Join us  

रेड इज NEW HOT; लालचुटूक साड्यांचा सुंदर सिझलिंग ट्रेंड! आलिया ते पत्रलेखा झाल्या 'रेड'दिवान्या..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2021 1:08 PM

Trending red saree: भडक वाटतो म्हणून आपण कधीकधी लाल रंग घालणं टाळतो.. पण सध्या मात्र लाल रंगाच्या साड्यांचा चांगलाच जलवा आहे, असं काही अभिनेत्रींकडे बघून वाटत आहे...

ठळक मुद्देलाल साडी नेसण्याची हौस असेल तर यंदा ही हौस पुरवून घ्या. कारण सध्या लाल रंगाची फॅशन चांगलीच इन आहे.

लाल रंगाचा जलवा निश्चितच वेगळा आहे. पण बऱ्याचदा साड्या किंवा कपडे खरेदीची वेळ आली तर लालचुटूक रंगाची साडी (red colour saree)  किंवा कपडे घेणं आपण टाळतो. हा रंग समोर असतो, तेव्हा तो आपल्याला जबरदस्त ॲट्रॅक्ट करतो. पण तरीही लाल रंगाची साडी घेताना आपण दोन- चारदा निश्चितच विचार करतो. कारण हा रंग खूपच भडक किंवा ब्राईट दिसेल की काय अशी आपल्याला शंका येते. पण असं वाटून आता लाल रंगाची साडी घेणं टाळू नका.. कारण लाल रंगाची जबरदस्त क्रेझ आता पुन्हा आली असून लग्न समारंभ आणि पार्ट्यांमध्ये तर लाल रंगाच्या साड्या प्रचंड इन आहेत.

 

सध्या छोट्या पडद्यावरची अभिनेत्री जन्नत झुबेर (actress Jannat Zubair) हिच्या लाल साडीने नेटकऱ्यांना अक्षरश: वेड लावले आहे. त्याचं झालं असं की जन्नतने तिचा एक व्हिडियो इन्स्टाग्रामवर (instagram) शेअर केला आहे. हा व्हिडियो अवघ्या काही सेकंदांचा असून त्यात तिने लेझी लाड (lazy lad).... या गाण्यावर झकास डान्स केला आहे. तिचा डान्स तर छान आहेच, पण या व्हिडियोमधली सगळ्यात जास्त भाव खाऊन गेलेली गोष्ट म्हणजे जन्नतची लाल रंगाची साडी. काळपट लाल रंगाची साडी आणि त्यावर चमकणारी, उठून दिसणारी चमकी किंवा स्टोन अशा प्रकारातली ही साडी आणि त्यावर तिने घातलेले स्ट्रिप स्लिव्हलेस प्रकाराचे ब्लाऊज तिला खूपच स्टनिंग लूक देणारे ठरले आहे.

 

मागच्या काही दिवसात आलियाचाही (Actress Alia Bhat)असाच लाल रंगातल्या साडीतला फोटो दिसून आला. तिच्या आगामी चित्रपटाच्या ट्रेलर विमोचनप्रसंगी तिने ही साडी नेसली होती. लेस बॉर्डर साडी विथ सिक्विन ब्लाऊज या प्रकारातली आलियाची साडी तिला जबरदस्त कॅची लूक देणारी होती. एवढंच नाही तर टीव्ही अभिनेत्री पत्रलेखा (actress Patralekha) हिचं लग्न नुकतंच अभिनेता राजकुमार राव (Rajkumar Rao) याच्याशी झालं. तिच्या लग्नातही पत्रलेखाने ब्लड रेड प्रकारात मोडणारी लाल रंगाची साडी आणि स्ट्रिप स्लिव्हलेस या प्रकारचं ब्लाऊज असा लूक केला होतो. या साडीत पत्रलेखा अतिशय सुंदर, नाजूक दिसत होती. बऱ्याचदा लाल रंगाचा भडकपणा कमी करण्यासाठी ती दुसऱ्या कोणत्या कॉन्ट्रास्ट रंगासोबत मॅच केली जाते. पण जन्नत असो, आलिया असो किंवा मग पत्रलेखा असो... तिघींनीही असं काहीही केलं नव्हतं. तिघींनीही लाल रंगाच्या साडीवर लाल रंगाचंच ब्लाऊज घातलं होतं... त्यामुळे केवळ भडक वाटतो, म्हणून तुम्ही लाल रंग घेणं टाळणार असाल, तर या अभिनेत्रींचा लाल साडीतला हॉट जलवा एकदा बघाच... 

 

लाल साडी नेसताना...Must know these things before wearing red - लाल साडी नेसण्याची हौस असेल तर यंदा ही हौस पुरवून घ्या. कारण सध्या लाल रंगाची फॅशन चांगलीच इन आहे.- लाल रंगाची साडी पार्टी लूक देणारी आहे. त्यामुळे अशी साडी शक्यतो रात्री नेसा.- लाल रंगाच्या साडीवर काळपट रेड, ब्राऊन किंवा लाईट रेड या शेडमधली लिपस्टिक लावा.- लाल साडीचं ब्लाऊज जेवढं स्टाईलिश शिवणार तेवढा तुमचा लूक उठून दिसेल. मग ती साडी काठपदराची असो किंवा मग डिझायनर असो.- लाल रंगाची डिझायनर साडी नेसणार असाल तर त्यावरचे दागिने शक्यतो खूपच कमी आणि ते ही अतिशय नाजूक प्रकारातले हवे.- लाल साडी नेसल्यावर खूप ग्लॉसी मेकअप करू नका. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्ससेलिब्रिटीफॅशनआलिया भटपत्रलेखा