आहेत. शॉर्ट आणि लॉन्ग श्रग ला लावलेले फ्रींजेस अतिशय सुरेख दिसतात आणि ट्रेंडी लुक देतात. फ्लोरल आणि ऑल ओव्हर प्रिंटेड श्रग च्या काठांना लेदरच्या फ्रींजेस सुरेख दिसतात.

(Image : Google)

फ्रींजेसचा वापर फक्त पॉप आणि वेस्टर्न लुक साठीच होतो असंही काही नाही. आता पारंपरिक लेहेंगा चोलीवर फ्रींजेस उत्तम दिसू शकतात. फ्रींजेस ही सध्याची इन फॅशन आहे, जर तुम्ही फॅशन बंडखोर असाल तर नक्कीच हा ट्रेण्ड तुम्हाला आवडू शकतो. 

टॅग्स :फॅशनब्यूटी टिप्स