Lokmat Sakhi >Beauty > १ वाटी उरलेल्या भाताचा १ सोपा उपाय त्वचेवर करा; गोल्ड फेशियलपेक्षा जास्त ग्लो चेहऱ्यावर येईल

१ वाटी उरलेल्या भाताचा १ सोपा उपाय त्वचेवर करा; गोल्ड फेशियलपेक्षा जास्त ग्लो चेहऱ्यावर येईल

Rice Face Pack For Glowing Skin (Skin Care Tips in Marathi) : ना ब्लीच ना फेशियल; वाटीभर उरलेला भात घ्या-सोपा उपाय करा; तेज येईल- ग्लोईंग दिसेल चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 12:25 PM2024-01-25T12:25:11+5:302024-01-25T14:58:24+5:30

Rice Face Pack For Glowing Skin (Skin Care Tips in Marathi) : ना ब्लीच ना फेशियल; वाटीभर उरलेला भात घ्या-सोपा उपाय करा; तेज येईल- ग्लोईंग दिसेल चेहरा

Rice Face Pack For Glowing Skin : 3 Best Rice Flour Face Pack For Healthy Skin | १ वाटी उरलेल्या भाताचा १ सोपा उपाय त्वचेवर करा; गोल्ड फेशियलपेक्षा जास्त ग्लो चेहऱ्यावर येईल

१ वाटी उरलेल्या भाताचा १ सोपा उपाय त्वचेवर करा; गोल्ड फेशियलपेक्षा जास्त ग्लो चेहऱ्यावर येईल

थंडीच्या दिवसांत त्वचा ताणल्यासारखी किंवा कडक दिसून येते. (Winter Care Tips) मॉईश्चराजर लावल्यानंतरही चेहरा काळा पडतो. चेहरा काळा पडू नये यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता. (Rice Face Pack For Skin Whitening) जसं की भात आपल्या प्रत्येकाच्याच घरी असतो भाताचा वापर करून तुम्ही त्वचेवर ग्लो मिळवू शकता. (Rice Face Pack) त्यासाठी पार्लरमध्ये जाऊन हजारो रूपये खर्च करण्याची काहीही गरज नाही. (How to Get A Glowing Face)

घरच्याघरी भाताचा फेसपॅक कसा करायचा? (How to Make Rice Face Pack At Home)

एका वाटीत भात घ्या. त्यात 4 ते 5 चमचे दूध घाला. त्यात मध घाला. मधात एलोवेरा जेल घाला. याचे मिश्रण तयार करून ते चेहऱ्याला लावा. चेहऱ्याला लावल्यानंतर  5 ते 10 मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवून घ्या. ही क्रिम चेहऱ्याला लावल्याने चांगला ग्लो येईल. कोणताही खर्च न करता चेहरा चमकलेला दिसेल.

तांदूळ, मध आणि लिंबाचा फेस पॅक तयार करा

जवळपास अर्धी वाटी तांदूळ मिक्सरमध्य वाटून त्याची पेस्ट तयार करून घ्या. त्यानंतर या मिश्रणात 1 चमचा मध आणि 1 चमचा लिंबाचा रस मिसळा. हे लावल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या हा पॅक जवळपास 20 मिनिटांसाठी चेहऱ्याला लावून ठेवा. सुकल्यानंतर साध्या पाण्याने चेहरा धुवा. आठवड्यातून एकदा या पाण्यान चेहरा धुवा. आठवड्याभरातच चांगल परिणाम दिसून येईल.

दातांवर पिवळा थर आलाय, दुर्गंध येतो? किचनमधल्या ४ गोष्टींनी दात घासा, पांढरेशुभ्र होतील दात

भात आणि दह्याचा फेसपॅक

भातात एमिनो एसिड आणि व्हिटामीन्स असतात. जे त्वचेसाठी स्किन व्हाईटनिंग एजंटप्रमाणे काम करतात. ज्यामुळे त्वचेवर तेज येतं.  मध आणि दही मिसळून याची पेस्ट तयार करा आणि चेहऱ्याला लावा. अर्ध्या तास तसंच लावून ठेवा त्यानंतर हातांवर पाणी लावून चेहऱ्याला हलक्या हाताने स्क्रबिंग करा. ५ मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या. हा फेस पॅक  लावल्याने सुरकुत्या आणि डार्क सर्कल्स येत नाहीत.

भात आणि एलोवेराचा फेस पॅक (Rice And Aloe vera Face Pack)

एक चमचा तांदळाच्या पिठात दीड चमचा एलोवेरा जेल आणि जवळपास ५ ते ६ थेंब गुलाबपाणी घाला. हे मिश्रण चेहऱ्याला लावून जवळपास  १५ आणि २० मिनिटांसाठी लावून ठेवा. या पाण्याने चेहरा स्वच्छ करा. हा पॅक आठवड्यातून २ वेळा लावा. एलोवेरा स्किनसाठी फायदेशीर ठरते. स्किनमुळे अल्ट्राव्हायलेट किरणांपासून होणारं नुकसान टाळता येतं. यामुळे त्वचेत मॉईश्चर टिकून राहतं आणि वाढत्या वयाचा परिणाम दिसून येत नाही. (फुफ्फसांमधली घाण बाहेर काढतील ५ घरगुती उपाय; फुफ्फुसं डिटॉक्स होतील-कफ, खोकला टळेल)

Web Title: Rice Face Pack For Glowing Skin : 3 Best Rice Flour Face Pack For Healthy Skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.