आपल्या चेहऱ्याच्या सौंदर्यात डोळे, भुवया, पापण्या या गोष्टी भर पाडत असतात. डोळे आपल्या मनातील भावना सहज दर्शवत असल्याने डोळे बोलके असतात असं म्हटलं जातं. आपले सगळे अवयव हे आपल्याला जन्मत: मिळालेले असल्याने ते सुंदरच असतात. आपल्या चेहऱ्यातील बरेचसे फिचर हे आपल्याला आईवडील, आजीआजोबा, आत्या, मामा मावशी यांच्याकडून मिळालेले असते. लहानपणी आपल्याला याचा फारसा फरक पडत नाही. पण जसे आपण शाळेच्या जगातून बाहेर पडतो तेव्हा आपण सुंदर दिसावं असं आपल्याला वाटायला लागतं. मग मेकअप, पार्लर अशा गोष्टींशी आपली ओळख होते. मग भुवया कोरण्यासाठी किंवा डोळे जास्त आकर्षक दिसण्यासाठी आपण पार्लरची किंवा सौंदर्यप्रसाधनांची मदत घेतो (Remedies To Grow Eyebrows Naturally).
डोळे आकर्षक दिसण्यासाठी आयब्रो पेन्सिल, कृत्रिम आयलॅशेस, आय शॅडो, आय लायनर, काजळ, आयब्रो पेन्सिल यांसारख्या गोष्टींचा प्रामुख्याने वापर केला जातो. आयब्रो जाड असतील तर त्या चांगल्या दिसतात पण त्या पातळ असतील तर मात्र त्या कोरुन जाड कराव्या लागतात. बाजारात आयब्रो जाड दिसाव्यात यासाठी बरीच विविध प्रकारची उत्पादने मिळतात. पण बाजारात मिळणारी ही रासायनिक उत्पादने वापरण्यापेक्षा घरगुती आणि नैसर्गिक उपायांनी भुवयांचे केस दाट करता आले तर? आज आपण असेच काही सोपे उपाय पाहणार आहोत ज्यामुळे आयब्रोज जाड होण्यास निश्चित मदत होऊ शकेल.
१. कॉफी
- एका बाऊलमध्ये १ चमचा कॉफी, अर्धा चमचा मध आणि ४ ते ५ थेंब ऑलिव्ह ऑईल एकत्र करावे.
- हे सगळे मिश्रण चांगले एकजीव झाल्यावर आयब्रोवर लावून ठेवावे.
- २० मिनीटांनी हे गार पाण्याने धुवून टाकावे, डोळे पूर्ण बंद करावेत जेणेकरुन डोळ्यात जाणार नाही.
- आठवड्यातून ३ वेळा हा प्रयोग केल्यास त्याचा आयब्रोज जाड होण्यासाठी चांगला फायदा होतो.
२. जास्वंदाचे फूल
- यासाठी जास्वंदाचे फूल आणि ४ ते ५ थेंब ऑलिव्ह ऑईल या दोनच गोष्टी लागतात.
- जास्वंदाची पाने घेऊन ती मिक्सरमध्ये बारीक करुन घ्यावीत आणि त्यामध्ये ऑलिव्ह ऑईल घालावे.
- त्यानंतर हे मिश्रण आपल्या आयब्रोवर लावावे आणि साधारण ३० मिनीटे तसेच ठेवावे.
- गार पाण्याने आयब्रो स्वच्छ धुवून टाकाव्यात. हा उपाय दररोज केला तरी चालतो, त्याचा चांगला फायदा होतो.
३. कोरफड
- एका बाऊलमध्ये २ चमचे कोरफडीचा गर आणि ३ ते ४ थेंब ऑलिव्ह ऑईल घ्यावे.
- हे दोन्ही मिक्स करुन त्याची चांगली पेस्ट करुन घ्यावी आणि ती आयब्रोवर लावावी.
- २० मिनीटे ही पेस्ट आयब्रोवर तशीच ठेवावी आणि त्यानंतर धुवायचे.
-. दररोज रात्री झोपताना हा उपाय केल्यास आयब्रो दाट होण्यास मदत होते. तसेच चेहऱ्याला मॉईश्चर मिळावे यासाठी चेहऱ्यावरही ही पेस्ट लावू शकतो.