आपल्या सगळ्यांच्याच दिवसाची सुरुवात ही आंघोळीने होते. आंघोळ ही आपल्या प्रत्येकाच्या डेली रुटीनमधील अत्यंत महत्वाची अशी क्रिया आहे. आंघोळ ही केवळ शरीर स्वच्छ करण्यासाठी केली जाते असं नव्हे, तर नियमित आंघोळ केल्याने आपल्याला अनेक आरोग्यदायी फायदे देखील होत असतात. सकाळी गरम पाण्याने आंघोळ केली की फ्रेश वाटतं आणि दिवसभर काम करण्यासाठीची उर्जा मिळते. तर अनेकदा रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ करणंही समाधान देणारं असतं. काहीजण गरम पाण्याने आंघोळ करणं पसंत करतात तर काही गार पाण्याने. गरम पाण्याने आंघोळ केल्याने थकवा दूर होतो. शरीराला आराम मिळतो(What are the effects of bathing with hot water?).
साधारणतः गुलाबी थंडी सुरू झाली की सगळेचजण थंड पाण्याने आंघोळ करण्याऐवजी गरम पाण्याचा वापर करतात. गरम पाण्याने आंघोळ केल्याने थंडीची भावना कमी होते आणि शरीराला आरामही मिळतो. गरम पाण्याने अंघोळ केल्याने थकवा दूर होतो आणि शरीर रिलॅक्स होते त्याचबरोबर मूड सुधारतो. परंतु चुकीच्या पद्धतीने गरम पाण्याचा वापर करणे आपल्यासाठी हानिकारक ठरु शकते. अति गरम पाणी वापरणे त्वचेसाठी आणि शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. गरम पाण्याने आंघोळ (Right Way To Take Bath)करण्यापूर्वी नेमकी कोणती काळजी घ्यावी ते पाहूयात(Remember a few things while bathing with hot water).
गरम पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे :-
१. गरम पाण्याने आंघोळ केल्याने झोपेसंबंधीच्या समस्या दूर होण्यास मदत मिळते.
२. गरम पाण्यामुळे शरीरातील ब्लड सर्क्युलेशन वाढण्यात व सुरळीत सुरू राहण्यास मदत होते. ३. गरम पाण्याने आंघोळ केल्यास डोकेदुखीचा त्रास दूर होतो. ४. स्नायूंमध्ये वेदना आणि सूज येण्याची समस्या दूर होते.
डाएटमध्ये करा ४ पदार्थांचा समावेश, चेहरा दिसू लागेल तरुण - सुरकुत्या गायब...
गरम पाण्याची आंघोळ करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवा :-
१. आंघोळीसाठी गरम पाण्याचे तापमान ३८ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नसावे.
२. गरम पाणी थेट डोक्यावर ओतू नये. सुरुवात पायांपासून करून आधी आपले पाय आणि हात गरम पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावेत.
३. अनेकांना वर्षभर गार पाण्याने आंघोळ करण्याची सवय असते. तर काहीजण खूप जास्त प्रमाणात गरम पाणी घेतात. या दोन्हीचा आरोग्यावर विपरीत परीणाम होतो. रोजच्या आंघोळीसाठी पाणी खूप गरम आणि खूप गार असू नये. तर कोमट पाण्याने आंघोळ करणे केव्हाही जास्त चांगले. तसेच डोक्यावरुन आंघोळ करताना गरम पाण्याचा वापर शक्यतो टाळावा.
४. गरम पाण्याने आंघोळ करण्यासाठी १५ ते ३० मिनिटे पुरेशी आहेत.
५. गरम पाण्याने आंघोळ केल्यानंतर मॉइश्चरायझर वापरा. गरम पाण्याने त्वचा कोरडी होऊ शकते, त्यामुळे आंघोळीनंतर क्रीम किंवा लोशन वापरणे गरजेचे आहे.
काजळ जरुर लावा, पण हमखास होणारी १ चूक टाळा, नाहीतर डोळे व आजूबाजूची त्वचा होईल खराब...
गरम पाण्याने आंघोळ करताना या चुका टाळा :-
१. दिवसातून अनेक वेळा गरम पाण्याने आंघोळ करणे टाळावे, यामुळे त्वचा कोरडी होऊ शकते.
२. गरम पाण्याच्या आंघोळीसाठी खूप गरम पाणी वापरू नये यामुळे त्वचेची जळजळ होऊ शकते.
३. गरम पाणी वापरल्यानंतर लगेच थंड पाणी वापरणे टाळावे असे केल्याने आपले आरोग्य बिघडण्यासोबतच त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.