चेहेऱ्याची त्वचा चांगली राहाण्यासाठी आपण खूप जागरुकपणे काळजी घेतो. पण तितकी जागरुकता पायाच्या बाबतीत घेत नाही. पायाच्या त्वचेचीही काळजी घ्यावी लागते ही गोष्ट आपल्या गावीच नसते आणि अचानक एके दिवशी पाय फारच काळपट पडलेले (foot tanning) दिसतात. हा काळपटपणा मग डोळ्यात खूपतो. यावर उपाय करण्यासाठी बाजारात अशा फूट केअर प्रोडक्टचा (foot care product) शोध घेतला जातो ज्याद्वारे पायाच्या त्वचेचा रंग उजळेल. पण बाहेरचे प्रोडक्टस न वापरता घरच्या घरी उपाय करुनही (home made foot scrub for remove tanning from foot) पायाची त्वचा स्वच्छ आणि उजळ करता येते. यासाठी खूप सामग्रीची आवश्यकता नसते.
Image: Google
पायाची त्वचा उजळ करण्यासाठी
पायाची त्वचा उजळ करण्यासाठी घरच्याघरी उपाय करण्यासाठी 1 कप पाणी, 1 मोठा चमचा बेकिंग पावडर, 1 छोटा चमचा कोरफड गर आणि 1 छोटा चमचा मीठ घ्यावं. एका मोठ्या वाटीत बेकिंग सोडा आणि मीठ घ्यावं. त्यात कोरफड गर मिसळून हे सर्व एकजीव करावं. या मिश्रणानं पायाला स्क्रब करावं. 5 मिनिटं पायाला स्क्रब केल्यानंतर टबात कोमट पाणी घ्यावं. पाय पाण्यात बुडवून 15 मिनिटं बसावं. नंतर पाण्यातून पाय काढून रुमालानं पुसावे. वाटीत खोबऱ्याचं तेल घेऊन तेलानं पायाला हलक्या हातानं मसाज करावा. हा उपाय काही दिवस नियमित केल्यास पायाची त्वचा स्वच्छ होते, काळपटपणा दूर होवून पाय उजळ दिसतात.
Image: Google
बेकिंग सोड्याचं फूट स्क्रब पायाला लावताना बेकिंग सोडा खूप वेळ पायाला लावून ठेवू नये. यामुळे पायाची त्वचा कोरडी होवून पायाच्या त्वचेला लाल पुरळ येवू शकते. त्यासाठी बेकिंग सोड्याचा लेप फार वेळ पायाला लावून ठेवू नये सोबतच पाय धुतल्यानंतर खोबऱ्याच्या तेलानं पायाला मसाज करणे आवश्यक आहे. पायाला जखम असल्यास पायाचा काळेपणा घालवण्यासाठी हा उपाय करु नये.
बेकिंग सोड्याचं फूट स्क्रब केल्यानं पायावरील मृत त्वचा निघून जाते. पायाची त्वचा मऊ मुलायम होवून ती चमकते. पायाच्याच नव्हे तर चेहऱ्यावर काळे डाग असल्यास हा उपाय करता येतो. त्वचेला खाज येत असल्यास, खूप घाम येवून घामाचा वास येत असल्यास बेकिंग सोडा आणि कोरफडचा हा उपाय करता येतो.