एलोवेरा जेल
व्हॅक्सिंग केल्यानंतर जर आपल्याला देखील पुरळ येणे, खाज उठणे, त्वचा लालसर होणे. अशा समस्या उद्भवत असतील तर, व्हॅक्सिंग केल्यानंतर त्वचेवर एलोवेरा जेल लावणे उत्तम ठरेल. एलोवेरा जेलमध्ये असणारे गुणधर्म त्वचेवर उद्भवणाऱ्या समस्या दूर करेल. यासह त्वचेला थंडावाही देईल. एलोवेरा जेल जर घरी उपलब्ध नसेल तर आपण कोरफडीचे फोड घेउन त्यातून निघणाऱ्या जेलचा देखील वापर करू शकता. हे जेल आपल्या व्हॅक्सिंग केलेल्या ठिकाणी लावायचे. हे जेल एक ते दोन तास तसेच ठेवायचे आहे. जेल सुकल्यानंतर थंड पाण्याने धुवून काढायचे आहे.
नारळ तेल
नारळ तेल आपल्या शरीरासाठी आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहे. नारळामधील गुणधर्म आपल्या शरीराला खूप पोषक तत्वे देतात. नारळ तेलात फेनोलिक एसिड आणि पॉलीफेनॉलसारखे बॅक्टीरियल तत्व आहेत. जे आपल्या शरीराला खुप उपयुक्त आहेत. व्हॅक्सिंग केल्यानंतर नारळ तेल लावायचे. ते लावल्याने त्वचेवर उठणारी खाज आणि जळजळ कमी होण्यास मदत मिळते.
ऑलिव्ह ऑईल
व्हॅक्सिंगनंतर ऑलिव्ह ऑईल लावल्याने त्वचेवर पुरळ किंवा लालसरपणापासून आराम मिळतो. सर्वप्रथम एक चमचा ऑलिव्ह ऑईलमध्ये टी ट्री ऑइलचे 2-3 थेंब मिसळा. आणि हे मिश्रण त्वचेवर लावा आणि काही तासानंतर स्वच्छ पाण्याने धुवा. कोणत्याही कारणास्तव त्वचेवर पुरळ किंवा त्वचा लालसर पडत असेल तर, आपण ऑलिव्ह ऑईल आणि टी ट्री ऑइल देखील वापरू शकता.
व्हॅक्सिंग करताना या मुख्य गोष्टी लक्षात ठेवा
वॅक्सिंग करण्यापूर्वी त्वचेला कोणत्याही प्रकारचे मॉइश्चरायझर लावू नये. आपण इच्छित असल्यास, थोडी पावडर लावू शकता. जेणेकरून व्हॅक्सिंग करताना फार दुखणार नाही.
केसांची वाढ जर अधिक असेल तर एकाचवेळी व्हॅक्स करण्याची चुक करू नका. त्यामुळे त्वचा सोलून निघण्याची शक्यता अधिक असते.
जर आपण घरी वॅक्सिंग करत असाल, तर लक्षात ठेवा की केसांच्या वाढीचे प्रमाण ज्याप्रमाणे आहे. त्याच पद्धतीने वॅक्सिंगचा थर वॅक्सिंग स्पॅच्युलाने लावावे.