Join us  

वाढत्या उन्हात केसांचे हाल; लक्षात ठेवा फक्त 7 नियम- केस कायम सुंदर-सुळसुळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2022 4:14 PM

उन्हाळ्यातच नाही तर एरवीही केस निरोगी, सुंदर आणि सुळसुळीत हवे असतील तर हेअर केअर रुल्स पाळणं गरजेचे आहेत. हे हेअर रुल्स काय सांगतात?

ठळक मुद्देतेल न लावता केस धुणं ही चुकीची बाब असून यामुळे केस खराब होतात. केसांवर हिटींग टुल्सचा वापर टाळावा.उन्हाळ्यात एक दिवसाआड केस धुवावेत. 

कोणालाही आपले केस सुंदर असावेत, निरोगी असावेत असंच वाटणार. पण वाटले म्हणून केस छान झाले असं होत नाही. केसांवर ऊन, वातवरण, प्रदूषण, खाणंपिणं या गोष्टींचा परिणाम होतो. सुंदर निरोगी केसांसाठी केसांची काळजी घेणं आवश्यक. उन्हाळ्यात तर केसांचे हाल झाले म्हणावेत इतके केस खराब होतात. हे टाळण्यासाठी केसांची निगा राखणारे नियम पाळणं आवश्यकच. उन्हाळ्यातच नाही तर एरवीही केस निरोगी, सुंदर आणि सुळसुळीत हवे असतील तर हेअर केअर रुल्स पाळणं गरजेचे आहेत.

Image: Google

 हेअर रुल्स काय सांगतात?

1. उन्हाळ्यात घामानं केस ओले राहातात आणि सतत ते खराब झाल्याची जाणीव होते. त्यामुळे केस धुण्याचं प्रमाण उन्हाळ्यात वाढत. पण त्यामुळे केस जास्तच निस्तेज होतात. हे टाळण्यासाठी केस धुण्याच्या आधी तेलाचा नियम पाळावा. केस कधीही तेल न लावता धुवू नये हा नियम आहे. केसांमधील आर्द्रता राखण्यासाठी, केसांवर चमक येण्यासाठी केस धुण्याच्या एक तास आधी केसांना खोबऱ्याचं तेल लावावं. केस धुण्याआधी केसांना तेल लावल्यास केशतंतू मजबूत होतात.

Image: Google

2.  केस धुण्यासाठी कोणता शाम्पू आणि कंडिशनर वापरतो हा मुद्दा केवळ उन्हाळ्यातच नाही तर एरवीही महत्वाचा. केस धुण्यासाठी रसायन आणि सल्फेट मुक्त शाम्पू वापरावा. यामुळे केसातील कोरडेपणा कमी होतो आणि केसातील ओलसरपणा राखला जातो. रसायनयुक्त शाम्पू वापरल्यानं केसांची मुळं कोरडी होतात. त्यामुळे केसांना नैसर्गिक घटकांनी युक्त शाम्पू कंडिशनर लावावं.

3. घराबाहेर जाताना, उन्हात वावरताना केसांची योग्य काळजी घेतली नाही तर केस उन्हामुळे खराब होतात. बाहेर जाताना केस रुमाल वा कॅपनं झाकलेले असावेत. केसांना झाकण्यासाठी सूती स्टोलचा उपयोग करावा. यामुळे केसांचं उन्हापसून संरक्षण तर होतंच सोबतच केसांना गारवाही मिळतो. सूर्याच्या अति नील किरणांचा त्वचेप्रमाणे केसांवरही परिणाम होतो. म्हणूनच केसांचं संरक्षण व्हावं या हेतूनं केसांवर यूवी फिल्टर स्प्रे, जेल वा क्रीम यांचा वापर कराव. ही काळजी घेतल्यानं उन्हानं केस जळत नाही. 

4.केसांची वाढ निरोगी होण्यासाठी  दर तीन महिन्यांनी केस थोडे कापावेत. ट्रिम करावेत. यामुळे केसांना उंदरी लागलेली असल्यास ती निघून जाते. हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात केस जास्त वाढतात. त्यामुळे दर तीन महिन्यांनी केस थोडे कापल्यास केसांची वाढ नीट होते. केस निरोगी राहातात शिवाय केस दाटही होतात. 

Image: Google

5. हेयर स्ट्रेटनेर, ब्लोअर, ड्रायर या हिटिंग टूल्सचा केसांवर वापर करु नये. या टूल्सच्या वापरानं केस तुटतात. हिटिंग टूल्स वारंवार वापरल्यास केसातील कोरडेपणा वाढून केस निस्तेज दिसतात. उन्हाळ्यात केस धुवायचे असल्यास ते रात्री झोपण्यापूर्वी धुवावेत.  धुतल्यानंतर केस नीट सुकवावेत.  झोपण्यापूर्वी केस हेयरबॅण्डनं सैलसर बांधावेत किंवा पोनीटेल घालावी. या उपायानं केस सकाळी सुंदर दिसतात. 

Image: Google

6.  एरवीपेक्षा उन्हाळ्यात जास्त घाम येतो. गरम हवेनं केसात चिकटपणा निर्माण होतो. कोरड्या आणि दूषित हवेने केसांमध्ये घाण साठते. केस स्वच्छ राखणं महत्वाचं. म्हणूनच उन्हाळ्यात एरवीपेक्षा जास्त वेळा केस धुवावे लागतात. केस धुण्याआधी केसांना खोबरेल तेल लावणं आणि केसांसाठी सौम्य प्रकारचा शाम्पू वापरणं हे दोन नियम पाळायलाच हवेत. उन्हाळ्यात एक दिवसाआड केस धुणं फायदेशीर असल्याचं तज्ज्ञ सांगतात. 

Image: Google

7.केस निरोगी आणि सुंदर राहाण्यासाठी केसांची वरुन काळजी घेणं जितकं गरजेचं तितकंच केसांना आहाराद्वारे पोषण मिळणंही महत्त्वाचं असतं. केसांचं पोषण होवून केस मजबूत होण्यासाठी आहारात हिरव्या भाज्या, सोयाबीन, रताळी, सुकामेवा या अन्न पदार्थांची आवश्यकता असते. या अन्नपदार्थातून केसांच्या पोषणासाठी आवश्यक लोह, बीटा केरोटीन, अ जीवनसत्व आणि ओमेगा 3 हे महत्वाचे घटक मिळून केस दाट आणि मजबूत होतात. 

टॅग्स :केसांची काळजीसमर स्पेशलब्यूटी टिप्स