Lokmat Sakhi >Beauty > कोरियन ब्यूटीमुळे फेमस झालेलल्या तांदुळाच्या पाण्यात 'असं' काय आहे? खास सौंदर्य सिक्रेट..

कोरियन ब्यूटीमुळे फेमस झालेलल्या तांदुळाच्या पाण्यात 'असं' काय आहे? खास सौंदर्य सिक्रेट..

Rice Water For Skin Care: कोरियन सौंदर्योपचारात दुसरं तिसरं काही नाही तांदळाचं पाणीच महत्वाचं..  तांदळाच्या पाण्यात एवढं आहे तरी काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2022 02:27 PM2022-06-15T14:27:34+5:302022-06-15T14:31:52+5:30

Rice Water For Skin Care: कोरियन सौंदर्योपचारात दुसरं तिसरं काही नाही तांदळाचं पाणीच महत्वाचं..  तांदळाच्या पाण्यात एवढं आहे तरी काय?

Rice water is beauty secret of korean women . Rice water benefits for glowing skin | कोरियन ब्यूटीमुळे फेमस झालेलल्या तांदुळाच्या पाण्यात 'असं' काय आहे? खास सौंदर्य सिक्रेट..

कोरियन ब्यूटीमुळे फेमस झालेलल्या तांदुळाच्या पाण्यात 'असं' काय आहे? खास सौंदर्य सिक्रेट..

Highlightsकोणीही सहज करु शकतील असे उपाय कोरियन महिला करतात आणि या उपायांसाठी त्या केवळ तांदळाच्या पाण्याला ( Rice Water for beauty) जास्त महत्व देतात.

सौंदर्य जगतात सध्या कोरियन ब्यूटीची (korean beauty)   चर्चा आहे.  नितळ त्वचेसाठी कोरियन महिला करतात तरी काय याबद्दल संपूर्ण जगातल्या महिलांना उत्सुकता असते. काहीतरी महागडी उत्पादनं ,अवघड सौंदर्योपचार असतील असा समज असतो अनेकांचा. त्यादृष्टीनं कोरियन महिला आपल्या त्वचेची काळजी कशी घेतात हे बघितलं तर मात्र आपले अंदाज पूर्ण चुकीचे ठरतात. कोणीही सहज करु शकतील असे उपाय कोरियन महिला करतात आणि या उपायांसाठी त्या केवळ तांदळाच्या पाण्याला ( rice water for beauty)  जास्त महत्व देतात. आपल्या त्वचेच्या देखभालीसाठी कोरियन महिलांच्या नियमित सौंदर्योपचारात( Daily skin care routine)  तांदळाच्या पाण्याचा उपयोग करतात. असं या तांदळाच्या पाण्यात असतं तरी काय असा प्रश्न कोणालाही पडू शकेल. याचं उत्तर मिळण्यासाठी त्वचेला तांदळाच्या पाण्याचे काय फायदे होतात  (  rice water benefits for skin) हे जाणून घेणं आवश्यक आहे. 

Image: Google

त्वचेसाठी तांदळाचं पाणी का महत्वाचं?

 1. त्वचेवर चमक येण्यासाठी आणि त्वचा तरुण राहाण्यासाठी तांदळाचं पाणी महत्वाचं असतं. संवेदनशील त्वचेसाठी तांदळाचं पाणी खूप उपयुक्त आहे. चेहऱ्यावरील मुरुम, पुटकुळ्यांमुळे चेहेऱ्याला येणारी सूज आणि होणारी आग तांदळाच्या पाण्यानं कमी होते. तांदळाच्या पाण्यानं त्वचा मऊ होते. 

