Join us  

चिखलातून वाट काढताना पाय काळवंडले? टॅनिंग घालवण्यासाठी 'बेकिंग सोड्याचा' करा असा वापर; दिसेल फरक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2024 7:09 PM

Remove tan from hands and legs at home, by using Baking Soda : पायाचे टॅनिंग घालवण्यासाठी महागडे पेडीक्युअर कशाला? बेकिंग सोड्यामुळेही टॅनिंग निघेल

पावसाळ्यात चेहऱ्यासह पायाचे टॅनिंग देखील वाढते (Tanning removal). चेहऱ्याचे टॅनिंग घालवण्यासाठी आपण विविध उपाय करून पाहतो. पण पायाचे आणि हाताचे टॅनिंग घालवण्याकडे आपण अधिक लक्ष देत नाहीत (Skin care). ज्यामुळे पाय अधिक काळपट दिसतात. पावसाळ्यात, पाऊस, धूळ आणि चिखलामुळे पाय अधिक काळवंडतात. पाय काळवंडल्याने अनेकदा चारचौघात लाजिरवाणे वाटते.

काळवंडलेले पायाची टॅनिंग दूर करण्यासाठी बरेच जण, ब्यूटी पार्लरमध्ये जातात. पण महागडे पेडीक्युअर करण्यापेक्षा आपण घरातच घरगुती उपाय करून काळवंडलेले पाय स्वच्छ करू शकता(Remove tan from hands and legs at home, by using Baking Soda).

काळवंडलेले पाय स्वच्छ करण्यासाठी लागणारं साहित्य

पेट्रोलियम जेली

बेकिंग सोडा

एक रुपयाही खर्च न करता स्ट्रेच मार्क्स होतील गायब; फक्त 'या' ४ तेलांचा करा असा सोपा वापर..

लिंबाचा रस

मध

अशा पद्धतीने तयार करा टॅनिंग रिमुव्हल क्रीम

सर्वात आधी एका बाऊलमध्ये एक चमचा पेट्रोलियम जेली घ्या. त्यात अर्धा चमचा बेकिंग सोडा, एक चमचा लिंबाचा रस आणि अर्धा चमचा मध घालून मिक्स करा. अशाप्रकारे घरगुती टॅनिंग रिमुव्हल क्रीम रेडी.

या पद्धतीने पायांवर टॅनिंग रिमुव्हल क्रीमचा वापर करा

सर्वात आधी पाय स्वच्छ धुवून घ्या. तयार टॅनिंग रिमुव्हल क्रीम पायांवर लावून मसाज करा. काही वेळानंतर टॅनिंग रिमुव्हल क्रीम एका ओल्या कापडाने प्सुसून काढा. आपण या उपायाचा वापर आठवड्यातून २ वेळा करू शकता. यामुळे नक्कीच टॅनिंग निघेल.

भिजलेले बदाम की शेंगदाणे? सद्गुरू सांगतात मुठभर 'ही' गोष्ट खा; दिवसभर राहाल एनर्जेटिक

त्वचेसाठी बेकिंग सोड्याचे फायदे

- बकिंग सोडा स्वयंपाकघरात सहज उपलब्ध होते. याचा वापर आपण स्किनसाठीही करू शकता. यातील दाणेदार पोतमुळे त्वचेला एक्सफोलिएट करण्यास मदत करते. तसेच यात अँटीफंगल, अँटीसेप्टिक आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे घटक आढळतात. ज्यामुळे त्वचा क्लिन होते. 

टॅग्स :त्वचेची काळजीस्वच्छता टिप्स