चेहऱ्याचं खरं आकर्षण डोळ्यांमध्ये दडलेलं असतं. आपले डोळे सुंदर, आकर्षक असावेत असं प्रत्येकालाच वाटतं. पण डार्क सर्कल्समुळे डोळे कितीही सुंदर असले तरी चेहरा व्यवस्थित दिसत नाही. डार्क सर्कल्स घालवण्यासाठी अनेक फेस मास्क, अंडरआय लिक्वीड्स उपलब्ध आहेत पण ते लावून ही फारसा फरक डोळ्यांमध्ये दिसत नाही. (Rice flour for under eyes)
तांदळाच्या पिठाचा वापर करून तुम्ही चेहऱ्यावरील काळ्या वर्तुळांपासून सुटका मिळवू शकता. तांदळाच्या पिठाचा मास्क थकवा आणि स्ट्रेस दूर करण्यासाठी उत्तम ठरतो. ज्यामुळे डोळ्यांखालची त्वचा चांगली दिसते. डोळ्यांखालचा पफीनेस, थकवा दूर होतो. (How To Make Rice Flour Under Eye Mask)
तांदळाच्या पिठानं अंडरआय फेसमास्क कसा तयार करायचा?
तांदळाच्या पिठाचा अंडरआय फेसमास्क बनवण्यासाठी सगळ्यात आधी एक बाऊल घ्या. त्यात १ चमचा तांदळाचं पीठ आणि १ चमचा मलई एकत्र करा. हे दोन्ही पदार्थ एकत्र करू पातळ पेस्ट तयार करा. त्यानंतर तांदळाचं पीठ तुम्ही डोळ्यांच्या खाली मास्क बनवून लावू शकता.
फक्त 5 रुपयांच्या कढीपत्त्यानं पांढरे केस करा काळे; सोपा उपाय, काळेभोर-लांब होतील केस
तांदळाचा अंडरआय मास्क बनवण्यासाठी सगळ्यात आधी चेहरा स्वच्छ धुवून घ्या. तयार मास्क डोळ्यांच्या खाली लावा आणि हलक्या हातांनी डोळ्यांच्या खालची त्वचा चोळून घ्या. नंतर हा मास्क व्यवस्थित सुकू द्या. नंतर साध्या पाण्यानं चेहरा व्यवस्थित धुवा. चांगल्या परिणामांसाठी तुम्ही हा मास्क रोज लावू शकता.
गुलाबपाणी आणि एलोवेरा जेल
यामुळे डार्क सर्कल्ससची समस्या दूर होण्यास मदत होईल. डार्क सर्कल्स घालवण्यासाठी गुलाबपाणी आणि एलोवेरा जेलचा वापर करा. याचा उपयोग करण्यसाठी १ चमचा गुलाबपाण्यात १ चमचा एलोवेरा जेल मिसळा आणि हे मिश्रण डोळ्यांवर लावा. जवळपास १५ ते २० मिनिटांनी डोळे व्यवस्थित धुवा.
एलोवेरा आणि लिंबू
एलोवेरा आणि लिंबाच्या मदतीनं डार्क सर्कल्स कमी करण्यास मदत होते. यामुळे त्वचेवर चांगले परीणाम दिसून येतात. याचा वापर करण्यासाठी एका वाटीत २ चमचे एलोवेरा जेल घ्या त्यात लिंबाचा रस मिसळा आणि जवळपास १५ मिनिटांसाठी डोळ्यांना लावून ठेवा. यामुळे डार्क सर्कल्सची समस्या दूर होते