Lokmat Sakhi >Beauty > महागडे सिरम-टोनर कशाला? चेहऱ्यावर ग्लो हवा तर वापरा भिजवलेल्या तांदूळाचं पाणी, पाहा जादू

महागडे सिरम-टोनर कशाला? चेहऱ्यावर ग्लो हवा तर वापरा भिजवलेल्या तांदूळाचं पाणी, पाहा जादू

Rice Water For Skin - How To Use It For Maximum Benefits तांदुळाचं पाणी हे चेहऱ्यावर उत्तम ग्लो आणणण्यासाठी अत्यंत उपयुक्त असे घरगुती सोल्यूशन आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2023 06:48 PM2023-03-02T18:48:05+5:302023-03-02T18:51:52+5:30

Rice Water For Skin - How To Use It For Maximum Benefits तांदुळाचं पाणी हे चेहऱ्यावर उत्तम ग्लो आणणण्यासाठी अत्यंत उपयुक्त असे घरगुती सोल्यूशन आहे.

Rice Water For Skin - How To Use It For Maximum Benefits | महागडे सिरम-टोनर कशाला? चेहऱ्यावर ग्लो हवा तर वापरा भिजवलेल्या तांदूळाचं पाणी, पाहा जादू

महागडे सिरम-टोनर कशाला? चेहऱ्यावर ग्लो हवा तर वापरा भिजवलेल्या तांदूळाचं पाणी, पाहा जादू

आपल्या स्वयंपाक घरात असे अनेक पदार्थ आढळतात, ज्याच्या वापरामुळे चेहऱ्याला खूप फायदा होतो. त्यातील एक पदार्थ म्हणजे तांदूळ. कोरियन व जपानी मुलींची त्वचा खूप मुलायम व चमकदार दिसते. त्यांच्या स्किन केअर प्रॉडक्ट्समध्ये तांदळाचा वापर केला जातो. तांदूळ आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

तांदळात प्रथिने, जीवनसत्त्वे, कॅल्शियम, अँटी-ऑक्सिडंट्स इत्यादी अनेक गोष्टी असतात, ज्या त्वचेसाठी खूप फायदेशीर मानल्या जातात. आपण तांदळाच्या पाण्याचा वापर क्लिन्झर, टोनर, सीरम इत्यादी म्हणून देखील करू शकतो. आपल्याला जर तुकतुकीत मुलायम त्वचा हवी असल्यास, तांदळाच्या पाण्याचा वापर चेहऱ्यासाठी कसा करावा याची माहिती घ्या(Rice Water For Skin - How To Use It For Maximum Benefits).

तांदळाचे पाणी बनवण्याची पद्धत

सर्वप्रथम, एका वाटीत एक कप तांदूळ घ्या. तांदूळ कोणतेही चालतील. त्यात पाणी घालून तांदूळ अर्धा तास भिजत ठेवा. दुसरी पद्धत म्हणजे, तांदळामध्ये जास्त पाणी घालून शिजत ठेवा. भात अर्धा शिजल्यानंतर त्याचे पाणी एका कपमध्ये काढून घ्या.

तांदळाच्या पाण्याचा वापर टोनरप्रमाणे करा

तांदळाच्या पाण्यात गुलाबपाणी मिसळून स्प्रे बॉटलमध्ये भरून फ्रिजमध्ये ठेवा. रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवा, आणि हा स्प्रे चेहऱ्यावर शिंपडा. हे एक उत्तम टोनर म्हणून काम करेल.

एक चुटकी हळद की किंमत तुम क्या जानो.. लावा ३ प्रकारे, चेहऱ्यावर येईल गोल्डन ग्लो

फेसमास्कमध्ये तांदळाचे पाणी मिसळा

फेस मास्कमध्ये आपण तांदळाचे पाणी मिक्स करून लावू शकता. त्यात आपण कोरफडीचा गर, लिंबाच्या रसाचा देखील वापर करू शकता. तांदळाच्या पाण्यामुळे चेहऱ्यावरील डाग कमी होतात. त्वचेवरील छिद्रे साफ होतात. यासह मुरुमांसारख्या समस्या दूर होतात.

आईस क्युब्स

चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणण्यासाठी, तांदळाच्या पाण्यापासून आपण आईस क्युब्स बनवू शकता. यासाठी बर्फाच्या ट्रेमध्ये तांदळाचे पाणी भरून ते सेट करायला ठेवा. या आईस क्युब्सने डोळ्यांखालील भागांसह संपूर्ण चेहरावर मसाज करा. याने डाग कमी होतील व चेहरा मुलायम दिसेल.

साबण वापरुन त्वचा कोरडी पडली? ८ नैसर्गिक उपाय - चेहरा दिसेल सतेज, विसराल साबण

सीरम

तांदळाचे पाणी फेस सीरम म्हणून देखील वापरू शकता. यासाठी तांदळाच्या पाण्यात कोरफडीचे जेल आणि व्हिटॅमिन ई तेल मिसळा. याचा नियमितपणे चेहऱ्यावर वापर करा.

Web Title: Rice Water For Skin - How To Use It For Maximum Benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.