आपण प्रत्येकजण चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी काहीना काही लावत असतो. तरीसुद्धा चेहऱ्यावर हवा तसा ग्लो दिसत नाही. काही घरगुती उपाय करून तुम्ही चेहऱ्याचा हरवलेला ग्लो परत आणू शकता. तांदूळाच्या पीठाचा फेस पॅक आणि 3 वस्तूंची तुम्हाला आवश्यकता असेल. तांदूळाचे पीठ त्वचेसाठी बरेच फायदेशीर ठरते. (Rice Flour Face).
यातील व्हिटामीन्स आणि मिनरल्स त्वचेला पोषण देतात आणि त्वचा मुलायम बनवतात. तांदूळाचे पीठ त्वचेसाठी कसे फायदेशीर ठरते ते समजून घेऊ. या शिवाय तांदूळाचे पीठ चेहऱ्याला लावल्यानं चेहऱ्याला कोणकोणते फायदे मिळतात ते समजून घ्यायला हवं. (How To Use Rice Flour To Get Instant Glowing Skin in 10 Minutes)
घरी लहानशा कुंडीतही लावता येईल वेलची, खर्च कमी आणि आनंद जास्त-वेलचीच्या सुंगधानं बहरेल घर
चेहऱ्यावर तांदूळाचे पीठ लावण्याचे फायदे
तांदूळाचे पीठ त्वचेला आतून साफ करते आणि डेड स्किन निघून जाण्यात मदत होते. यातील एंटी ऑक्सिडेंट्स त्वचेत बदल करून डाग कमी करण्यास मदत करतात. यातील एंटी इंफ्लेमेटरी गुण पिंपल्स, डाग कमी करतात. तांदूळाच्या पीठात अल्फा अर्बुटिन असते जे त्वचेतील सूज कमी करते आणि ताण-तणाव कमी करण्यास मदत करते.
फेस पॅक लावण्यासाठी लागणारं साहित्य
हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्व नॅच्युरल साहित्य लागेल. हा उपाय करण्यासाठी पॅच टेस्ट नक्की करा. हा राईस फेस पॅक लावून तुम्ही चेहऱ्यावर ग्लो आणू शकता. तांदूळाचं पीठ 2 चमचे, टोमॅटो पल्प 2 चमचे, दही 2 चमचे, मध 1 चमचा लागेल.
जीभेवर ताबा नाही अन् पटकन बारीक व्हायचंय? ५ गोष्टी करा, जीमला न जाता महिन्याभरात स्लिम व्हा
सगळ्यात आधी एक वाटी घ्या त्यात 2 चमचे तांदूळाचं पीठ, 2 चमचे दही, 2 चमचे टोमॅटोचा पल्प मिसळा, 1 चमचा मध घालून व्यवस्थित मिसळा. तयार झाल्यानंतर हा पॅक तुमच्या चेहऱ्याला लावा आणि 15 मिनिटं सुकण्यासाठी ठेवा. थोड्या वेळानं चेहरा साध्या पाण्यानं धुवून टाका. नंतर तुम्हाला चेहरा साफ झालेला दिसून येईल. हा उपाय तुम्ही आठवड्यातून 2 वेळा करू शकता ज्यामुळे चेहऱ्याशी संबंधित समस्या उद्भवणार नाहीत.