2. चेहऱ्याच्या त्वचेवरील रंध्रं ( पोर्स) मोठे असतील तर तांदळाचं पाणी त्यासाठी उत्तम टोनर म्हणून काम करतं. तांदळाच्या पाण्यामुळे रंध्रांची खोलवर स्वच्छता होते. त्वचेवरील सीबम ग्रंथीच्या तेल निर्मितीला नियंत्रित ठेवण्याचं काम तांदळाच्या पाण्यातील गुणधर्म करतात. तांदळाच्या पाण्यानं ओपन पोर्सची समस्या कमी होते. 

3. त्वचा कोरडी असल्यास, चेहेऱ्यावर मुरुम पुटकुळ्या जास्त असल्यास आंबवलेल्या तांदळाचं पाणी फायदेशीर ठरतं. या पाण्यातील गुणधर्म्मामुळे त्वचेतील कोलॅजन निर्मितीला चालना मिळते. यामुळे त्वचा मऊ आणि तेजस्वी होते. तांदळाच्या पाण्यामुळे चेहेऱ्यावरील मुरुम पुटकुळ्यांचे डाग आणि उन्हानं काळवंडलेला चेहेरा स्वच्छ होतो. 

Image: Google

4. तांदळाच्या पाण्यात ॲण्टिऑक्सिडण्टसचं प्रमाण चांगलं असतं. यामुळे चेहेऱ्यावरील सुरकुत्या, वयाच्या खूणा कमी होतात.  तांदळाच्या पाण्याच्या उपयोगाद्वारे त्वचेची एजिंगची प्रक्रिया मंद करता येते.  तांदळाच्या पाण्यानं

5. तांदळाचं पाणी त्वचेसाठी नैसर्गिक सनस्क्रीनसारखं काम करतं. हे पाणी त्वचेचं सूर्याच्या अतीनील किरणांपासून संरक्षण करतं. तांदळाच्या पाण्यानं उन्हामुळे जळालेली त्वचा बरे होते, दाह होणारी त्वचा शांत होते. तांदळाच्या पाण्याचा त्वचेसाठी नियमित उपयोग करुन चेहऱ्यावरील टॅनिंगची समस्या दूर करता येते. 

तांदळाचं पाणी कसं तयार करतात- कसं  वापरतात  ?

* त्वचेची काळजी घेण्यासाठी तांदळाचं पाणी करताना 2 मूठ तांदूळ घ्यावेत. हे तांदूळ जास्त पाणी घेऊन उकळावेत. तांदूळ पाण्यात उकळून मऊ झाला की तांदळाचं पाणी काढून घ्यावं. हे पाणी थंडं झाल्यावर स्प्रे बाॅटलमध्ये भरावं. किंवा रात्रभर तांदूळ पाण्यात भिजत ठेवावेत. सकाळी हे पाणी स्प्रे बाॅटलमध्ये काढून घ्यावं. तांदळाचं हे पाणी सकाळी आंघोळ केल्यानंतर आणि झोपण्याआधी चेहऱ्यावर स्प्रे करावं.

* तांदूळ 20-25 मिनिटं पाण्यात भिजवावेत. हे पाणी थोड्या वेळ फ्रिजमध्ये ठेवावं. ते गार झालं की जिथे मुरुम पुटकुळ्या आहेत तिथे लावल्यास त्या बऱ्या होतात. 

* तांदूळ उकळून घेतलेलं तांदळाचं पाणी नैसर्गिक क्लीन्जर असतं. यात जीवनसत्वं आणि खनिजं असतात. तांदळाच्या पाण्यानं चेहेरा धुतल्यास चेहऱ्यावरचा डलनेस निघून जातो. त्वचेतील अशुध्द घटक निघून जातात. 

* उन्हात गेल्यानंतर त्वचा जळत असल्यास, लाल होत असल्यास तांदूळ उकळून काढलेलं तांदळाचं पाणी फ्रिजमध्ये ठेवावं. बाहेर जाताना हे फ्रिजमध्ये ठेवलेलं तांदळाचं पाणी चेहेऱ्याला लावावं.
 

Web Title: Rice water is beauty secret of korean women . Rice water benefits for glowing skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.