सध्या लग्नसराईचे दिवस सुरु आहेत. त्यामुळे बऱ्याच जणी पार्लरमध्ये जाऊन महागडे फेशियल करून घेत आहेत. पण तुम्हाला जर फेशियलसाठी हजारो रुपये घालविण्याची इच्छा नसेल किंवा पार्लरमध्ये जाऊन फेशियल करुन घेण्याइतका वेळ नसेल तर घरच्याघरी कोरियन तरुणी करतात त्याप्रमाणे राईस फेशियल कसं करायचं पाहा (how to do rice facial for getting bright glow like Korian women). महागडे फेशियल करूनही त्वचेवर जो ग्लो येणार नाही, असा कमालीचा ग्लो हे अर्ध्या तासाचं राईस फेशियल तुम्हाला देऊन जाईल. बाहेर ज्यासाठी तुम्हाला हजारो रुपये मोजावे लागतात, असं राईस फेशियल अगदी स्वस्तात घरच्याघरी कसं करायचं ते पाहा. हा उपाय केल्यानंतर तुम्हाला प्रत्येकजणच तुमच्या चमकदार त्वचेचं सिक्रेट विचारेल... करून पाहा... (rice facial for flawless skin and radiant glow in just 20 minutes)
घरच्याघरी राईस फेशियल कसं करायचं?
कोरियन तरुणी करतात त्याप्रमाणे घरच्याघरी राईस फेशियल कसं करायचं, याविषयीचा व्हिडिओ rohitsachdeva1 या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
हाय रे तेरा झुमका! नवरीसाठी बघा खास लग्नसराई स्पेशल कस्टमाईज कानातल्यांचे ७ सुंदर डिझाईन्स
पहिली स्टेपहे फेशियल करण्यासाठीची सगळ्यात पहिली स्टेप आहे क्लिंझिंग. यासाठी राईस वॉटरमध्ये एक कॉटनचा कपडा बुडवा आणि त्याने तुमचा चेहरा, मान, गळा व्यवस्थित पुसून स्वच्छ करून घ्या. राईस वॉटर तयार करण्यासासाठी तांदूळ २ ते ३ वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्यात पुन्हा पाणी टाका आणि तांदूळ त्या पाण्यात १५ ते २० तासांसाठी राहू द्या. यानंतर पाणी गाळून घ्या. याला म्हणायचं राईस वॉटर.
दुसरी स्टेप
राईस फेशियल करण्याची दुसरी स्टेप आहे स्क्रबिंग. यासाठी तांदळाचं पीठ घ्या. त्यात राईस वॉटर घालून ते कालवा आणि या मिश्रणाने चेहऱ्याला ५ ते ७ मिनिटे स्क्रबिंग करा.
उन्हाळा स्पेशल दही- भात रेसिपी, उरलेल्या भाताला साजूक तुपाचा सुगंधी तडका- बघा चवदार रेसिपी
त्वचेवरची सगळी घाण, डेडस्किन, टॅनिंग निघून जाईल आणि त्वचा स्वच्छ होईल.
तिसरी स्टेप
तिसरी स्टेप आहे त्वचेला मॉईश्चराईज करण्याची. त्यासाठी आपण राईस वॉटर आणि ॲलोव्हेरा जेल वापरणार आहोत. राईस वॉटरमध्ये थोडं ॲलोव्हेरा जेल टाका. दोन्ही पदार्थ छान एकजीव झाले की त्याने चेहऱ्याला १० ते १२ मिनिटांसाठी मसाज करा. यामुळे त्वचा छान मॉईश्चराईज होईल.
चौथी स्टेप
चाैथ्या स्टेपमध्ये आपण चेहऱ्याला मास्क लावणार आहोत. यासाठी तांदळाचं पीठ आणि गव्हाचं पीठ समप्रमाणात एकत्र करा आणि दूध घालून ते कालवा. हा लेप चेहऱ्याला १० मिनिटांसाठी लावा आणि त्यानंतर चेहरा धुवून टाका. त्वचा छान चमकेल.