केसांच्या वाढीसाठी आपण अनेक उपाय करून पाहतो (Hair care tips). पण अनेक कारणांमुळे केसांची नैसर्गिक वाढ होत नाही. बऱ्याचदा केस गळतात, पांढरे होतात, केसात कोंडा या कारणांमुळे केसांच्या अनेक समस्या निर्माण होतात. यावर ब्यूटी उत्पादनांचा वापर करण्यापेक्षा आपण तांदुळ आणि मेथी दाण्यांचा वापर करू शकता.
केसांसाठी तांदळाचे आणि मेथीच्या बियांचे पाणी हे अत्यंत उत्तम ठरते. यामुळे कोणताही दुष्परिणाम केसांवर होत नाही. हेअर केअर स्क्वॅरमध्ये करण्यात आलेल्या अभ्यासानुसार केसांच्या वाढीसाठी तांदळाचे पाणी आणि मेथीचे पाणी फायदेशीर ठरते. पण केसांच्या वाढीसाठी तांदुळाचा आणि मेथी दाण्यांचा वापर कसा करावा? पाहूयात(Rice water for hair: Benefits and how to use it).
हेअर ग्रोथ मास्क करण्यासाठी लागणारं साहित्य
केसांच्या वाढीसाठी आपल्याला हेअर मास्क तयार करावा लागेल. यासाठी,
मेथी दाणे
तांदूळ
एलोवेरा जेल
अशा पद्धतीने तयार करा हेअर मास्क
मिक्सरच्या भांड्यात कपभर भिजत ठेवलेले मेथी दाणे आणि तांदूळ घेऊन त्याची पेस्ट तयार करा. तयार पेस्ट एका बाऊलमध्ये काढून ठेवा. १२ तासांसाठी त्यावर झाकण ठेवा. आता ही पेस्ट एका सुती कपड्यात घेऊन गाळून घ्या. त्यात एलोवेरा जेल मिक्स करा. अशा प्रकारे हेअर ग्रोथ मास्क वापरण्यासाठी रेडी.
अशा पद्धतीने केसांवर लावा हेअर मास्क
सर्वप्रथमम केस विंचरून घ्या. नंतर स्काल्पसह केसांच्या टोकापर्यंत पेस्ट लावा. १० ते १५ मिनिटानंतर केस शाम्पूने धुवून घ्या. आपण या हेअर मास्कचा वापर महिन्यातून दोनदा करू शकता. यामुळे केसांना नक्कीच फायदा होईल. शिवाय केस घनदाट दिसतील.
केसांसाठी मेथी दाण्याचे फायदे
मेथी दाणे केसांची गळती रोखून केसांची वाढ होण्यासाठी मदत करते. यात मेथीच्या दाण्यांमध्ये लोह आणि प्रोटीन जास्त प्रमाणात आढळते, हे दोन्ही पोषक तत्व केसांसाठी गरजेचे आहे. याशिवाय मेथीच्या दाण्यांमध्ये फॉलिक अॅसिड, विटामिन ए, के आणि सी आढळते. ज्यामुळे केसांच्या अनेक समस्या सुटतात.
माधुरी दीक्षितचं पाहा सिक्रेट, सुंदर केसांसाठी सोपा उपाय- एक केळं आणि..
केसांसाठी तांदुळाचा वापर
तांदळाचे पाणी हे कंडिशनरप्रमाणे काम करते. त्यात व्हिटॅमिन, अमिनो अॅसिड आणि अन्य मिनरल्स ज्याप्रमाणे जिंक, मॅग्नेशियम, व्हिटॅमिल बी आणि सी आढळते. केसांची कोणतीही समस्या असेल तर, आपण त्यावर तांदुळाचा वापर करून पाहू शकता.