आपली स्किन चमकदार असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. आपली त्वचा नेहमीच चमकदार सुंदर दिसावी यासाठी महिला प्रयत्न घेत असतात. (Rice Water For Face) वाढत्या वयाची कोणतीही निशानी चेहऱ्यावर दिसू नये अशी अनेकांची इच्छा असते. त्यासाठी महिला आपल्या चेहऱ्यावर वेगवेगळे प्रयोग करत असतात. महागडे क्रिम, सिरम, मॉईश्चराईजरचा वापर करूनही हवातसा रिजल्ट दिसत नाही. (Rice water For Skin Care)
स्किनला केमिकल्स नाही तर नॅच्युरल इंग्रेडिएंसची आवश्यकता असते. ज्यामुळे चेहऱ्याला पोषण मिळते. डॉ. दिपीका राणा यांनी अलिकडेच इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्या नॅच्युरल सिरल बनवण्याचा फॉर्म्यूला सांगत आहेत. ज्यामुळे त्वचा ग्लोईंग, यंग दिसेल. (How to Take Care Of Face)
तांदूळाच्या पाण्याचे नॅच्युरल सिरम कसे बनवावे? (How to Make Rice Water serum)
नॅच्युरल सिरम बनवण्यासाठी तुम्ही रात्री एक कप तांदूळ एक ग्लास पाणी घालून भिजवायला ठेवा. सकाळी उठल्यानंतर तांदूळाचे पाणी गाळून एका जारमध्ये ठेवा. नंतर तांदूळाच्या पाण्यात २ चमचे एलोवेरा फ्रेश जेल घालून त्यात २ व्हिटामीन ई च्या कॅप्सूल घालून मिक्स करा.
ज्यामुळे नॅच्युरल सिरम तयार होईल. हे सिरम एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा आणि रात्री चेहरा धुतल्यानंतर या सिरमचा स्प्रे चेहऱ्यावर करा. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार फक्त १५ दिवसांच्या आत त्यांना चांगला परिणाम दिसून येईल. हे सिरम लावल्याने चेहऱ्यावर चमक येईल आणि त्वचेला पोषण मिळेल. त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही ब्युटी टिप्स शेअर केल्या आहेत.
केस वर काळे आतून पांढरे झालेत? १ चुटकी हळदीने काळेभोर होतील केस, घ्या सोपा उपाय
तांदूळाच्या पाण्यात मिनरल्स, एंटी ऑक्सिडेंट्स असतात. ज्यामुळे त्वचा ब्राईट होते आणि चेहऱ्याला आवश्यक घटक मिळतात. यामुळे त्वचा प्रोटेक्ट होते आणि हळूहळू त्वचेचा रंग हलका होण्यास मदत होते. सन डॅमेजचा धोका टळतो रेडनेस कमी होतो आणि खाजही येत नाही.
याशिवाय कुलिंग इफेक्टमुळे त्वचेवरचा लालसरपणा कमी होतो. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर राईस वॉटरमुळे तेलकटपणा कमी होण्यास मदत होईल आणि त्वचेवरील पिंपल्स, एक्ने कमी होतील. तांदूळाच्या पाण्याच्या वापराने त्वचेवर एक वेगळाच ग्लो येतो.