Lokmat Sakhi >Beauty > हिवाळ्यात टाचा फुटल्या-चालता येत नाही ? करा मेणबत्तीचा एका खास उपाय, भेगा होतील कमी...

हिवाळ्यात टाचा फुटल्या-चालता येत नाही ? करा मेणबत्तीचा एका खास उपाय, भेगा होतील कमी...

How to heal cracked heels in winters : Effective Home Remedy to Heal Cracked Heels : How to care for dry, cracked heels : Remove Cracked Heels By Using Candle Wax : थंडीच्या दिवसांत पायांना भेगा पडण्याचा त्रास होऊ नये यासाठीच हा भन्नाट उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2024 09:00 AM2024-11-27T09:00:00+5:302024-11-27T09:00:02+5:30

How to heal cracked heels in winters : Effective Home Remedy to Heal Cracked Heels : How to care for dry, cracked heels : Remove Cracked Heels By Using Candle Wax : थंडीच्या दिवसांत पायांना भेगा पडण्याचा त्रास होऊ नये यासाठीच हा भन्नाट उपाय...

Remove Cracked Heels By Using Candle Wax Wax For Cracked Heels - Easy Home Remedy How to heal cracked heels in winters | हिवाळ्यात टाचा फुटल्या-चालता येत नाही ? करा मेणबत्तीचा एका खास उपाय, भेगा होतील कमी...

हिवाळ्यात टाचा फुटल्या-चालता येत नाही ? करा मेणबत्तीचा एका खास उपाय, भेगा होतील कमी...

वातावरणातील वाढत्या थंडीचा थेट परिणाम आपल्या टाचांवर दिसून येतो. थंडीत त्वचा कोरडी पडणे, त्वेचेला भेगा - सुरकुत्या पडणे अशा समस्या होणे अगदी कॉमन आहे. परंतु आपण हिवाळ्यात भेगा पडलेल्या टाचांकडे अजिबात लक्ष न देता आपल्या संपूर्ण त्वचेची विशेष काळजी घेतो. थंडीत पायाच्या तळव्याला भेगा पडून पाय दुखणे, इन्फेक्शन असे त्रास सतावू शकतात. विशेषतः जर पायाच्या भेगांमुळे त्यात माती अडकून राहते व संसर्ग वाढण्याचा धोका असतो. यामुळेच थंडीत अनेकजण पाय दुखत असल्याची तक्रार करतात(Wax For Cracked Heels - Easy Home Remedy).

कधी कधी भेगा पडलेल्या टाचांमधून खूप वेदना होतात. गंभीर अवस्थेत त्यातून रक्तही बाहेर पडू लागते, काहीवेळा तर पाय जमिनीवर टेकवणही कठीण होतं.  हिवाळ्यात पायांच्या टाचांना भेगा (Candle Wax For Cracked Heels) पडण्याची समस्या पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त दिसून येते, असे बहुतांश वेळा (How to heal cracked heels in winters) दिसून आले आहे. थंडीच्या दिवसांत पायांना  भेगा पडण्याचा त्रास खूप जणांना होतोच, मात्र त्याची योग्य काळजी घेतल्यास ही समस्या दूर होऊ शकते. यासाठीच आपण या भेगा कमी करण्यासाठी एका खास घरगुती उपायाचा वापर नक्की करु शकतो(Remove Cracked Heels By Using Candle Wax).

हिवाळ्यांत पायांना भेगा पडल्या तर करा हा खास उपाय... 

हिवाळ्यात पायांच्या टाचांना भेगा - सुरकुत्या पडू नये म्हणून एक खास घरगुती उपाय masalakitchenbypoonam या इंस्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. हा उपाय नेमका काय आहे ते पाहूयात. हिवाळ्यात पायांची त्वचा फुटून भेगा पडू नये यासाठी घरगुती उपाय करण्यसाठी मेण, खोबरेल तेल, पेट्रोलियम जेली, व्हिटॅमिन 'ई' कॅप्सूल, बेकिंग सोडा इतके साहित्य लागणार आहे. 

हिवाळ्यात केसांतला कोंडा वाढतो, खाजही येते? ४ गोष्टी करा- डोक्यातला कोंडा वर्षभर परतणार नाही...

सगळ्यात आधी एका मोठ्या काचेच्या बाऊलमध्ये मेण घेऊन त्याचे  छोटे छोटे तुकडे करुन घ्यावेत. आता या मेणाच्या तुकड्यात १ टेबलस्पून पेट्रोलियम जेली, ३ ते ५ टेबलस्पून खोबरेल तेल, आणि व्हिटॅमिन 'ई' ची कॅप्सूल फोडून घालावी. आता एका मोठ्या खोलगट कढईत पाणी घेऊन ते पाणी चांगले उकळवून घ्यावे. या उकळवून घेतलेल्या गरम पाण्यांत सगळे मिश्रण एकजीव केलेला काचेचा बाऊल ठेवावा. आणि सगळे मिश्रण संपूर्णपणे वितळवून घ्यावे. मिश्रण थोडे वितळत आल्यावर त्यात १ टेबलस्पून बेकिंग सोडा घालावा. मिश्रण संपूर्णपणे वितळवून झाल्यावर आपले तळपाय स्वच्छ धुवून पुसून कोरडे करुन घ्यावेत. आता तळपायांवर एका जुन्या ब्रशच्या मदतीने हे मिश्रण थोडे कोमट झाल्यावर पसरवून लावून घ्यावे. १५ ते २० मिनिटे तळपायांवर हे मिश्रण असेच लावून ठेवावे. मिश्रण संपूर्णपणे सुकल्यावर चमचा किंवा सुरीच्या मदतीने हे तळपायांवरचे मिश्रण खरवडून काढून घ्यावे. मग पायांत सॉक्स घालूंन झोपावे. दुसऱ्या दिवशी तुम्हाला तुमच्या टाचांच्या त्वचेत अधिक फरक जाणवेल. आठवड्यातून किमान २ वेळा तरी हा उपाय करावा. यामुळे हिवाळ्यात पायांच्या फुटलेल्या टाचा पुन्हा पहिल्यासारख्या दिसू लागतील. अशाप्रकारे आपण पायांच्या टाचांना भेगा पडू नये म्हणून हा घरगुती सोपा उपाय करू शकतो.   

जावेद हबीब सांगतात तेलात मिसळा एक सिक्रेट पदार्थ, हिवाळ्यात केसांचा ड्रायनेस गायब - केस दिसतील मऊमुलायम...


थंडीत त्वचेला मायेनं लावा या ५ पैकी १ गोष्ट रोज, कोरडी त्वचा-पायाला भेगा- सगळ्यांवर उत्तम उपाय...

यासोबतच आपण इतरही उपाय करु शकता... 

१. पाय २० मिनिटं गरम पाण्यात भिजवून ठेवा. 
२. ऑईलबेस्ड पेट्रोलिअम जेलीचा वापर करा. 
३. रात्री झोपताना पायांत मोजे घाला. 
४. अनवाणी पाय जमिनीवर ठेऊ नका.

Web Title: Remove Cracked Heels By Using Candle Wax Wax For Cracked Heels - Easy Home Remedy How to heal cracked heels in winters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.