Join us  

उन्हाळ्यात काखेत जास्त घाम आल्याने कपडे ओले होतात, वास येतो, डाग पडतात? ३ उपाय, दुर्गंधी टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2023 3:02 PM

Remedies To Reduce Sweat and Odor : उन्हाळ्यात घामाने कपडे ओले होऊ नयेत म्हणून कोणती काळजी घ्यावी याविषयी...

उन्हाळा म्हटलं की वाढलेलं तापमान आणि त्यामुळे होणारी चिकचिक. मुंबई, कोकण या भागात तर समुद्र असल्याने घाम येण्याचे प्रमाण जास्त असते. तर नागपूर, विदर्भ आणि राज्याच्या इतर भागातही उन्हाचा कडाका वाढत असल्याने घामाघूम व्हायला होते. कितीही ऊन असले तरी आपल्याला रोजची बाहेरची कामं करावीच लागतात. यातही आपले काम फिरतीचे असेल किंवा ऑफीसला जाण्यासाठी बराच प्रवास करावा लागत असेल तर आपल्याला खूपच घाम येतो. घाम आला की काखेत किंवा पाठीवरही अनेकदा कपडे ओले होतात. हे ओले कपडे अंगावर वाईट तर दिसतातच. पण हे ओले कपडे अंगावर राहिल्याने त्वचेच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. इतकेच नाही तर या घामाचा काही वेळाने वासही यायला लागतो. अशावेळी आपल्याला एखादी महत्त्वाची मिटींग किंवा काही असेल तर खूप लाजल्यासारखे होते. म्हणूनच उन्हाळ्यात घामाने कपडे ओले होऊ नयेत म्हणून कोणती काळजी घ्यावी याविषयी (Remedies To Reduce Sweat and Odor)...  

(Image : Google)

१. स्वेट पॅडस

बाजारात ज्याप्रमाणे सॅनिटरी पॅडस मिळतात त्याचप्रमाणे हे स्वेट पॅडस मिळतात. यांची किंमतही फार नसते. त्यामुळे तुम्हाला खूपच घाम येत असेल तर तुम्ही हे पॅडस नक्की लावू शकता. घाम शोषून घेण्यासाठी हे पॅड अतिशय उत्तम पर्याय ठरु शकतात. कपड्याच्या आतल्या बाजूला फुलपाखराच्या आकाराचे हे पॅड चिकटवल्यास त्यामध्ये घाम शोषला जातो आणि घामाचा वास येणे, डाग पडणे असे काहीही होत नाही. 

२. पावडर किंवा ब्युटी प्रॉडक्टसचा वापर 

अॅस्टींजंट लावणे, काखेत किंवा घाम येत असणाऱ्या ठिकाणी पावडर लावणे, परफ्यूम किंवा घाम कमी करणाऱ्या काही क्रिमचा वापर करणे असे उपाय करु शकतो. यामुळे घामाचे प्रमाण कमी होते आणि कपडेही ओले होत नाहीत. तसेच घामामुळे कपड्यांना येणाऱ्या वासापासूनही आपली सुटका होऊ शकते. बाजारात अशाप्रकारची बरीच उत्पादने मिळतात. त्याविषयी योग्य ती माहिती घेऊन मगच ती वापरायला हवीत. 

(Image : Google)

३. नियमित व्हॅक्सिंग करणे 

अनेकदा आपल्याला केस असलेल्या ठिकाणी जास्त घाम येतो. म्हणजे डोक्यात, काखेत आणि जांघेत घाम येण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे आपण उन्हाळ्यात जास्त घामघाम होऊ नये त्यासाठी डोक्यावरचे केस कापतो किंवा वरच्या बाजूला बांधून ठेवतो. त्याचप्रमाणे काखेत केस जास्त असल्याने त्याठिकाणी घाम येतो. अशावेळी उन्हाळ्याच्या दिवसांत या भागाचे नियमित व्हॅक्सिंग करणे आवश्यक असते. म्हणजे घामाचे प्रमाण आटोक्यात येऊ शकते. 

टॅग्स :ब्यूटी टिप्ससमर स्पेशलत्वचेची काळजी