निरोगी - टवटवीत त्वचा कोणाला नको? चेहरा नितळ - क्लिन ठेवण्यासाठी आपण अनेक उपाय करून पाहतो. काही महिला महागडे प्रॉडक्ट्स तर काही नैसर्गिक उपायांचा वापर करतात. फार पूर्वीपासून त्वचेसाठी तांदळाच्या पाण्याचा वापर करण्यात येतो. जपान आणि कोरिया सारख्या देशातील महिलांच्या ब्युटी केअर रुटीनमध्ये, तांदळाच्या पाण्याचा समावेश आहे. यामुळे चेहऱ्यावरील डाग, सुरकुत्या, ओपन पोअर्सची समस्या दूर होते. स्किन प्रॉब्लेम सोडवण्यासाठी तांदळाच्या पाण्याचा वापर कशा पद्धतीने करावा हे पाहूयात(Rice water for glowing skin - Korean Skincare).
तांदळाच्या पाण्यातील घटक
तांदळाच्या पाण्यात खनिज, व्हिटॅमिन, अमिनो अॅसिड आणि अँटीऑक्सिडेंट्स आढळतात. हे सर्व घटक त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते.
चेहऱ्यावर खूप केस? कच्च्या दुधाचा करा ' असा ' वापर, न दुखता चेहऱ्यावरचे केस होतील कमी
अशा पद्धतीने तयार करा तांदळाचे पाणी
पहिली पद्धत
अर्धा कप तांदूळ धुवून घ्या, यानंतर एका भांड्यात धुतलेले तांदूळ घ्या, त्यात दोन कप पाणी घाला. मध्यम आचेवर तांदुळ शिजत ठेवा. पाण्याला घट्टपणा आल्यानंतर गॅस बंद करा. दुसऱ्या भांड्यामध्ये तांदळाचे पाणी गाळून घ्या. हे तयार पाणी एका हवाबंद डब्यामध्ये साठवून ठेवा, व त्याचा वापर चेहऱ्यावर करा.
दुसरी पद्धत
एका वाटीत स्वच्छ धुतलेले तांदूळ घ्या, त्यात २ कप पाणी घालून रात्रभर भिजत ठेवा. सकाळी तांदळाचे पाणी गाळून एका स्प्रे बाटलीत भरा. आपण टोनर म्हणून देखील याचा वापर करू शकता.
त्वचेचा नैसर्गिक ग्लो हरवलाय? चेहऱ्यावर व्हिटामिन ई कॅप्सूल लावून पाहा, मग पाहा जादू..
राइस वॉटरचे फायदे
क्लिंजर
तांदळाचे पाणी त्वचेसाठी क्लिंजर म्हणून काम करते. यामुळे त्वचा नितळ - फ्रेश दिसते. यासाठी तांदळाचे पाणी कापसाने चेहऱ्यावर लावा आणि कोरडे होऊ द्या. १० मिनिटानंतर चेहरा पाण्याने धुवा. यामुळे त्वचेवर असलेली धूळ, माती, घाण निघून जाईल.
पिंपल्सची समस्या होईल दूर
तांदळाचे पाणी पिंपल्ससाठी खूप फायदेशीर आहे, यामुळे मुरुमांचे डाग कमी होतात. यासाठी चेहऱ्यावर कापसाने तांदळाचे पाणी लावा आणि कोरडे होऊ द्या. नंतर पाण्याने चेहरा धुवा. यामुळे मुरुमांचे डाग कमी होईल.
कोरड्या त्वचेसाठी फायदेशीर
जर आपली त्वचा खूप ड्राय असेल तर, आंघोळीच्या पाण्यात तांदळाचे पाणी मिक्स करून आंघोळ करा. यामुळे ड्राय स्किनची समस्या सुटेल.
सैल त्वचेवर प्रभावी
तांदळाच्या पाण्यात वृद्धत्वविरोधी गुणधर्म असतात. ज्यामुळे सैल त्वचा घट्ट होते, चेहरा क्लिन होते. यासह त्वचेला हायड्रेट करते. यासाठी चेहऱ्यावर कापसाने तांदळाचे पाणी लावा आणि कोरडे होऊ द्या. नंतर पाण्याने चेहरा धुवा.