चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स (Blackheads) येणं हे फार कॉमन आहे. वातावरणातील धूळ, प्रदूषण, माती हे आपल्या त्वचेवर जाऊन चिकटतात आणि त्वचेवरील छिद्रात (Skin Pores) ही घाण साचून त्या जागी ब्लॅकहेड्स तयार होतात. बहुतेकवेळा ब्लॅकहेड्स हे ओठांखाली, नाक, हनुवटी यांसारख्या भागात फार मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. ब्लॅकहेड्स काढणं खूपच कठीण असतं, कारण ते मुळापासून त्वचेला चिकटलेले असतात आणि सहज निघायचं नाव घेत नाहीत. काहीवेळा आपली त्वचा स्वच्छ असते, पण नाक, ओठ, हनुवटी हे ब्लॅकहेड्सने भरलेले असतात. यासाठी काही घरगुती उपाय करून आपण ब्लॅकहेड्सची समस्या दूर करू शकतात(Effective Home Remedies For Blackhead Removal From Your Nose).
चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स अनेकदा क्लिन करुनही काही दिवसांतच पुन्हा येतात. अशावेळी आपण या ब्लॅकहेड्सच्या समस्येने हैराण होतो, कारण चेहरा कितीही क्लिन केला तरीही हे ब्लॅकहेड्स जाता जात नाहीत. जर ब्लॅकहेड्स पुन्हा पुन्हा येत असतील तर आपण घरच्या घरी सोपे उपाय करु शकतो. चेहऱ्यावरील हेब्लॅकहेड्स स्वच्छ करण्यासाठी घरी बनवलेला नैसर्गिक स्क्रब मास्क फायदेशीर ठरतो. यामुळे त्वचा स्वच्छ आणि चमकदार होण्यास मदत होईल. चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स (Remedies For Black Heads Removal At Home) काढण्यासाठी आता महागड्या प्रॉडक्ट्सची गरज नाही. घरीच करा नैसर्गिक गोष्टींचा वापर करून ब्लॅकहेड्स रिमूव्हल मास्क. हा मास्क नेमका कसा बनवायचा ते पाहूयात(Best Home Remedies To Remove Blackheads).
साहित्य :-
१. कच्च्या बटाट्याचा रस - २ ते ३ टेबलस्पून
२. लिंबाचा रस - २ टेबलस्पून
३. तुरटीची पावडर - १/२ टेबलस्पून
४. खोबरेल तेल - १ टेबलस्पून
५. बेसन - १ टेबलस्पून
६. हळद - १/२ टेबलस्पून
केसांच्या अनेक समस्यांवर 'पोटली मसाज' एक उत्तम उपाय, केसांचे सौंदर्य राहील कायम...
केस काळे करण्यासाठी विसरा विकतचे डाय, घ्या सोपा घरगुती उपाय! केस काळेभोर - नो साइड इफेक्ट्स...
ब्लॅकहेड्स रिमूव्हल मास्क बनवण्याची पद्धत :-
एका वाटीत कच्च्या बटाट्याचा रस, लिंबाचा रस, तुरटीची पावडर, खोबरेल तेल, बेसन, हळद घेऊन हे सगळे जिन्नस चमच्याने ढवळून एकजीव करुन घ्यावेत. या मिश्रणाची पातळसर पेस्ट बनवावी.
ब्लॅकहेड्स रिमूव्हल मास्क लावण्याची पद्धत :-
ब्लॅकहेड्स रिमूव्हल मास्क तयार झाल्यानंतर बोटाच्या किंवा ब्रशच्या साहाय्याने ओठांखाली, नाकावर, हनुवटीला लावून घ्यावा. आता ज्या भागात ब्लॅकहेड्स आहेत त्या भागात हलक्या हाताने मसाज करुन घ्यावा. त्यानंतर थोड्यावेळासाठी हा मास्क तसाच स्किनवर लावून ठेवावा. हा मास्क संपूर्णपणे सुकू द्यावा. सुकल्यानंतर बोटांनी परत एकदा मसाज करावा. आता स्वच्छ पाण्याने चेहरा धुवावा. अशा प्रकारे आपण घरगुती मास्कचा वापर करुन झटपट ब्लॅकहेड्स काढू शकतो.