Lokmat Sakhi >Beauty > मऊ सुळसुळीत केस हवेत? केस धुताना वापरा १ सोपी ट्रिक, कोरड्या रखरखीत केसांची चिंताच सोडा

मऊ सुळसुळीत केस हवेत? केस धुताना वापरा १ सोपी ट्रिक, कोरड्या रखरखीत केसांची चिंताच सोडा

Reverse Wash Method Hair Care Tips : ही मेथड नेमकी काय आहे आणि त्याचा कसा फायदा होतो याविषयी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2023 11:48 AM2023-03-09T11:48:45+5:302023-03-09T15:35:11+5:30

Reverse Wash Method Hair Care Tips : ही मेथड नेमकी काय आहे आणि त्याचा कसा फायदा होतो याविषयी...

Reverse Wash Method Hair Care Tips : hairs become dry? Use 1 simple trick while washing hair, hair will be soft | मऊ सुळसुळीत केस हवेत? केस धुताना वापरा १ सोपी ट्रिक, कोरड्या रखरखीत केसांची चिंताच सोडा

मऊ सुळसुळीत केस हवेत? केस धुताना वापरा १ सोपी ट्रिक, कोरड्या रखरखीत केसांची चिंताच सोडा

उन्हाळ्याच्या दिवसांत हवा कोरडी असल्याने आणि हवेत जास्त प्रमाणात धग असल्याने केस आणि त्वचा खराब होण्याची शक्यता असते. केसात कोंडा होणे, घामाने चिकट होणे, गळणे अशा केसांच्या काही ना काही समस्या अनेकांना त्रास देतात. कोरड्या हवेमुळे आणि त्यातही घाम येत असल्याने केस कोरडे-रखरखीत होतात. केस कोरडे झाले की ते फारच खराब दिसतात. आपले केस अभिनेत्रींप्रमाणे दाट आणि मुलायम असावेत असं आपल्याला कायम वाटतं. पण काही ना काही कारणानी ते खराब होतात आणि मग त्यासाठी नेमका काय उपाय करायचा ते आपल्याला समजत नाही (Reverse Wash Method Hair Care Tips). 

मग पार्लरच्या महागड्या ट्रिटमेंट घेऊन आपण ते चांगले करायचा प्रयत्न करतो खरा पण त्याचा विशेष उपयोग होतोच असे नाही. पाहूयात केस दाट-मुलायम राहावेत यासाठी आपल्याला बरेच प्रयत्न करावे लागतात. सामान्यपणे आपण केसांना तेल लावतो आणि दुसऱ्या दिवशी शाम्पू आणि कंडीशनरने केस धुतो आणि त्यानंतर केसांना सिरम लावतो. ही पद्धत जरी योग्य असली तरी आज आपण एक थोडी वेगळी पद्धत पाहणार आहोत. केसांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी रिव्हर्स वॉश मेथडने केस धुवायला हवेत. पाहूयात ही मेथड नेमकी काय आहे आणि त्याचा कसा फायदा होतो. 

काय आहे रिव्हर्स वॉश मेथड 

आपण आपल्या केसांना सूट होईल असा शाम्पू आणि कंडीशनर वापरतो. हाच शाम्पू आणि कंडीशनर घेऊन ही पद्धत करायची आहे. त्यासाठी केस थोडे ओले करुन घ्यायचे, त्यानंतर केसांना सगळीकडे व्यवस्थित कंडीशनर लावून घ्यायचा. मग साधारण ३ ते ५ मिनीटे हा कंडीशनर केसांवर तसाच ठेवायचा. त्यानंतर कोमट पाण्याने केस स्वच्छ धुवून घ्यायचे. मग नेहमीप्रमाणे केसांच्या मुळांना शाम्पू लावायचा आणि केस धुवायचे. यानंतर पुन्हा नेहमीप्रमाणे कंडीशनर लावायचा आणि केस पाण्याने स्वच्छ धुवायचे. 

याचा फायदा काय? 

कंडीशनरमुळे केसांचा कोरडेपणा, रुक्षपणा कमी होण्यास मदत होते. या रिव्हर्स वॉश मेथडमध्ये २ वेळा कंडीशनर लावल्याने केस जास्त मुलायम होण्यास मदत होते. आपण उन्हाळ्याच्या दिवसांत घाम येत असल्याने आठवड्यातून २ ते ३ वेळा केस धुतो. रोजच्या धावपळीत केसांसाठी नेहमी इतका वेळ देणे शक्य होतेच असे नाही. मात्र आठवड्याचून किमान एकदा ही पद्धत वापरुन पाहा, त्यामुळे नक्कीच तुमचे केस आधीपेक्षा छान मुलायम झाल्याचे दिसेल. 
 

Web Title: Reverse Wash Method Hair Care Tips : hairs become dry? Use 1 simple trick while washing hair, hair will be soft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.